आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅनेजमेंट फंडा - दुधारी तलवारीप्रमाणे असते तंत्रज्ञान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पहिली कथा : सर्वजण नवी दिल्लीचेच आहेत. पश्चिम बिहारचा अमित जाजोरिया बीटेक असण्यासोबतच आयटी कंपनीचे मालक आणि चांगली कमाई करणाऱ्यांपैकी आहेत. भानू शर्मा तेवढेच संपन्न आणि व्यवसायाने बीपीओ एक्झिक्युटिव्ह आहेत. संदीप शर्मा निहाल विहारचे करिअर काउंसेलर आहेत. ते तरुणांना प्रामाणिकतेसह विकासाचा मार्ग दाखवतात. मात्र, हे हाय प्रोफाइल प्रोफेशनल्स लवकर पैसा कमावण्याच्या आकर्षणातून सुटले नाहीत.
तिघेही मिळून लोकांकडून त्यांचे क्रेडिट कार्ड आणि अकाउंटचा डाटा मिळवायचे आणि त्याचा वापर ऑनलाइनवर गॅझेट्स इतर महागड्या वस्तु खरेदी करण्यासाठी करायचे. ते एवढे चतुर होते की, प्रत्येक गुन्ह्यात वेगळ्या मोबाइल क्रमांकाचा वापर करत विविध बोगस पत्त्यांवर डिलिव्हरी घेऊन पोलिसांना गुंगारा देत राहिले. त्यांनी एक ऑर्डर देण्यामध्ये एकाच ई-मेलचा दोनदा वापर केला आणि पकडले गेले. डिल्हिव्हरी बॉयच्या रूपात गेलेल्या पोलिसांनी एका आरोपीला जेव्हा तो दिल्लीतील डिफेन्स कॉलनीतील बंगल्यातून बाहेर आला तेव्हा पकडले. त्याच्या आधारे इतर दोघेही पकडले गेले.
दुसरी कथा : एका शिक्षण केंद्रातील कर्मचारी गुजरात बोर्डाच्या १२ वीच्या जीवशास्त्राची प्रश्नपत्रिका लीक करण्यामध्ये सहभाग असल्याची शंका २० मार्च २०१५ रोजी गुजरातमधील शिक्षणाधिकाऱ्याला आली. कर्मचाऱ्यांनी अशा प्रकारे लीक केली की, विद्यार्थ्यांना तयारी करून परीक्षा देण्यासाठी वेळ मिळाला आणि कुणालाही याचा थांगपत्ता लागला नाही. संशयितांनी अत्यंत सफाईदारपणे हे काम केले होते. ते आसपासच्या कोणत्याच झेरॉक्स दुकानावर गेले नाही. तसेच निश्चत वेळेपूर्वी परीक्षा हॉलच्या बाहेरसुद्धा आले नाही. असे असतानाही अशा प्रकारच्या आधी झालेल्या पेपर फुटी प्रकरणांमध्ये वापरण्यात आलेल्या पद्धतींचा अवलंब करतादेखील त्यांनी काही खास विद्यार्थ्यांपर्यंत यशस्वीपणे प्रश्नपत्रिका पोहोचल्याची शंका होती. त्यांनी मोबाइल कॅमेऱ्याने प्रश्नपत्रिकेचा फोटो काढून व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली. या गुन्ह्याचा शोध घेण्यासाठी गुजरातच्या खोखरा पोलिसांनी व्हॉट्सअॅपला ई-मेल पाठवून मदतीची विनंती केली आहे. कॅलिफोर्निया येथील कंपनी आता फोटो अपलोड करणाऱ्या आणि ते रिसिव्ह करणाऱ्यांचा तपशिल देऊन तपासकामी मदत करेल. त्यानंतर हा फोटो अनेक विद्यार्थ्यांपर्यंत कसा पोहोचला, याचा फॉलो चार्ट बनवेल.

तिसरी कथा : इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल)चे आयोजक आणि बंगळुरू पोलिसांनी प्रसिद्ध चिन्नास्वामी स्टेडियमच्या २० प्रवेशद्वारांवर कॅमरे लावले आहेत. हे कॅमेरे तेथे येणाऱ्या ३८,००० प्रेक्षकांपैकी प्रत्येकाचा फोटो काढतील. पोलिसांच्या डाटाबेसमध्ये असलेल्या अशा प्रकारच्या आयोजनांमध्ये गोंधळ घालणाऱ्या १० हजार लोकांशी या फोटोंचा मेळ घातला जाईल. रियल टाइम फेस डिटेक्शन सॉफ्टवेअरच्या मदतीने फोटोचा मेळ बसवून जर एखादा गोंधळ घालणारा आढळला तर पोलिसांना अलर्ट करण्यामध्ये अवघे दोन मिनिटे लागतील. यामुळे संशयिताला स्टेडियममध्ये आपल्या सीटवर बसण्यापूर्वीच पकडले जाईल. ड्रोन कॅमेरे संपूर्ण सामन्यादरम्यान पोलिसांना लाइव्ह फीड पाठवतील, जेणेकरून त्या उपद्रवींची ओळख पटवणे शक्य होईल.

स्थानिक कंपनीने हे सॉफ्टवेअर विकसित केले असून २०१२च्या बॉम्बस्फोटानंतर या कंपनीसोबत अशा प्रकारच्या व्यवस्थेसाठी करार करण्यात आला आहे. वापरकर्त्याचे जीवन सोपे बनवणे, हा तंत्रज्ञानाचा पायाभूत सिद्धांत आहे. मात्र, याच तंत्रज्ञानाचा वापर गुन्ह्यांसाठी केला जात असेल तर हेच तंत्रज्ञान पोलिस आणि सुरक्षा एजंसीजसाठी गुन्ह्यांचा भंडाफोड करणे सोपे करते.
फंडा हा आहे की...
तंत्रज्ञान दुधारी तलवार आहे. कारण आपल्या प्रवासात हे मागे खूण सोडते आणि आवश्यकता पडल्यास याच्या आधारे एखाद्या घटनेचा शोध लावण्यातही मदत मिळू शकते.