आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅनेजमेंट फंडा - निरीक्षणातून सुरू होऊ शकतो नवीन व्यवसाय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निरीक्षण : नेपालच्या यात्रेदरम्यान महेंद्र प्रताप जायसवाल यांनी एका गरीब शेतकऱ्याला पाहिले. तो पारंपरिक चुलीमध्ये तांदळाच्या भुशाचा इंधन म्हणून उपयोग करत होता. त्यांनी माहिती घेतली, तेव्हा यामुळे प्रदूषण होत नसल्याचे कळाले.

निरीक्षणाचासमस्येशी संबंध जोडणे : जायसवालयांना जागतिक आरोग्य संघटनेचा वाचलेला अहवाल आठवला. अहवालात भारतात घरगुती प्रदूषणामुळे दरवर्षी १३ लाख लोक मृत्युमुखी पडत असल्याचे नमूद केलेले होते. या मृत्यूचे मुख्य कारण शेणाच्या गोवऱ्या, लाकडे आणि ठोस इंधनातून निघणारे विषारी वायू आहे. जवळपास ४० कोटी भारतीय या विषारी वायूमुळे श्वसन, फुप्फुस आणि डोळ्यांच्या समस्यांनी त्रस्त आहेत. यापैकी ९० टक्के प्रमाण महिलांचे आहे.

विचार: त्यांच्या डोक्यात एक विचार आला. भारतात परतल्यावर ते जावई सौरभ व्याही अरविंद सागर जायसवाल यांना भेटले. त्यांना धूररहित स्टोव्ह बनवू इच्छित असल्याचे सांगितले. याची किंमतही कमी असावी खालच्या स्तरातील लोकांना फायदा पोहोचावा, असे मतही मांडले.

संधी: संशोधन केल्यास कळाले की, ग्रामीण लोकसंख्येच्या १२ टक्क्यांपेक्षा कमी लोक एलपीजी चूल वापरतात. लालफितशाही, वितरण प्रणाली दलालांमुळे किमतींमध्ये होणारा मोठा बदल यासाठी कारणीभूत आहेत.

सातत्य: अशा उत्पादनासाठी सातत्याने इंधन पुरवठा होत राहावा, असे त्यांना वाटत होते. तांदूळ उत्पादनाच्या बाबतीत भारताचा जगात दुसरा क्रमांक लागत असल्याचे अभ्यासातून त्यांच्या लक्षात आले. देशात दरवर्षी लाख मेट्रिक टन तांदूळ पिकतो. उत्पादनाचा २२ टक्के भाग भुसा असतो. १२ कोटी मेट्रिक टन भुसा वाया जातो, जाळला किंवा फेकून दिला जातो.
तथ्यांचीपडताळी केली : भारतसरकारच्या अहवालानुसार ८० कोटी भारतीय अन्न शिजवण्यासाठी पारंपरिक ऊर्जा स्रोताचा वापर करतात. यामध्ये लाकूड, कोळसा, पिकांचा उरलेला भुसा किंवा मागचा भाग यांचा समावेश असतो. रॉकेल वापरणारे मिळकतीचा ३० टक्के भाग यावरच खर्च करतात.

प्रत्यक्ष कृती : २००९ मध्ये नव दुर्गा मेटल इंडस्ट्रीची स्थापना करण्यात आली. त्यांचे पहिले उत्पादन होते, धूररहित चूल आणि तिची किंमत होती फक्त ५०० रुपये.
जनजागृतीअभियान : हेउत्पानद गरीब कुटुंबाचे आरोग्य आणि राहणीमान चांगले बनवेल, असे त्यांना वाटत होते. यामुळे पैसे आणि वेळेचीही बचत होईल.

संचालन: सुरुवातीला उत्तर प्रदेश, बिहार, आसाम आणि पंजाबमध्ये ५० डिस्ट्रिब्यूटर्स बनवले. हरियाणातील फैझाबाद आणि फरिदाबादमध्ये दोन युनिट उभे करण्यात आले. दरम्यान स्थानिक कौशल्याला वाव मिळेल, याकडेही लक्ष देण्यात आले. त्यांनी डिस्ट्रिब्यूटर्सला तांदळाचा भुसा जमवणे, पॅक करणे त्यांच्या भागात वितरित करण्याचे प्रशिक्षण दिले.
नव्याकौशल्यासह स्थैर्य आणि विकास : महेंद्रयांच्या मुलाने (विभोर जायसवाल) एमबीए केल्यानंतर काही वर्षांपर्यंत स्पाइस जेटसोबत काम केले. काही काळ तो ई-गव्हर्नेंस प्रोजेक्टमध्ये काम करत होता. २०१२ मध्ये तो नव दुर्गा कंपनीचा कार्यकारी संचालक बनला. त्याच्या आगमनानंतर कंपनीचा विस्तार इतर आठ राज्यांमध्ये झाला. आता तो तांदळाच्या भुशावर आधारित कुकिंग स्टोव्हचा प्रचार-प्रसार करत आहे.
फंडा हा आहे की...
अनेकदा सखोल अवलोकन, क्रमबद्ध योजना आणि त्याची प्रत्यक्ष कृती एक असा व्यवसाय उभा करते, जो ऐतिहासिक ठरू शकतो. यामुळे ग्रामीण आणि निमशहरी उद्योगांची सुरुवात होते.