आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅनेजमेंट फंडा : वर्तमानासोबत राहा, दर्जाकडे लक्ष द्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एक घटना : एमबीएझालेल्या एका विद्यार्थ्याने काही दिवसांपूर्वी एका कॉर्पोरेटला मुलाखत दिली. कॉर्पोरेटच्या एचआर संचालकांनी त्याला एका विषयावर टिपण लिहिण्यास सांगितले. २० मिनिटांनंतर त्याने टिपण लिहून दिले. त्याने इंग्रजी भाषेची अक्षरश: हत्या केल्याचे संचालकांनी पाहिले. त्याने आपल्या टिपणामध्ये एमएमएसची भाषा लिहिली होती.
उदाहरणार्थ, ‘we’ऐवजी ‘v’, तसेच २०० शब्दांच्या या टिपणात अशा प्रकारच्या २३ चुका होत्या. वस्तुत: तो अशाच भाषेसह लहानाचा मोठा झाला होता. त्यामुळे वाचणाऱ्याला ही भाषा समजत असेल तर यात चुकीचे काही नाही, असेदेखील तो मुलाखतीदरम्यान म्हणाला. ३५ मिनिटांची मुलाखत झाली, पण त्याची निवड करण्यात आली नाही. असेही नाही की, त्याच्याकडे आवश्यक अर्हता नव्हती, तर जे ‘चुकीचे’ शिकलो आहे ते सर्व ‘बरोबर’ आहे, असे त्याला वाटत होते. त्याने एक संधी गमावली होती. यात त्याची चूक नव्हती.

निरीक्षण: राष्ट्रपतीप्रणव मुखर्जी यांनी बुधवारी राष्ट्रपती भवनात केंद्रीय विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या परिषदेत दोन गोष्टी सांगितल्या होत्या. पहिली, देशाच्या उच्च शिक्षण व्यवस्थेचा कायापालट करण्याच्या प्रक्रियेचे नेतृत्व करण्याची जबाबदारी केंद्रीय विद्यापीठांची आहे. दुसरी, विद्यापीठांनी इंटरनॅशनल रँकिंगसोबतच नॅशनल रँकिंग फ्रेमवर्कच्या रेटिंगसाठी प्रयत्न करावे. राष्ट्रपती कुलगुरूंना म्हणाले की, ‘वैश्विक ट्रेंड ओळखा. हे ट्रेंड जगभरात उच्च शिक्षणामध्ये मोठे बदल घडवून आणत आहेत. आपल्या तरुण विद्यार्थ्यांना जगातील सर्वोत्कृष्ट स्पर्धकाशी सामना करावा लागेल. त्यामुळे त्यांच्यात स्पर्धेची भावना विकसित करावी लागेल आणि आपल्या देशातील संस्थांप्रती गर्वाच्या भावनेने प्रेरित करावे लागेल.’

निरीक्षण: गुजरातमधीलबहुतांश विद्यार्थ्यांमध्ये केवळ आत्मविश्वासाचीच नव्हे, तर ड्रेस सेंस आणि संवाद कौशल्याचीदेखील उणीव आहे. हे तरुण घरचे श्रीमंत आहेत. तीनदिवसीय कार्यशाळेतील वक्ते असलेल्या कंपन्यांच्या एचआर प्रमुखांनी काही निष्कर्ष काढले आहेत. ते म्हणाले की, आजचा युवक फक्त चांगल्या सुविधांची मागणी करतो. तथापि, एका कंपनीत तो सरासरी दीड ते अडीच वर्षेच टिकतो. आधुनिक एचआर व्यवस्थापकांना असे वाटते की, विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असतानाच उद्योगांशी जोडले जावे आणि प्रोफेशनल सेटअपमध्ये राहावे. विद्यार्थ्यांचे व्यावहारिक ज्ञान खूप चांगले नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

आश्चर्यकारक अहवाल : ‘सर्वांसाठीशिक्षण’ ग्लोबल मॉनिटरिंग रिपोर्ट २०१३-१४ अनुसार, जिथे ९५ टक्के विद्यार्थ्यांची एनरोलमेंट होते, त्या प्रमुख देशांमध्ये स्थान मिळवण्याकडे भारत देश वाटचाल करत आहे. मात्र, शिक्षणाच्या गुणवत्तेबाबत शिकण्या-शिकवण्याच्या संकटाचा सामना करणाऱ्या २१ देशांपैकी भारत एक आहे. भारतातील महत्त्वाकांक्षी अभ्यासक्रमाचा विशेष उल्लेख करण्यात आला. हाच अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना ठरावीक काळात व्यावहारिकतेसह काही गोष्टी शिकण्याबाबत मागे टाकत आहे. अहवालानुसार, भारतीय विद्यार्थी जसजसे उच्च वर्गात जातात, तसतशी त्यांच्या शिकण्याची प्रक्रिया खालावत जाते. भारत फाउंडेशन कौशल्याच्या बाबतीत व्हिएतनामपेक्षाही मागे आहे. विद्यार्थी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेताना हा शाळेच्या अवघड दिवसांपासून स्वातंत्र्य मिळवण्याचा काळ समजतात. महाविद्यालयात गेल्यानंतर ते कठीण परिश्रम विसरतात. आनंदी जीवनाची ४० वर्षे याच चार वर्षांच्या परिश्रमावर अवलंबून असतात, याची त्यांना जाणीव नसते.