आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • N Raghuraman Article On Jokey Read More At Divyamarathi.com

मॅनेजमेंट फंडा - योग्य दृष्टीकोन असेल, तर दुर्दैवावर मात करता येते

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
१८ वर्षांचा बी. श्रीकांत इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होता. मात्र, ते अर्ध्यावरच सोडून तो घोडे आणि घोडेस्वारीच्या मागे लागला. श्रीकांतचा मामा घोड्यांचे प्रशिक्षण देत होता. त्याच्यामुळेच श्रीकांतला घोड्यांची आवड निर्माण झाली होती. श्रीकांतने त्याच्याकडूनच प्रशिक्षण घेतले. त्यानंतर यामध्येच करिअर बनवण्याचा निर्णय घेतला. श्रीकांतने नामवंत घोडेस्वार (जॉकी) होण्यासाठी कडक प्रशिक्षण घेणे सुरू केले. यासाठी त्याने प्रयत्नांची पराकाष्ठा केली.त्यात यशही मिळाले. त्याने काही दिवसांतच जॉकीचे लायसन्स मिळवले.
श्रीकांतने आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित केले. बंगळुरूमधून जॉकी श्रीकांतच्या करिअरची सुरुवात झाली. या व्यवसायात जगातील सगळ्यात प्रभावी हॉर्स ओनरसाठी तो स्पर्धेत भाग घेऊ लागला. त्याने कमीत कमी ३६० स्पर्धांत भाग घेतला. याबरोबरच देशात आयोजित होणाऱ्या ११ क्लासिक इव्हेंट्समध्येदेखील भाग घेतला. गत पाच वर्षे श्रीकांतच्या आयुष्यातील सोनेरी वर्ष होते.
या वर्षी १५ मे रोजी सरावादरम्यान घोड्याच्या गुडघ्याला काही त्रास झाल्याचे श्रीकांतला जाणवले. त्याने ही गोष्ट त्याच्या ट्रेनरला सांगितली. मात्र ट्रेनरने दुर्लक्ष केले. त्याच्या दोन दिवसांनंतर १७ मे रोजी एका शर्यतीत श्रीकांतच्या घोड्याचा गुडघा निखळला. हा अपघात इतका भयंकर होता की, २४ वर्षांच्या श्रीकांतच्या स्पाइनल कॉर्डमध्ये गंभीर दुखापत झाली. त्याला लकवा झाला. सहा महिन्यांपर्यंत श्रीकांतला शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागला. तो आता कधीच पायावर उभा राहणार नाही, असे प्रत्येकाला वाटू लागलेेे. अशी अवस्था कोणत्याही व्यक्तीला डिप्रेशनमध्ये जाण्यासाठी पुरेशी आहे. डॉक्टरांनी त्याची इमरजेंसी सर्जरी केली. त्यामुळे तो हळूहळू बरा होऊ लागला. शस्त्रक्रियेनंतर व्हीलचेअरवर शिफ्ट होणे किंवा कुबड्यांच्या मदतीने चालण्याचा प्रयत्न करणे श्रीकांतसाठी भयंकर अनुभव होता. कारण त्याच्या खालच्या भागात काहीही शक्ती उरलेली नव्हती.

या वाईट दिवसांत श्रीकांतच्या बॉसने त्याला एकदाही फोन करून त्याच्या तब्येतीविषयी विचारले नाही. श्रीकांत तीन वर्षांपासून त्या व्यक्तीसाठी काम करत होता. त्याच्या सर्जरीचा खर्च बंगळुरू टर्फ क्लबने उचलला. बाकीचा खर्च त्याच्या कुटुंबाने उचलला. यामुळे श्रीकांतला आणाखीनच बळकट होण्यास मदत मिळाली. डॉक्टरदेखील त्याच्या मोटिव्हेशनचे नवल करायचे. त्याने हळूहळू स्व:तला मानसिक आणि शारीरिक रूपाने उभे राहण्याचा प्रयत्न केला. शरीराने हळूहळू त्याच्या मेंदूचे ऐकणे सुरू केले.

आज श्रीकांत पुन्हा एकदा आपल्या पायावर उभा आहे. आता तो स्वत:ला चालण्यापर्यंतच मर्यादित ठेवू इच्छित नाही. त्याची इच्छा पुन्हा एकदा घोड्याची लगाम पकडण्याची आहे. मात्र, यासाठी त्याला आणखी काही दिवस लागतील. मरणाच्या दारात जाऊन आलेला श्रीकांत फक्त पॉझिटिव्ह थिंकिंग आणि सुपर विलपॉवरमुळे पुन्हा उठून बसला आहे. त्याच्या या दृष्टिकोनामुळेच तो दुर्दैवावर मात करू शकला.

यादरम्यान घरच्या लोकांनी त्याला धीर देण्याचे काम केले. त्यांच्याबरोबरच त्याच्या मित्रानेदेखील त्याला खूप मदत केली. व्हीलचेअरवर एका खोलीमध्ये बंद राहण्याऐवजी त्याच्या मित्राने त्याला बाहेर फिरायला नेले. आतापर्यंत त्याच्या मित्रांनी त्याला ऊटी, गोवा आणि कोडाईकनाल फिरवून आणले. आता श्रीकांत इंजिनिअरिंगचे अर्धवट सोडलेले शिक्षण पूर्ण करत आहे.
फंडा फंडा हा आहे की...
जर योग्य दृष्टिकोन असेल तर दुर्दैवावर मात करता येते. याबरोबरच शरीरालादेखील ते आठवण करून देत असते की, मेंदूच्या प्रत्येक आदेशाचे पालन करत जा.