आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅनेजमेंट फंडा - कल्पना व तंत्रज्ञानाची सांगड घाला अन् अब्जाधीश व्हा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्रेन चेस्की आणि जो जेबिया ऑक्टोबर २००७ मध्ये सन फ्राॅन्सिस्को शहरात स्थायिक झाले होते. मात्र, मोठ्या हॉटेलचे भाडे देण्याची त्यांची ऐपत नव्हती. त्यांनी लिव्हिंग रूममध्ये एअर मॅट्रेस लावून तीन पाहुण्यांची व्यवस्था केली आणि त्यांना घरीच बनवलेला नाष्टा दिला. या वेळी घेण्यात आलेल्या एका परिषदेत लोकांनी महागड्या हॉटेल्सच्या तक्रारींसह शहरात कोणतीच पर्यायी व्यवस्था नसल्याचे सांगितले. हे ऐकून त्यांना एक कल्पना सूचली.
आपल्या घरातील रिकामी जागा भाड्याने देण्यास तयार असणाऱ्या लोकांशी त्यांनी चर्चा केली. त्यांनी ‘चांगल्या’ पाहुण्यांची हमी घेतली. तसेच पर्यटकांसमोर राहण्यासाठी साध्या आणि चांगल्या जागेचा प्रस्ताव ठेवला. एक संकेतस्थळ तयार केले आणि व्यावसायिक पर्यटकांसाठी लिव्हिंग क्वार्टरची ऑफर दिली. नाष्ट्याशिवाय त्यांनी परिषदेला येणाऱ्यांसाठी बिझनेस नेटवर्किंगची संधीही उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव ठेवला.
महागड्या हॉटेल्समध्ये खोली बुक न करू शकणारे हे सर्व लोक होते. फेब्रुवारी २००८ मध्ये हार्वर्ड ग्रॅज्युएट अँड टेक्निकल आर्किटेक्ट नॅथन ब्लेचरजिक एअरबेड अँड ब्रेकफास्ट डॉट कॉमच्या तिसऱ्या संस्थापकाच्या रूपात जोडले गेले. राहण्याच्या पर्यायी व्यवस्थेसंदर्भातील मोठ्या कार्यक्रमांवर कंपनीने लक्ष केंद्रित केले होते. हे संकेतस्थळ ११ ऑगस्ट २००८ रोजी औपचारिकरीत्या लाँच करण्यात आले.

मार्च २००९ मध्ये संकेतस्थळाचे नाव बदलून एअरबीएनबी डॉट कॉम असे करण्यात आले. त्यानंतर या संकेतस्थळावर एखाद्या घरातील खोलीपासून ते घर, अपार्टमेंट, किल्ला, महाल, नौका, हाऊस, ईगलू, खासगी बेट आणि इतर स्थावर मालमत्तांची माहिती देण्यास सुरुवात केली. एक वर्षानंतर चेस्की आणि जेबिया यांच्या लॉफ्ट अपार्टमेंट (राहण्यासाठी वापर करण्यात येणारी औद्योगिक इमारत) मध्ये १५ लोक काम करायला लागले. कर्मचाऱ्यांसाठी त्यांनी आपले बेडरूमही दिले. नोव्हेंबर २०१२ मध्ये त्यांनी ऑस्ट्रेलिया, थायलंड, इंडोनेशिया आणि सिंगापूरमधून व्यवसाय सुरू केला. तत्पूर्वी नोव्हेंबर २०१० मध्ये ७२ लाख डॉलर निधी गोळा केला. जुलै २०१४ मध्ये संकेतस्थळाला आकार देण्यात आला.

एअरबीएनबी संकेतस्थळ खुल्या बाजारातील उपलब्ध प्लॅटफॉर्मच्या मॉडेलवर चालते. येथे यजमान आणि प्रवाशांना एकमेकांशी जोडले जाते आणि त्यांच्यातील व्यवहारांसाठी मदत केली जाते. पारंपरिक हॉटेल्सच्या विरोधात ही कंपनी क्षमता वाढवून नव्हे, तर यजमान आणि प्रवाशांची संख्या वाढवून आपला व्यवसाय वाढवते. आज एअरबीएनबीची बार्सिलोना (स्पेन), बर्लिन (जर्मनी), कोपनहेगन (डेन्मार्क), डबलिन (आयर्लंड), लंडन (युके), मिलान (इटली), मॉस्को (रशिया), पॅरिस (फ्रान्स), सनफ्रांसिस्को (अमेरिका), साओ पावलो (ब्राझील), सिंगापूर आणि सिडनी (ऑस्ट्रेलिया) इत्यादी १२ ठिकाणी कार्यालये आहेत.

कंपनीची कमाई बुकिंगवर मिळालेल्या सेवा शुल्कातून होते. बुकिंगच्या किमतीच्या हिशेबाने ६ ते १२ टक्क्यांपर्यंत हे शुल्क असते. कंपनी यजमानांकडूनही एका पाहुण्यामागे ३ टक्के शुल्क क्रेडिट कार्ड प्रोसेसिंगसाठी घेते. युजरला रजिस्ट्रेशन करून ऑनलाइन प्रोफाइल तयार करावी लागते. प्रत्येक मालमत्ता एखाद्या यजमानाशी संबंधित असते. त्याच्या प्रोफाइलमध्ये यापूर्वी सेवा घेणाऱ्यांच्या शिफारसी, यजमानांचे मत आणि रिस्पॉन्स रेटिंग असते. संकेतस्थळावर प्रायव्हेट मेसेजिंगची व्यवस्थाही आहे. कंपनीकडे १९२ देशातील ३४ हजार शहरांमध्ये ६ लाख लिस्टिंग असून आतापर्यंत १.१० कोटी लोकांना सेवा दिली आहे. एप्रिल २०१४ मध्ये म्हणजेच कंपनी सुरू होण्याच्या सात वर्षानंतर कंपनीचे १० अब्ज डॉलरची कंपनी, असे मूल्यांकन करण्यात आले आहे. हे मूल्यांकन आंतरराष्ट्रीय हॉटेल साखळी हाएट हॉटेल्स कॉर्पोरेशनपेक्षा जास्त आहे. या कॉर्पोरेशनची व्हॅल्यू ८.४ अब्ज डॉलर आहे. त्यांनी हे सर्व कोणतीही इमारत, हॉटेल किंवा मोटेल नसताना करून दाखवले आहे.

फंडा हा आहे की...

पैसा कमावण्याला कोणतीच मर्यादा नाही. फक्त एखाद्या कल्पनेची तंत्रज्ञानाशी कशी सांगड घालता येईल, हे तुम्हाला माहीत असले पाहिजे.