आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅनेजमेंट फंडा - प्रोत्साहनात असते अकल्पनीय ताकद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिक्षणाच्या बहुतांश क्षेत्रात जेव्हा एखादा तरुण उत्कृष्ट कामगिरी करतो तेव्हा जग त्याच्या ज्ञानाचे कौतुक करते आणि त्याची पाठ थोपटते. मात्र, जेव्हा एखादा विद्यार्थी परफॉर्मिंग आर्टच्या क्षेत्रात यश मिळवतो तेव्हा त्याच्या मॅमेजमेंट फंडा - प्रोत्साहनात असते अकल्पनीय ताकद

‘दिव्य शक्तीं’ना भय आणि आश्चर्याच्या नजरेने पाहिले जाते. कारण जगाचे असे म्हणणे आहे की, इतर क्षेत्रांमध्ये यश मिळवण्यासाठी विषयाचा सखोल अभ्यास करावा लागतो, तर परफॉर्मिंग आर्टमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी आपल्याच मनात जास्तीत जास्त खोल उतरावे लागते.
गेल्या रविवारी मी मुंबई येथे त्रिचुर ब्रदर्स श्रीकृष्ण मोहन आणि रामकुमार मोहन यांचे कर्नाटक संगीत गायन ऐकले. त्यांना व्हॉयोलिन, मृदंग आणि घातम (मडके) वर इतर तीन कलावंत साथ देत होते. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी सूत्रसंचालकाने समूहाच्या सर्व सदस्यांची ओळख करून दिली आणि त्यांच्या कौशल्याबाबत माहिती दिली. त्यानंतर शाल देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर कार्यक्रम सुरू झाला.
कलावंतांनी आपापली वाद्ये तपासून घेतली आणि ध्वनी व्यवस्था पाहणाऱ्या लोकांनी गायकांच्या अनुसार माइकचा आवाज ठीक केला. यादरम्यान समूहाचे प्रमुख श्रीकृष्ण मोहन यांनी नऊ वर्षांच्या एका मुलाची ओळख करून दिली. तो व्हॉयोलिन वादकाच्या मागे लपलेला होता आणि प्रेक्षकांपैकी कुणाचेच लक्ष त्याच्याकडे गेले नव्हते. तो व्हॉयोलिन वादकाचा मुलगा होता. ओळख करून दिल्यानंतर श्रीकृष्ण यांनी मुलासाठी टाळ्या वाजवल्या. कारण मुलाने आपले आयुष्य कर्नाटक संगीताला समर्पित करण्याचा निर्णय घेतला होता. जणूकाही टोनी ग्रेग, सचिन तेंडुलकर यांचा परिचय करून देत आहे, याप्रमाणे त्यांनी आपल्या मुलाची ओळख करून दिली. त्यामुळे मुलासाठी जोरदार टाळ्या वाजल्या.

त्या मुलास आपला परफॉर्मन्स सादर करण्यापूर्वी मंचावर कसे वागावे, याचे प्रशिक्षण दिले जात होते. सध्या तो फक्त नऊ वर्षांचा आहे. संगीताच्या सागरात ‘पोहण्या’साठी उतरण्यापूर्वी त्याने मंचावर कसे वागावे, याबाबत अनेक प्रकारचे प्रशिक्षण घेतलेले आहे. १५० मिनिटांच्या कार्यक्रमादरम्यान प्रत्येक गाणे आपल्या भावासोबत गाण्याचे श्रीकृष्ण यांनी ठरवले. ते आपल्या विशिष्ट अंदाजात इतर कलावंतांची प्रशंसादेखील करत होते. सोबतच सहकलावंतांसाठी हात उंचावून प्रेक्षकांना टाळ्या वाजवण्यासाठी प्रेरितही करत होते. यादरम्यान एका गोष्टीकडे कदाचित कोणीच लक्ष दिले नसावे. प्रत्येक प्रशंसेदरम्यान श्रीकृष्ण प्रत्येक कलावंतांच्या डोळ्यांत पाहत होते. त्यानंतर ते त्या मुलाकडे पाहत होते. ते आपल्या डोळ्यांच्या भाषेत जे काही म्हणायचे ते फक्त त्यांच्याच डोळ्यांना समजायचे.
संवादाची ही अद्भुत कला असून त्यामध्ये एकही शब्द बोलला जात नाही. जेव्हा श्रीकृष्ण मुलाकडे पाहायचे, तेव्हा तो आपली मान हलवायचा आणि सोबत त्याच्या डोळ्यांचे हसू दिसायचे. जणूकाही तो म्हणत असावा, ‘होय, मला समजले आहे आणि मी याचा अभ्यास सुरू केला आहे.’

कर्नाटक संगीत एक मधुर काव्य आहे, कथा सांगण्याच्या कलेचा वाहक, समाजाला संघटित करणारी ताकद आणि निश्चितच कला-प्रेमी कलावंतांचा मंचदेखील आहे. मात्र, हे भावी पिढीच्या तरुण कलावंतांना प्रोत्साहित करून त्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करण्याचा मंचदेखील असल्याचे मला समजले. संगीत वेगवेगळ्या लोकांमध्ये वेगवेगळ्या भावना जागृत करते. संगीताचा आस्वाद घेत असताना आपण निर्विवादपणे अशा भावनेत बुडालेलो असतो ज्याचे वर्णन केले जाऊ शकत नाही. प्रोत्साहन शिक्षणाच्या कोणत्याही दुसऱ्या पद्धतीपेक्षा जास्त वेगाने काम करत असल्याचा धडा मला त्या कार्यक्रमातून मिळाला.
संपूर्ण कार्यक्रमादरम्यान तो लहान मुलगा मुक्त भावनेने प्रत्युत्तर देत राहिला आणि आपल्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा आस्वाद घेत राहिला. कारण ज्या प्रोत्साहनाची त्याला गरज होती, ते त्याला आपल्या वडिलांच्या डोळ्यांमधून मिळत होते.
फंडा हा आहे की...

अत्यंत सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे, प्रोत्साहन, चर्चा आणि इशाऱ्यामध्ये एवढी ताकद आहे की, आपण कदाचित त्याची कल्पनाही करू शकत नाही.