आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅनेजमेंट फंडा - निसर्गाचे संवर्धन केल्यास जगाला मिळेल सुरक्षित भविष्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ज्योती तंत्रज्ञान क्षेत्रात नोकरी करते आणि ई-कॉमर्स रिटेल पोर्टलची एम-कॉमर्समध्ये आपली उपस्थिती नोंदवण्यासाठी मदत करते. एम-कॉमर्स म्हणजे मोबाइल अॅपच्या माध्यमातून निर्माण केलेला व्यवसाय. खरे म्हणजे 1 मेपासून आपला वेबसाइट व्यवसाय बंद करून पूर्णपणे एम-कॉमर्स बिझनेसमध्ये शिफ्ट होणारी मिंत्रा ही पहिली ऑनलाइन फॅशन रिटेलर कंपनी आहे.
इंटरनेट अँड मोबाइल असोसिएशन ऑफ इंडियाच्या मते, डिसेंबर २०१४ पर्यंत इंटरनेटचा वापर करणाऱ्यांची एकूण संख्या ३० कोटी होती. यापैकी ६० टक्के वापरकर्ते मोबाइलद्वारे इंटरनेटचा वापर करत होते.

या बदलाची सहा कारणे अशा प्रकारे आहेत. १. भारतामध्ये आयात होणाऱ्या स्मार्टफोनची संख्या २०११ मध्ये कोटी होती, ती २०१४ मध्ये कोटींपर्यंत पोहोचली. २. छोट्या शहरांमध्ये मोबाइलच्या माध्यमातूनच लोकांना इंटरनेटचा पहिला अनुभव मिळाला. ३. ३० कोटी इंटरनेट वापरकर्त्यांपैकी ६० टक्के लोकांनी मोबाइल इंटरनेटचा आधार घेतला. ४. २००८ मध्ये टक्के ग्रामस्थ इंटरनेटचा वापर करत होते. ही संख्या २०१४ मध्ये ३१ टक्के झाली. ५. २०१५ मध्ये ४.५० कोटी लोक इंटरनेटवरून खरेदी करत आहेत. त्यांची संख्या २०२० पर्यंत २२ कोटी होण्याची अपेक्षा आहे. ६. २०२० पर्यंत ३६ टक्के शॉपिंग मोबाइलवरून होण्याचा अंदाज आहे.

ज्योती आपल्या कंपनीच्या अनेक ग्राहकांना एम-कॉमर्सची माहिती देणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी एक आहे. तंत्रज्ञानाचे ज्ञान, भविष्य-दृष्टी आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून समस्या सोडवण्याची योग्यता असतानाही निसर्गाचा एखादा पर्याय विकसित करू शकेल, एवढा जगाचा विकास झालेला नाही, असा प्रबळ विश्वास ज्योतीला आहे. दररोज पहाटे ते ५.३० वाजेदरम्यान तिचे बहुतांश मित्र-मैत्रिणी जेव्हा गाढ झोपेत असतात, तेव्हा ज्योती आपली ११ वर्षीय मुलगी प्रेरणाला घेऊन बंगळुरूतील उपनगर मल्लेश्वरमच्या गल्ली-बोळात सायकलवर पेडल मारताना दिसते. तुम्हाला आश्चर्य वाटेल की, तिच्या सायकलवर झाडू आणि बास्केट लावलेली असते.
रस्त्यावर जिथे-कुठे वाळलेली पाने दिसल्यास ती थांबून गोळा करते आणि बास्केटमध्ये टाकून वाजण्यापूर्वी घरी परतते. पानगळीचा हा ऋतू ज्योतीसारख्या बायोमास कलेक्टर्ससाठी उत्सवाचा काळ आहे. आपण येण्यापूर्वीच गल्ली साफ होत असल्याचे सफाई कर्मचाऱ्यांनादेखील आश्चर्य वाटते. गोळा केलेला बायोमास ज्योतीच्या घराच्या मागील भागात तयार करण्यात आलेल्या बाय १० चौरस फुटाच्या खड्ड्यामध्ये टाकला जातो. नंतर त्यावर पाणी टाकले जाते. कल्चरिंगची ही प्रक्रिया सहा ते आठ महिने चालते. अशा प्रकारे तयार होणारे कंपोस्ट खत बागकाम आणि इतर गोष्टींसाठी वापरले जाते. पानगळीचा दुसरा ऋतू सुरू होतो तेव्हा ही प्रक्रिया पुन्हा सुरू होते. त्यांच्यापासून प्रेरणा घेत कॉलनीतील अनेक लोकांनी कंपोस्टिंग पॉइंट तयार केले आणि वाळलेली पाने फुलांपासून कंपोस्ट खताची निर्मिती करण्यास सुरुवात केली.
बायोमास सकाळी लवकर गोळा करण्याची खबरदारी कॉलनीतील लोक घेतात. कारण हा कचरा रस्त्यावरच पडून राहिला तर बहुमोल कंपोस्ट खतापासून ते वंचित राहतील. निसर्ग चांगले साधन आहे आणि बायोमास रस्त्याच्या कडेला जाळण्यासाठी सोडून देण्यात कोणताच अर्थ नाही, असे ज्योतीला वाटते. दररोज ४०० घरे असलेल्या कॉलनीतील लोक चार कारमध्ये बायोमास गोळा करतात आणि कंपोस्ट खताच्या निर्मितीमध्ये त्याचा चांगला उपयोग होण्याच्या दृष्टीने खबरदारी घेतात. या रसायनमुक्त खतापासून ते भरपूर भाज्यांची लागवड करतात.

फंडा हा आहे की...

करिअर वृद्धीसाठी तंत्रज्ञानाचा वापर करणे योग्य आहे, परंतु यासोबतच निसर्गाची देखभाल केल्याने या जगाला टिकाऊ आणि निरोगी भविष्य मिळू शकेल.