आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅनेजमेंट फंडा - संकट काळात फायर फायटर बनतो उत्कृष्ट कर्मचारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्रिकेट विश्वचषक २०१५च्या उपांत्य फेरीत पोहोचणे भारतासाठी निश्चितच सोपे नव्हते. तथापि, सर्व सामने आरामशीर जिंकले, असेच वाटत होते. कारण सर्वांनी चांगला खेळ केला. फलंदाजांनी चांगली कामगिरी केली. गोलंदाजांनी टिच्चून मारा केला आणि क्षेत्ररक्षकांनी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केले. नाणेफेक जिंकण्यापासून ते धावसंख्येचा पाठलाग करत बांगलादेशला रोखण्यापर्यंत भारतीय संघाने कोणत्याच चुका केल्या नाहीत. सामन्याच्या पूर्वार्धात संपूर्ण ताकद लावत मोठी धावसंख्या उभारली आणि उत्तरार्धात टप्प्या-टप्प्याने गडी बाद करत विरुद्ध संघाला वरचढ होऊ दिले नाही.
ग्राहक संतुष्ट होण्यासाठी प्रत्येक डिश चविष्ट बनवणाऱ्या त्या महान शेफप्रमाणे रोहित शर्माचे शतक होते. तर सुरेश रैनाच्या उत्कृष्ट कामगिरीने भारताला आपले वर्चस्व कायम ठेवण्याची संधी दिली. ज्याप्रमाणे रेस्टॉरंटचा पॅस्ट्री शेफ ग्राहकांच्या आवडीनुसार चवदार गोड डिशेस बनवतो, त्याप्रमाणे रैनाने आपली खेळी केली. शिखर धवन, अजिंक्य रहाणे आणि विराट कोहली लवकर बाद झाले तेव्हा रोहित आणि रैनाने आव्हानात्मक खेळ केला. तीन गडी बाद ११५ धावसंख्या असताना त्यांनी गडी बाद २३७ पर्यंत पोहोचवली. अशा प्रकारे चौथ्या गड्यासाठी त्यांनी १२२ धावांची भागीदारी करून संपूर्ण संघाचा आत्मविश्वास वाढवला.भारतीय फलंदाजीच्या दोन भरवशाच्या ‘आर’ने मिळून सामन्याची दिशा ठरवणारी अद‌्भुत भागीदारी रचली. रोहितने परिपक्व, जबाबदार खेळी केली, तर रैनाच्या कामगिरीने संघावरील दबाव कमी केला. तुम्ही क्रिकेटप्रेमी असाल आणि रॉफेल नदालचे रॅकेट पाहिले असेल, तर शतक ठोकल्यानंतर रोहित शर्माच्या स्ट्रोक प्लेची तुम्ही प्रशंसा कराल. त्याने लगावलेले शॉट्स उच्च दर्जाचे होते. मला आठवते, एक तज्ज्ञ शेफ रूमाली रोटी पलटण्यापूर्वी हवेत भिरकावण्यास कधीच विसरत नाही.
किचन स्टाफकडून ग्राहकांच्या कितीही ऑर्डर आल्या तरी तो असे करण्यास विसरत नाही. तो डिशला टेबलापर्यंत पोहोचवण्यास उशीर करतो, असा याचा अर्थ नाही. खरे म्हणजे जर त्याला अशा पद्धतीने स्वयंपाक करू दिला, तर तो अधिक वेगाने काम करायला लागतो. रोहित शर्मा गुरुवारी बांगलादेश संघाविरुद्ध याच अवतारात खेळत होता.
रोहित शर्माने केलेल्या चांगल्या सुरुवातीने भारताला मोठी धावसंख्या उभारता आली. तसेच रैनाच्या ५७ चेंडूंतील ६५ धावांचा त्यात मोठा वाटा होता. हे शेफ आणि पॅस्ट्री यांचे अत्यंत सुंदर मिश्रण होते. त्यांनी स्वत: फायर फायटरच्या भूमिकेत खेळाची पातळी उंचावली, विरुद्ध संघाला नमवले आणि १२५ कोटी लोकांची अस्वस्थता दूर केली. पुढे चालून कधीही भारतीय संघ संकटात सापडेल तेव्हा १२५ कोटी क्रिकेटप्रेमी म्हणतील, ‘रोहित और रैना अभी बाकी है.’ रैनाने अनेक सामन्यांमध्ये चांगली खेळी केली आहे. आता रोहितचाही त्या यादीत समावेश झाला आहे. जोरदार पूर्वार्धानंतर गोलंदाजांनी पुढील जबाबदारी उचलली. आतापर्यंत भारताची सर्वात मोठी ताकद गोलंदाजच ठरले आहेत.
फंडा हा आहे की...
प्रत्येक संघटनेत आणि प्रत्येक कार्यात शेफ आणि पॅस्ट्री अशा दोन लोकांची आधारभूत रूपाने गरज असते. मात्र, जेव्हा संकट दार ठोठावत असेल तेव्हा त्यांनी आपली पातळी उंचावून फायर फायटरच्या भूमिकेत आले पाहिजे. ज्या क्षणी ते म्हणतील की, हे आमचे काम नाही, त्या क्षणी ते प्रमुख होण्याची संधी गमावतील.