आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Special Artilcle On Angreeness On Road By N Raghuraman

मॅनेजमेंट फंडा - रस्त्यावरील राग समाजाच्या वर्तनाचा आरसा आहे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मी शनिवारी चेन्नई विमानतळावर पोहोचलो आणि तेथून टॅक्सी पकडली. तामिळनाडू राज्यामध्ये वाहतुकीसाठी रेल्वेपेक्षा रस्त्यांचाच अधिक वापर केला जातो. त्यामुळे येथे वाहतूक विस्कळीत होण्याच्या अनेक घटना पाहायला मिळतात. दहा मिनिटांच्या प्रवासानंतर आमची टॅक्सी एकीकडून खासगी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी भरलेली बस आणि दुसरीकडून सुंदर पांढऱ्या रंगाची लिमोझिन कार यांच्यामध्ये फसली.
लिमोझिन आम्हाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत होती. माझ्या टॅक्सीचालकाने त्या कारच्या चालकाला साइड दिली. मात्र, अचानक आमच्या टॅक्सीला थांबवावे लागले. कारण लिमो कारच्या चालकाने ओव्हरटेक करत आपली कार आमच्या टॅक्सीसमोर आडवी उभी केली. त्यामुळे खासगी बस आणि आमची टॅक्सी दोघांनाही थांबावे लागले.

चांगले कपडे घातलेला त्या कारचा चालक कारमधून उतरला. साइड दिल्याबद्दल आमच्या टॅक्सीचालकाचे त्याने आभार मानले. नंतर तो त्या बसजवळ गेला. बसचालकाची केबिन उघडली आणि त्याला मारायला लागला. त्याने बसचालकाला शर्ट फाटेस्तोवर बेदम मारहाण केली. एखादा सिंह आपली शिकार पकडत आहे, याप्रमाणे त्या कार चालकाचा चेहरा लाल झाला होता. यादरम्यान काही दुचाकीस्वार आणि पायी जाणारे लोक चिडलेल्या कार चालकाला जाण्यास सांगत होते. १०० मीटरवर असलेला वाहतूक पोलिस धावतच तेथे आला आणि वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करायला लागला. तो कारचालकाला समजावून सांगत होता. त्यावर कारचालक म्हणाला, ‘मला एका महत्त्वाच्या बैठकीला जायचे होते, पण बसचालक किलोमीटरपासून साइड देत नव्हता.’ दरम्यान, बसचालकाला मारहाण करून वाहतूक विस्कळीत केल्याबद्दल त्याला कोणीच काही विचारले नाही. परिणामी कारचालक आरामात तेथून निघून गेला.

या घटनेने मला २०१४ मध्ये अमेरिकेतील एक घटना आठवली. हॉस्टन येथील राखीव दलाचे पोलिस अधिकारी केनथ कालपन यांनी एका महिलेला गोळी मारली होती. कारण ती महिला त्याच्या समोर हॉर्न वाजवत होती. तथापि, ती बऱ्याच वेळापासून हॉर्न वाजवत होती. त्यामुळे कालपन आपल्या कारमधून बाहेर आले आणि तिच्यावर गोळी झाडली. गोळी तिच्या डोक्याला लागली. काही सेकंदातच त्या महिलेच्या कारची पहिली सीट रक्ताने माखली. कालपन यांनी तत्काळ तेथून पळ काढला. महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तथापि, तिचे प्राण वाचले. काही वेळानंतर ही घटना सर्व वृत्तवाहिन्यांवरून झळकली. अमेरिकेमध्ये सर्व स्तरांतून या घटनेचा निषेध करण्यात आला.

भारतीय रस्त्यांवर रागाच्या भरात अशा प्रकारच्या घटना घडणे सामान्य बाब आहे. मात्र, अशा प्रकारच्या घटनांवरून, आपला समाज कसा आहे आणि सार्वजनिक ठिकाणी कसे वर्तन करतो, हे सिद्ध होते. रस्त्यावर राग येणे, डायग्नोस्टिक मॅन्युअल ऑफ मेंटर डिसऑर्डर (डीएसएम)मध्ये अधिकृतरित्या मानसिक आजाराच्या रूपात ओळखता येत नाही. तथापि, रस्त्यावर रागाच्या भरात केलेले वर्तन इंटरमीडिएट एक्सप्लोझिव्ह डिसऑर्डर असू शकते. हा आजार डीएसएमचा भाग आहे.
फंडा हा आहे की
जर तुम्हाला रस्त्यावर वारंवार राग येत असेल तर तुम्ही आजारी आहात आणि तुम्हाला मदतीची गरज आहे. हा राग तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत समाजामध्ये उच्च दर्जा मिळवून देऊ शकत नाही.