आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • N.Raghuraman Article On Healthy Living At Divya Marathi

मॅनेजमेंट फंडा: 'हेल्दी लिव्हिंग' संकल्पनेमुळे शहरी लोक बनताहेत शेतकरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सॉ फेसबुकवरएक पेज आहे. नाव आहे, "ऑर्गेनिक गार्डन टेरेस'. डॉ. विश्वनाथ कडूर यांनी हे पेज बनवलेले असून जगभरातील 22 हजार 340 लोक या पेजशी जोडलेले आहेत. 10 हजार 12 सदस्य एकट्या बंगळुरूचे आहेत. ज्याला गार्डन सिटीदेखील म्हटले जाते. हे सर्व उच्चशिक्षित, सरकारी आणि खासगी क्षेत्रात मोठ्या हुद्यांवर आहेत. अतिशय व्यग्र दिनश्चर्येतून हे लोक बागकामासाठी आवर्जून वेळ काढतात. हा परस्परांमध्ये जोडला गेलेला एक छोटासा समाज आहे. आपल्याला उपयोगी पडणाऱ्या भाज्या आणि फुले स्वत:च उगवतात. हे लोक आपले अनुभव आणि कोणती भाजी कशी उगवावी, त्यापासून कोणते पदार्थ बनतात, ही सर्व माहिती पोस्ट आणि चित्रांद्वारे शेअरदेखील करतात.

या लोकांनी केलेले पोस्ट दिवसेंदिवस वाढत आहेत. यावरून हे सिद्ध होत आहे की, एखाद्याने ठरवले तर आपल्या गरजांनुसार भाज्या आणि फळे स्वत:च उगवू शकतो. त्याला बाजारात मिळणाऱ्या कीटकनाशकयुक्त (पेस्टिसाइड) फळ-भाज्यांवर अवलंबून राहण्याची गरज नाही. यामध्ये यश मिळवण्यासाठी धैर्य आणि नियोजनाची आवश्यकता आहे. स्वत:चा बगिचा तयार करण्याचे अनेक कारणे असू शकतात. यापैकी पेस्टिसाइड फ्री उत्पादन प्रमुख आहे. ढोबळमानाने हिशोब लावल्यास 200 ग्रॅम भाजीमध्ये 40 विषारी रसायने आणि कीटकनाशके असतात. तसेच या फेसबुक पेजशी जोडलेल्या लोकांचे म्हणणे आहे की, ते कीटकनाशक म्हणून लिंबाचे तेल आणि मिरची-लसूण याच्या अर्काचा स्प्रे करतात. वास्तविक हे सर्व लोक शेतीमध्ये भलेही तरबेज असोत, परंतु आपल्या प्रयत्नातून त्यांनी आत्मविश्वास नक्कीच निर्माण केला की, ते खात असलेल्या फळ-भाज्या पूर्णपणे सुरक्षित आणि ऑर्गेनिक (सेंद्रिय) आहेत. हे दीर्घकालीन आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर आहे.
पेजचे संस्थापक कडूर गार्डन सिटी फार्मर्स ट्रस्टचे अध्यक्षदेखील आहेत. ही संस्था लोकांमध्ये घरी किचन गार्डन बनवण्यासाठी जागृती आणि मदत करते. संस्थेच्या मते, बहुतांश लोक दररोज वापरात येणारे टोमॅटो, मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता, पालक आणि इतर काही हंगामी भाज्या घेण्यामध्ये १५-२० टक्के यशस्वी होतात. वास्तविक, जागा आणि वेळेच्या कमतरतेमुळे मोठ्या गरजा बाहेरूनच पूर्ण केल्या जातात. परंतु तरीही शहरी लोकांना हेल्दी लिव्हिंगच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी टाकलेले हे योग्य पाऊल आहे. या मोहिमेत जोडलेल्या अनेक लोकांनी तर पूर्णपणे बागकाम करण्यास सुरुवात देखील केली आहे. यामुळे ते युवा होत असलेल्या मुलांना फळ-भाज्या कशा उगवतात हे दाखवू शकतील. काही लोकांसाठी हे चिंतनासारखे आहे.
ज्यामध्ये त्यांच्या शरीर आणि मेंदूसोबत आत्म्याची कसरत होते. किचन गार्डनिंगसाठी 500 ते 500 स्क्वेअर फूट जागेची आवश्यकता असते. येथे विविध प्रकारच्या फळ-भाज्या घेतल्या जाऊ शकतात. गार्डन फार्मर्स ट्रस्टदेखील यासाठी लोकांची मदत करते. वास्तविक या पेजच्या काही लोकांनी एकत्र येऊन ही संस्था बनवली. ज्यामध्ये आठवडाभराच्या आवश्यकतेनुसार भाज्या घेण्याची माहिती दिली जाते. जसे की, एखाद्याला आठवड्याला अर्धा किलो वांग्यांची गरज असल्यास यासाठी वांग्याचे तीनच रोपे पुरेसे आहेत.