आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅनेजमेंट फंडा - नैराश्याच्या स्थितीचे आनंदी क्षणांमध्ये रूपांतर करा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्राचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे
नील आणि कॅरेन दांपत्याला १२ वर्षांची चारलोट नावाची मुलगी होती. ती नृत्यात पारंगत होती. हे दांपत्य दक्षिण-पूर्व लंडनमधील पुटनी भागात राहते. वेस्ट एंड शोमध्ये सादरीकरण करण्याची चारलोटची खूप इच्छा होती. त्यासाठी तिची आई तिला अनेकदा ऑडिशनला घेऊन जात असे. २००९ मध्ये तिला वेस्ट एंड स्टेजवर अॅल्टन जॉन (यांनी प्रिन्सेस डायनाचे निधन झाल्यावर कँडल इन विंड हे गाणे गायले होते) यांच्या प्रॉडक्शनमध्ये पात्र साकारण्याची संधी मिळाली नाही. या प्रॉडक्शनमध्ये बिली एलियट यांचे संगीत होते. संधी गमावल्यानंतर एकेदिवशी आपण या कार्यक्रमात अवश्य भाग घेणार, असा निश्चय तिने केला. अनेकदा ऑडिशन दिल्यानंतर अखेर तिला निमंत्रण मिळालेच.
तिला बॅलेमध्ये शॅरोन पर्सीचे पात्र साकारण्यास सांगितले. ती या गटामध्ये सर्वात कमी वयाची नर्तिका होती. तिला शाळा सुटल्यानंतर दररोज सरावासाठी जावे लागत असे. मात्र, तरीही ती अत्यंत उत्साही आणि आनंदी होती. चारलोटचा पहिला शो लंडन येथील व्हिक्टोरिया पॅलेस थिएटरमध्ये डिसेंबर २०१० मध्ये झाला. या शोला तिचे आई-वडीलही उपस्थित होते. एवढ्या कमी वयाची मुलगी वेस्ट एंड स्टेजवर सादरीकरण करणार असल्याने सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले. शोसाठी ती १७ मार्च २०११ रोजी जर्मनीला गेली. याचदरम्यान नील यांचा फोन वाजला. दुसऱ्या बाजूने कॅरोनचा आवाज ऐकू आला. ती रडत होती. नील तिला समजावण्याचा प्रयत्न करत होते. नील यांना कॅरोन यांचे शब्द स्पष्टपणे ऐकू येत नव्हते.
कॅरोन यांनी सांगितले की, ‘नेहमीप्रमाणे मी चारलोटला शाळा सुटल्यानंतर नृत्याच्या क्लासला घेऊन जात होते. एवढे म्हणत तिला भरून आले.’ अनेक प्रयत्नांनंतर त्यांनी सांगितले की, ‘मी शाळेजवल कार पार्क करण्यासाठी गेले, पण तेथे जागा नव्हती. त्यामुळे दुसरीकडे गाडी लावली. चारलोटला लवकर जायचे होते. त्यामुळे ती कारच्या बोनेटवरून उडी मारून पळाली. तितक्यात ती एका डबल डेकर बसच्या खाली आली. ती मोठ्याने ओरडली आणि क्षणात शांतता झाली. पॅरामेडिकलचे लोक घटनास्थळी आले, पण तेसुद्धा काहीही करू शकले नाही. आपली चारलोट गेली...’ जणू आपल्या पोटात कुणी तरी जोराने ठोसा मारल्याचे नील यांना वाटले. रुग्णालयात काही तरी चमत्कार घडू दे, अशी त्यांनी प्रार्थना केली. मात्र, असे कधीच होत नाही.
नील आणि कॅरेन यांनी फ्युनरल सर्व्हिसला मेमोरियल सर्व्हिस असे नाव दिले. नंतर दोघांनी चारलोट लेदरबॅरो फाउंडेशनची स्थापना केली. बिली एलियटच्या संपूर्ण कलावंतांनी लंडन, न्यूयॉर्क, टोरांटोमध्ये फंड रेझिंग म्युझिकल कार्यक्रमाचे आयोजन केले. शो लिहिणाऱ्या अॅल्टन जॉन यांनीही दान केले. काही आठवड्यांतच फाउंडेशनकडे ४० हजार पाउंड जमा झाले. नंतर त्यांच्याकडे संपूर्ण युनायटेड किंगडममधील युवा कलावंतांकडून मागणी यायला लागली. चारलोटच्या निधनाच्या तीन वर्षांनंतर शेकडो मुले-मुली आज फाउंडेशनतर्फे करण्यात आलेल्या मदतीमुळे नृत्य शिकत आहेत. www.charlotfoundation.org हे फाउंडेशनचे संकेतस्थळ आहे. नील आणि कॅरेन आपल्या इतर दोन मुलांसह या गरीब मुलांची कामगिरी पाहतात. ते त्यांच्यामध्ये चारलोटला पाहतात.
फंडा हा आहे की...
तुमच्याकडे नेहमीच नैराश्यपूर्ण स्थितीचे आनंदात रूपांतर करण्याची संधी असते. फक्त तुम्हाला थोडी हिंमत दाखवण्याची गरज आहे.