आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Special Article On Self Confidence By N Raghuraman

मॅनेजमेंट फंडा - इच्छाशक्ती मजबूत असेल तर जगही जिंकता येते

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
२५ वर्षांची होण्याआधीच आपल्या आई-वडिलांच्या घरी पोहोचण्याची योजना तिने डिसेंबर २०११च्या रात्री बनवली. ती हैदराबाद येथून आपल्या घरी फरिदाबादला जाण्यासाठी रेल्वे गाडीत बसली. ती गेल्या एक वर्षांपासून इन्फोसिसमध्ये टेस्ट इंजिनिअरची नोकरी करत होती. त्यामुळेच तिला घरी जाता येत नव्हते. तिने वर्षभरापासून आईच्या हातचे जेवणही केले नव्हते. ती अत्यंत उत्साहित होती.
कारण ती आपल्या घरी जाणार होती. रेल्वे गाडी तिच्या घराच्या जवळ पोहचत असतानाच तिने लहान मुलाप्रमाणे खिडकीतून डोकावले. ती व्याकूळ झाली होती. प्रत्येक क्षण तिला मोठा वाटत होता. अद्याप ट्रेन पोहोचायला ३० मिनिट बाकी होते. लहान मुलाप्रमाणे गाडीतून उडी मारत आपल्या आईची गळाभेट घ्यावी, असे तिला वाटत होते. तिने आधीच बॅग खांद्यावर घेतली होती आणि खिडकीमध्ये बसून उत्सुकतेने बाहेरचे दृश्य पाहत होती. रेल्वे गाडी हजरत निजामुद्दीन स्थानकाच्या आधी हळू-हळू पुढे सरकत होती. दरम्यान एक स्टेशनच्या आधी पलवल स्थानकावर दोन गुंड प्रवृत्तीची मुले हळू चालणाऱ्या गाडीत चढले. एकाने तिची बॅग हिसकावली. ती उभी राहिली आणि आपली बॅग परत घेण्याचा प्रयत्न करायला लागली. ती हळू-हळू दरवाजाकडे गेली होती. दुसऱ्याने तिला धक्का दिला आणि ती रेल्वेतून खाली पडली. या दरम्यान तिचा एक पाय दरवाजामध्ये अडकला. तिच्या पायाला दुखापत झाली होती.

रेल्वे गाडी रिकामी होती. त्यामुळे जास्त लोक ही घटना पाहू शकले नाही. मात्र, काही प्रवाशांनी तिचा ओरडण्याचा आवाज ऐकला आणि इमरजन्सी साखळी ओढली. प्रवाशांनी तिला पुन्हा गाडीमध्ये खेचले. त्यानंतर तिला दिल्लीला घेऊन गेले आणि पोलिसांच्या सुपूर्द केले. त्यांनी तिला रुग्णालयात दाखल केले. तेथे तिच्या पायाच्या उजव्या गुडघ्याच्या खालचा भाग कापावा लागला. यानंतर त्या मुलीचे आयुष्य पूर्णपणे बदलले. काही महिन्यानंतर तिच्या शारीरिक स्थितीत सुधारणा होत गेली, परंतु तिची मानसिक अवस्था हळू-हळू बिघडत गेली. २०१२ मधील पॅरालिम्पिकमध्ये ऑस्कर पिस्टोरियसच्या कामगिरीने तिचे लक्ष वेधले. ती आपल्या डॉक्टरांना भेटली तेव्हा डॉक्टर म्हणाले की, तू आता चालू शकते.
मात्र, धावू शकत नाही. हे ऐकून तिने काळजी केली नाही. कारण ती खेळाडू नव्हती. मात्र, यामुळे ती थोडीफार चिंतित राहत होती. तिने आता पायांविनाच धावण्याचा निश्चय केला. ही आहे २८ वर्षांची किरण कनोजिया. तिने मुंबईत १८ जानेवारी २०१५ रोजी झालेल्या अर्ध मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग नोंदवला.

ती २० ब्लेड रनर ग्रुपमध्ये सहभागी झाली. त्यात ४१ वर्षीय कारगिल युद्धातील मेजर देविंदर पाल सिंह यांचादेखील समावेश होता. तिने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये हैदराबादेत याहीपेक्षा मोठ्या स्पर्धेत सहभाग घेतला होता. ब्लेड रनरला ब्लेड आणि स्टंपमध्ये झालेल्या घर्षणामुळे खूप वेदना होतात. मात्र, कनोजियाने हे धाडस दखवून जगाला उत्तर दिले. म्हणजे कोणीच तिला गुडघ्यावर येण्यास विवश करू शकत नाही. तिने आपली पहिली शर्यत ३.३० तासांमध्ये पूर्ण केली. दुसऱ्या स्पर्धेत हा कालावधी १५ मिनिटांनी कमी केला. नंतर नोव्हेंबरमध्ये दिल्ली अर्ध मॅरेथॉन शर्यत २.५८ तासांत पूर्ण केली.
फंडा हा आहे की...
तुमच्या आयुष्यात तुमच्याशिवाय तुम्हाला कोणीच पराभूत करू शकत नाही. जगाच्या विरोधात फक्त तुमच्या इच्छाशक्तीचाच विजय होतो.