आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • N Raghuraman Article On Security Read More At Divyamarathi.com

मॅनेजमेंट फंडा - भावी पिढीच्या कल्याणासाठी दूरदृष्टी, तयारी आणि संरक्षण गरजेचे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘जब आपका बच्चा मरता है, तब आप उसे दिल में दफन करते है, वह तभी मरता है जिस दिन आप दुनिया छोडते हैं,’ हे वाक्य पश्तो वृद्धाने एका चॅनेलवर सांगितले. मंगळवारी दिवसभर मी पाकिस्तानातील पेशावर येथील सैनिकी शाळेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या बातम्या पाहत होतो. केवळ हेच वाक्य माझ्या मनात बसले नाही, तर आणखी एका माणसावर माझे दिवसभर लक्ष होते. कारण बहुतांश वडील रडत होते. जसे एका चित्रपटात वृद्ध व्यक्तीला रडताना दाखवले होते. ती व्यक्ती होती ए. के. हंगल. ‘शोले’मध्ये त्यांची छोटीशी, पण महत्त्वाची भूमिका होती. त्यांचा तो संवाद आजही आठवतो. या संवादाची तीव्रता तेव्हासुद्धा तेवढीच होती, जेव्हा मी १९७५ मध्ये मुंबईतील मिनर्व्हा थिएटरमध्ये हा चित्रपट पाहिला होता. या थिएटरमध्ये हा चित्रपट अनेक वर्षे चालला आणि विक्रमही केला. त्यांचा संवाद होता,
‘जानते हो जिंदगी में सबसे बडा बोझ क्या होता है, बाप के कंधेपर बेटे का जनाजा. सिर्फ वही इसे समझ सकता है जिसने अपने बेटे के शव को अपने कंधे पर उठाया है.’
पॅरामिलिटरी गणवेश घातलेले दहशतवादी सैनिकी शाळेमध्ये मागच्या बाजूने शिरले. तेथे सैनिकी अधिकाऱ्यांची आणि सामान्य नागरिकांची मुले होती. तिथे दहशतवादी पायऱ्यांवरून भिंतीवर आले आणि त्यांनी तार कापले. आत शिरले आणि मुलांवर गोळ्या झाडल्या, ग्रेनेडही फेकले. मृतांमध्ये १४१ पैकी १३२ मुले आहेत. यापैकी आत्मघातकी असलेल्या सहा दहशतवाद्यांनी गोळ्यांचा वर्षाव केला. नंतर एकाने स्वत:ला गोळी मारून ठार केले. उर्वरित स्पेशल सर्व्हिस ग्रुपमधील जवानांच्या हातून मारले गेले. आम्ही १५ मिनिटांमध्ये घटनास्थळी पोहोचलो होतो, असा दावा क्विक रिस्पॉन्स टीमने केला. शाळेच्या ऑडिटोरियममध्ये सर्वाधिक मुले मारली गेली. त्या वेळी एक प्रशिक्षक मुलांना प्रथमोपचाराचे प्रशिक्षण देत होता. आपले हे प्रशिक्षण काही वेळातच वाया जाणार आहे, हे त्याला माहीत नव्हते.

दहशतवाद्यांनी यापूर्वीदेखील असे हल्ले केले आहेत. २००४ मध्ये ३२ चेचेन दहशतवाद्यांनी रशियातील शाळेवर हल्ला करून ३०० लोकांना ठार मारले होते. त्यांनी सलग तीन दिवस १८६ मुलांना ओलिस ठेवले आणि ठार मारले. ऑक्टोबर २०१२ मध्ये दहशतवाद्यांनी स्वात खोऱ्यामध्ये शाळेची बस थांबवून तुमच्यापैकी मलाला कोण आहे लवकर सांगा, नाहीतर तुम्हाला गोळ्या घालून ठार केले जाईल, असे विचारले. नंतर मलालाची ओळख पटताच तिच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. आज ती नोबेल शांतता पुरस्कार विजेती आहे. १५ एप्रिल २०१४ रोजी रात्री २७६ मुलींचे नायजेरियातील शाळेतून अपहरण करण्यात आले. नंतर त्यांचा धर्म बदलल्याचे आणि त्यांच्यासोबत लग्न केल्याचे त्यांनी कबूल केले.

दहशतवादाचा धोका संपूर्ण जगाला आहे. बिनकामाच्या बंधनांमध्ये बांधलेल्या समाजाला एकजूट व्हावे लागेल. संरक्षक भिंती, दरवाजे, मुख्य प्रवेशद्वार आणखी मजबूत करावे लागतील. पेशावर हल्ल्याने आपल्याला जागृत होण्यास सांगितले. आता संपूर्ण मानवतेने जागृत झाले पाहिजे. कारण जिथे जनावरे आपल्यापेक्षा चांगले जीवन जगत आहेत, अशा युगात आपण जगत आहोत. आपला सामाजिक स्तर खालावत चालला आहे. दहशतवाद एका बंद घरासारखा आहे. कोणत्याही सुरक्षा एजन्सीज गणवेश आणि लाठी घेऊन आपल्या समाजाची सुरक्षा करू शकत नाहीत. सामान्य व्यक्तीपासून ते पोलिस, क्विक रिस्पॉन्स टीमपर्यंत, स्पेशल सिक्युरिटी फोर्स कमांडोपर्यंत सर्वांवर दूरदृष्टी दाखवण्याची, तयारी करण्याची असे हल्ले रोखण्याची जबाबदारी आहे.
फंडा हा आहे की...
जोपर्यंत समाजामध्ये भिंती, बंधने असतील तोपर्यंत धोका कायम राहील. त्यामुळे भावी पिढीच्या कल्याणासाठी दूरदृष्टी दाखवण्याची, तयारी करण्याची आणि त्यांना संरक्षण देण्याची मोठी जबाबदारी आपल्यावर आहे.