आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Special Article On Success By N Raghuraman Read More At Divyamarathi.com

मॅनेजमेंट फंडा - यशासाठी हवी फक्त एक कला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुम्ही जगाला कसे आकर्षित करणार? सर्वात शक्तिशाली व्यक्ती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्याप्रमाणे की गल्लीतील एखाद्या निनावी गरिबाप्रमाणे? यासाठी जगातील खूप कमी लोकांकडे असलेले एक कौशल्य हवे. खालील दोन कथांमधून त्या गोष्टी सिद्ध होतात.

पहिली कथा : २०१०मध्ये अमेरिकेच्या प्रथम महिला मिशेल ओबामा दिल्लीला आल्या होत्या तेव्हाची गोष्ट आहे. रहिमच्या खेळण्यांच्या दुकानातून मिशेल यांनी चमकणारी रंगीत केस असलेली खेळणी विकत घेतली होती. आज ३६ वर्षीय रहिम खानने मोठ्या दिमाखात तयार केलेली नारंगी रंगाची फुलदाणी व्हाइट हाऊसला पाठवली आहे. रहिमने दोन फुटांची ही फुलदाणी बनवण्यासाठी २४ तास थांबता काम केले. तसेच त्याने १५ खेळणीदेखील सजवली असून ती दिल्ली दौऱ्यावर आलेल्या ओबामा यांना भेट म्हणून दिली आहे. या भेटवस्तूंमध्ये दोन फुलदाण्या, वीणाचे मॉडेल आणि एक छोटी तोफ आहे.

कर्नाटकातील चन्नापटना येथील रहीमला जेव्हा खेळण्यांची ऑर्डर मिळाली आणि सांगण्यात आले की, त्या खास ओबामांसाठी आहेत, तेव्हा आपली मेहनत फळाला आली एवढेच त्याला वाटले नाही, तर या कामासाठी आपली निवड करण्यात आली, हा विचार करूनच तो खूप उत्साहित झाला होता. कारण त्याच्याकडे असलेल्या कौशल्याचे त्याने प्रामाणिकपणे चीज केले आहे. रहिमची खेळणी जैविक असून ती नॉन टॉक्सिक ‘चन्नापटना खेळणी’ म्हणून प्रसिद्ध आहेत. ही खेळणी फक्त कन्हेराच्या लाकडापासूनच तयार केली जातात. यामध्ये रसायनांचा वापर होत नाही. यावर भाज्यांचे रंग लावले जातात. त्यामुळेच बहुतांश विदेशी पर्यटक चन्नापटना खेळणीच पसंत करतात. योगायोगाने ही खेळणी मिशेल ओबामा यांच्या आवडीची झाली आहेत. रहिमला वाटते की, नॉन टॉक्सिक वस्तूंच्या बाबतीत जनजागृती करण्यासाठी एवढे पुरेसे नाही. मिशेल ओबामांची ही भेटवस्तू आणखी कशी जनजागृती करू शकेल, याबाबत रहिम उत्सुक आहे.
दुसरी कथा : सी.सुबय्या ‘चकली’ बनवतात आणि दोन चकल्या दीडशे रुपयांमध्ये विकतात. त्यांच्या यशाचे रहस्य मऊ कणकेमध्ये दडलेले आहे. तांदळाचे पीठ, उडदाची डाळ, मीठ, तीळ आणि जिरे यांचे योग्य मिश्रण आणि त्याची कणिक मळल्यानंतर ३० मिनिटांच्या आत चकल्या तळल्या जातात. त्या गेल्या अनेक दशकांपासून चकल्या बनवत आहेत. तामिळनाडूतील मदुराईजवळील ४० हजार लोकसंख्या असलेल्या पुडोकोट्टाई गावामध्ये लोक चकल्यांसाठी सुबय्या यांचा शोध घेतात.
आज त्यांची कंपनी आहे. ही कंपनी दररोज १२० किलो स्नॅक्स बनवते. त्यांच्याकडे दक्षिण भारतीय स्नॅक्सचे अनेक प्रकार असून ते सर्व अमेरिकेपासून ते सौदी अरब, सिंगापूर आणि मलेशियापर्यंत प्रसिद्ध आहेत. या देशातील लोक लग्न सोहळा किंवा इतर समारंभांसाठी त्यांना ऑर्डर पाठवतात. मदुराई चेंबर ऑफ कॉमर्सने चकल्या बनवण्यासाठी स्वतंत्र विभाग बनवला आहे. येथे येणाऱ्या लोकांना सुबय्या यांची झोपडीसारखी दिसणारी कंपनी दाखवली जाते. या व्यवसायामध्ये तीन दशकांपासून असतानाही सुबय्या यांचे लक्ष कॅश बॉक्सवर नव्हे, तर स्वयंपाकघरात असते.
फंडा हा आहे की...
जर तुमच्याकडे खास कला आहे आणि ती जगातील फार कमी लोकांकडे असेल, तर तुम्ही सहजपणे जीवनात यश मिळवू शकता. केवळ त्या कलेला आणखी फुलवण्याची-तासण्याची आवश्यकता आहे.