आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Special Article On Traffic Rule By N Raghuraman Read More At Divyamarathi.com

मॅनेजमेंट फंडा - परिणाम हवे असतील तर जुनी धारणा तोडा, नवा गणवेश घाला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सार्वजनिक जीवनातील कथा : आपल्या समोरजर एखादे वाहन वाहतूक नियम तोडत असेल, तर आपल्यापैकी किती लोक काय करतील? बहुतांश लोक काहीच करणार नाहीत. आपल्याला या गोष्टीचा राग येईल, परंतु आपण पुढे जाऊ. पुन्हा कोणीतरी नियम तोडणार आणि आपण पुन्हा त्याचा राग करणार. शहरातील प्रमुख चौकांमध्ये होणाऱ्या वाहतूक कोंडीचे मुख्य कारण वाहनचालक असल्याचे माहीत असतानाही आपण काहीच करत नाही. अशा लोकांना कोणताच दंड आकारला जात नाही. हे लोक दररोज नियम तोडत असतात. त्यामुळे या भानगडीत का पडावे, असा आपण विचार करतो.

आपल्या भागातील वाहतूक कोंडीचे कारण शोधण्यासाठी बंगळुरू शहरातील ३६ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर विनोद राजारामन स्वत:ला ट्रॅफिक वॉर्डनच्या रूपात नामांकित केले. ड्यूटी संपल्यानंतर तो स्वेच्छेने वाहतूक पोलिसांसारखा गणवेश घालून वाहतूक सुरळीत करत असे. त्याने वाहतूक पोलिसांकडून प्रशिक्षणही घेतले होते. यादरम्यान त्याला व्हाइट फिल्ड भागात अवैध आणि बेहिशेबी वाहने आढळली. या भागात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या जास्त आहेत. विनोदने प्रत्येक गाडीचा क्रमांक, तिची येण्याजाण्याची वेळ नोंदवली. बरेच दिवस त्यांनी या नोंदी करून एक अहवाल तयार केला. त्याने हा अहवाल परिवहन विभागाकडे सुपूर्द केला आणि या वाहनांवर कारवाई का केली नाही, अशी त्यांना विचारणा केली. नंतर तो शहर परिवहन विभागप्रमुखांकडे गेला. त्यांच्या ट्रान्सपोर्ट कंपनीला १७० कोटी रुपयांचा तोटा का सहन करावा लागत आहे, याबाबत सांगितले. तसेच ट्रान्सपोर्ट कंपनीप्रमाणे लोकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाणाऱ्या वाहनांची यादी दिली. यामुळे शहराची वाहतूक व्यवस्था कोलमडल्याचेही त्याने सांगितले. त्यानंतर त्याने परिवहन आयुक्त, परिवहनमंत्री आणि वाहतूक पोलिसांना वेळेत कारवाई करण्याच्या मागणीचे पत्र पाठवले.
विनोदने "बंगळुरूमध्ये बेकायदेशीर आणि पर्यायी वाहतूक व्यवस्था' या नावाने पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन तयार केले. बेकायदेशीर वाहतुकीमुळे सरकारचे किती नुकसान होत आहे, हे या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून त्याने पटवून दिले. हे प्रेझेंटेशन त्याने सर्वांना पाठवले. प्रत्येक प्रकरणात त्याच्याकडे पुराव्यादाखल छायाचित्रे होती. अशा प्रकारच्या ठोस प्रकरणाकडे कोणीही कानाडोळा करणे कठीण होते. अधिकाऱ्यांनी याच महिन्यापासून बेकायदेशीर पब्लिक ट्रान्सपोर्टची वाहने जप्त करण्यास सुरुवात केली. विनोदने पुरवलेल्या माहितीच्या आधारे वाहतूक पोलिसांची विशेष टीम सज्ज तर झालीच, पण परिवहन विभागही वाहतूक सुरळीत करण्यासाठी त्यांची मदत करायला लागला. नागरिकांनी आता जागृत झाले पाहिजे, असे विनोदला वाटते.

खासगी जीवनातील कथा : जेसी जॉबने सहा महिन्यांची गरोदर असताना आपल्या आयुष्याची नवी सुरुवात केली. बाळाचा जन्म झाल्यानंतर सर्वकाही ठीक होईल, असा विचार तिने केला. ती इतर महिलांसारखी शांत बसली नाही. तिने दारुड्या पतीला सोडण्याचा निर्णय घेतला. तिने आपल्या पायावर उभे राहण्याचा निश्चय केला. ती शेतकरी कुटुंबातील आहे. तिने आपली एक एकर जमीन कसण्यास सुरुवात केली. काही महिलांना सोबत घेऊन १२ एकर जमीन भाड्याने घेतली. त्यावर कारल्याचे पीक घेतले. गेल्या वर्षी तिला साडेतीन लाखांचे उत्पन्न झाले. कारली निर्यात केली. काही वर्षांमध्ये तिने शेती व्यवसायातून ८०० चौरस फुटांचे घर बांधले. स्कूटर, कारही खरेदी केली
फंडा हा आहे की...
तुम्हाला खरोखरच परिणाम हवे असतील तर जुनी धारणा तोडावी लागेल आणि नवा गणवेश घालावा लागेल.