आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅनेजमेंट फंडा - अपयशी ठरल्यानंतरही प्रगती शक्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पहिली कथा : देशातील अनेक सरासरी आणि किरकोळ विद्यार्थ्यांप्रमाणे त्यांनीदेखील माध्यमिक परीक्षेत ५० टक्के गुण मिळवले. इतरांप्रमाणे त्यांचीही आयुष्याची घडी नीट करण्यासाठी नोकरी करण्याची इच्छा होती. तांत्रिक शिक्षणात आवड असल्यामुळे त्यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) प्रवेश घेतला. कारण त्या काळात आयटीआयच्या विद्यार्थ्यांना नोकरी मिळण्याची हमी होती. अशा प्रकारे ते १९९४ मध्ये मुंबई पोलिस दलातील बिनतारी संदेश विभागात रुजू झाले. ते या नोकरीवर खुश होते, परंतु महाराष्ट्र पोलिस दलाचा कर्मचारी म्हणून जर एखाद्या विशेष क्षेत्रात पारंगत झालो तर प्रतिष्ठा वाढेल, असा विचार त्यांनी केला. त्यानंतर त्यांनी आणखी तांत्रिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून पोलिस दलासाठी उपयुक्त ठरेल.
१९९९ मध्ये माहिती तंत्रज्ञानात डिप्लोमा करण्यासाठी सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स्ड काॅम्प्युटिंगमध्ये प्रवेश घेणे त्यांच्या आयुष्यातील पहिला टर्निंग पॉइंट ठरला. लवकरच ४० हजार रुपये कर्ज घेऊन त्यांनी एक संगणक खरेदी केला. हळूहळू ते पोलिस दलासाठी प्रोग्राम डेव्हलप करण्यासाठी आणि तयार करण्यासाठी बाहेरून येणाऱ्या सॉफ्टवेअर समूहांसोबत चर्चा करायला लागले. यादरम्यान त्यांनी स्वत:ला अपग्रेड करण्यासाठी अनेक डिप्लोमा कोर्स केले. २००७ मध्ये आयपीएस अधिकारी संजीव कुमार सिंघल यांना त्यांच्या कार्याबद्दल माहिती मिळाली. सिंघल यांनी २००९ ते २०१४ या कालावधीत पुण्यात अतिरिक्त आयुक्त आणि सहआयुक्त म्हणून काम केले आहे. त्यांच्या तांत्रिक कौशल्याने प्रभावित झालेल्या सिंघल यांनी त्यांना पुण्याला आणले. त्यांनी तयार केलेल्या सॉफ्टवेअरच्या मदतीने कॉन्स्टेबल्सच्या लेखी परीक्षेचा निकाल संपूर्ण राज्यात एकाचवेळी घोषित केला जाऊ शकत होता. ही कथा रवींद्र नानासाहेब यांची आहे. त्यांनी सुरुवातीला आलेल्या अपयशानंतर कधीच मागे वळून पाहिले नाही.
आज ते राज्यात शस्त्रे बाळगणाऱ्या लोकांची अचूक माहिती सांगणाऱ्या ‘आर्म्स लायसेन्स मॅनेजमेंट’चे निर्माते आहेत. तसेच हॉटेल लायसेन्स मॅनेजमेंट, पोलिस क्वार्टर मॅनेजमेंट, पोलिस ऑफिसर्स सॅलरीज मॅनेजमेंट, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे नागरिकांच्या भविष्य निर्वाह निधीचे मॅनेजमेंट इत्यादींसारखे प्रोग्राम त्यांनीच तयार केले आहेत. त्यांनी पेक्षा जास्त पोलिस प्रोग्राम बनवले असून इतरही अनेक प्रोग्रामच्या निर्मितीमध्ये साहाय्य केले आहे. ग्रामीण शिक्षण, माध्यमिक शाळेत सरासरी गुण गरिबीच्या वातावरणातून बाहेर पडत त्यांनी पोलिस दलातील सन्मानित कर्मचारी म्हणून मान मिळवला आहे. आता त्यांच्याकडे मागे वळून पाहण्यास वेळ नाही.
दुसरी कथा : गुडगावातील भौंडसी कारागृह परिसर केवळ आधुनिकीकरण आणि वाइट बातम्यांमुळेच प्रसिद्ध नाही. खूप कमी लोकांना माहीत असेल की, तेथील काही कैदी सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. ते संपूर्ण राज्यातील कारागृहांमध्ये ‘मोस्ट वाँटेड’ आहेत. गोरखपूरचा अमित मिश्रा यापैकी एक आहे. तो २०१३ मध्ये आपल्या पत्नीच्या मृत्यूप्रकरणी अंडर-ट्रायल कैदी म्हणून कारागृहात आला होता. त्याच्या पत्नीने कथितरीत्या हुंड्यासाठी छळ झाल्यामुळे वैतागून विष प्राशन केले होते. यामध्ये तिचा मृत्यू झाला. जामीन मिळण्यापूर्वी अमितने कारागृहात १३ महिने काढले. यादरम्यान अमितने सर्व कैद्यांची माहिती आणि कारागृहाचे इतर कामकाज डिजिटल करण्यासाठी अधिकाऱ्यांची मदत केली.
प्रत्येक दोषी आरोपीच्या माहितीपासून सुरुवात करत खात्यामध्ये वेतन जमा करणे, कैद्यांची रुग्णालयांमध्ये राहण्याची माहिती आणि कँटिनमध्ये बायोमेट्रिक सिस्टिम लावण्यापर्यंत प्रत्येक गोष्ट त्याने डिजिटलाइज्ड केली. आता कारागृह विभागाने अमितला संपूर्ण राज्यातील कारागृहांमध्ये डिजिटल सिस्टिम लावण्यासाठी नियुक्त केले आहे. संपूर्ण राज्यात ३०० पेक्षा जास्त वॉर्डन कैद्यांना नव्या सिस्टिमचे प्रशिक्षण दिले जात आहे.
फंडा हा आहे की...

आयुष्यामध्ये काही वाईट गोष्टी घडतातच. अमितच्या बाबतीत हे जाणीवपूर्वक घडले, तर रवींद्र यांच्या बाबतीत अनवधानाने घडले. मात्र, यातूनही मार्ग काढत आयुष्य पुन्हा रुळावर कसे आणता येईल, हे स्वत:वरच अवलंबून असते.