आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅनेजमेंट फंडा : आजाराला कधीही डोक्यावर स्वार होऊ देऊ नका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बहुतांश सेलिब्रिटींनापाहून असे वाटते की, त्यांचे आयुष्य किती परिपूर्ण आहे. परंतु मेकअप आणि फॅन्सी कपड्यांमध्ये आणखी बरेच काही असते, जे त्यांना सामान्य नागरिकां इतकेच अस्वस्थ करतात. आजार ही एक अशी बाब आहे, जी कोणामध्येच भेदभाव करत नाही. मात्र, हे लोक आजाराला आपल्या डोक्यावर स्वार होऊ देत नाही. चेहऱ्यावर हास्य आणून ते आजाराशी लढत असतात.

पहिली कथा :बॉलीवूड अभिनेता सलमान खान सात वर्षांपासून न्यूरोपॅथिक आजाराने पीडित आहे. ज्यामुळे त्यांना बराच त्रास सहन करावा लागला. त्रास वाढतो तेव्हा त्यांचा चेहरा, गाल आणि जबड्यांपर्यंत फार त्रास हाेतो. याला ट्रिगेमिनल न्यूरेगा असे म्हणतात. परंतु सलमान या आजाराला आपल्या फिटनेस शेड्युल, शूटिंग आणि सिनेमांचे प्रमोशनच्या आड येऊ देत नाही. ते यावर उपचार घेत आहेत. असे असतानाही सलमान कधीही या आजाराला आपल्यावर हावी होऊ देत नाहीत.

दुसरी कथा : हीगोष्ट आहे फवाद खान यांची. फवाद पाकिस्तानी गायक, मॉडेल आणि कलाकार आहे. अलीकडेच त्यांनी सोनम कपूरसोबत खूबसूरत चित्रपटातून बॉलीवूडमध्ये अभिनेता म्हणून पदार्पण केले. दिसायला स्मार्ट असण्याबरोबर ते स्वाभावने चांगले व्यक्ती आहे. थोडे आळशी आहे आणि त्यांना झोप खूप प्रिय आहे. परंतु आपले काम आणि एखाद्याला दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी शक्य ते पाऊल उचलतात. फवाद यांना टाइप वन डायबिटीस (मधुमेह) आहे. १० पैकी एकाला हा डायबिटीस होतो. यामध्ये खाण-पिण्याचे खूप पथ्य पाळावे लागते. कारण जे काही खातो त्यामुळे ब्लड शुगरची (रक्त शर्करा) पातळी प्रभावीत होते. आजार होणे ठिक आहे, पण यामुळे कोणीही निराश, हताश होऊन नये, असे फवाद माणतात.

तिसरी कथा : अशीचकाही अभिषेक बच्चन यांच्या बाबतीत आहे. फार कमी लोकांना माहिती आहे की, ते नऊ वर्षांचे होते, तेव्हा त्यांना माइल्ड डिस्लेक्सिया (वाकविकार) असल्याचे कळाले होते. अामिर खान यांनी या समस्येवर आधारित तारे जमीन पर हा चित्रपटदेखील बनवला होता. मेडिकल ट्रीटमेंटसह कुटुंबाची साथ आणि कडक शिस्तीमुळे अभिषेक यांनी विद्यार्थी देशतच या समस्येवर नियंत्रण मिळवले आणि याला अडथळा बनू दिले नाही.

चाैथी कथा : अमेरिकीरिअॅलिटी शो स्टार किम कर्दाशियां तसे अनेक कारणांनी चर्चेत असतात. टीव्ही कलाकार असण्याबरोबरच त्या फॅशन डिझायनर आणि उद्योजकदेखील आहे. किम न्यूयॉर्क टाइम्सच्या सर्वाधिक खपाचे पुस्तक असलेल्या "कर्दाशिया कॉन्फिडेंशियल'च्या लेखिकासुद्धा आहे. लॉस एंजलिसमध्ये जन्मलेल्या किम यांना २०११ मध्ये सोरायसिस असल्याचे कळाले. त्यांनी हे लपवण्याऐवजी लोकांना याविषयी सांगितले. निकटवर्तींयांशिवाय त्या माध्यमामध्ये देखील याबाबत बोलल्या. किम यांनी टाकलेल्या पावलामुळे दीर्घकाळापासून सोरायसिसने त्रस्त असलेल्या लोकांनाही दिलासा मिळाला.

पाचवी कथा : ऑलिम्पियनजलतरणपटू मायकल फेल्प्स नऊ वर्षांचे असताना त्यांना अटेंशन डेफिसिट हायपरअॅक्टिव्हिटी डिसऑर्डर असल्याचे कळाले होते. या आजाराने त्रस्त व्यक्ती कुठेच लक्ष केंद्रित करू शकत नाही. आपल्या वागण्यावरदेखील व्यक्तीचे नियंत्रण नसते. परंतु मायकल यांनी या आजारावर नियंत्रण मिळवलेच आणि जलतरण चॅम्पियनही बनले. हॉलीवूडची नायिका हेले बेरी एका टीव्ही शोदरम्यान बेहोश झाली. तपासणीनंतर काळाले की, त्यांना डायबिटीस आहे. परंतु त्यांनी आजारामुळे हार पत्करली नाही आणि जे करू इच्छित होती, तेच केले.
फंडा हा आहे की...
कोणत्याही आजाराशी लढण्यासाठी दृढ़ इच्छाशक्ती असणे सर्वात आवश्यक असते. अौषधी तर केवळ शरीराला आजाराशी लढण्यासाठी मदत करते. मन मजबूत असेल तर तुम्ही आजाराशी थेट सामना करू शकता आणि त्याला हरवू शकता.