आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅनेजमेंट फंडा - कमी शिक्षित लोकही व्यवस्था बदलू शकतात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई-पुणे द्रुतगतीमहामार्गावर पुण्यापासून २५ किलोमीटरवर हिंजेवाडी आहे. येथे आयबीएम, इन्फोसिस, विप्रो, टेक महिंद्रा, एचसीएलसारख्या आयटी कंपन्या, आयडियासारखी टेलिकॉम कंपन्या आणि मेरिअट आणि सयाजीसारख्या प्रसिद्ध हॉटेल्स आहेत. या सर्व कंपन्या येथील १८ गावांतील जमिनीवर उभ्या आहेत. या कंपन्यांतील कर्मचारी आपली मुले शिक्षणासाठी पुण्यात पाठवतात. कारण, पुणे हे महाराष्ट्राचे शैक्षणिक केंद्र म्हणून ओळखले जाते.
या कंपन्यांमुळे येथील अर्थचक्र गतिमान झाले. परिसरातील ग्रामस्थांची आर्थिक परिस्थिती सुधारली. म्हणूनच ग्रामस्थही आपल्या मुलांना पुण्यात इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पाठवतात. परंतु गेल्या दोन वर्षांत पालकांच्या असे लक्षात आले की, आपली मुले धड मराठीही शिकत नाही, अन् धड इंग्रजीही. विशेषत: घरांत इंग्रजी शिकण्यासाठीचे चांगले वातावरण मिळत नाही. परिणामी, प्रत्येक बाबतीत ही मुले मागे पडत असल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले.
दुसरीकडे, त्याचा परिणाम स्थानिक जिल्हा परिषद शाळांवर होत आहे. स्थानिक शाळांमध्ये विद्यार्थी संख्या कमी होत आहे, शिवाय, या शाळांमध्ये सुविधाही अपूर्ण पडत आहे. ऑगस्ट २०१४ मध्ये शाळेचे एक शिक्षक शिवाजी सोनवणे यांनी प्राचार्य शिवाजी कांबळे यांच्या सहकार्याने शाळेचे भविष्य बदलण्याचा निर्णय घेतला. त्यांनी परिसरातील १८ गावांतील प्रमुखांची बैठक बोलवली. यात त्यांनी शाळेला स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी सामुदायिक सहकार्याची गरज असल्याचा प्रस्ताव ठेवला. पालक आणि गावाचे उपसरपंच सुभाष रानवडे यांनी या निर्णयाची प्रशंसा केली आणि अनेक बैठकींना मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, आपण सरकारी अनुदानाची वाट पाहू शकत नाही. मुलांना दर्जेदार शिक्षण देण्याची जबाबदारी ग्रामस्थांची आहे. एक स्थानिक युवक शेतकरी प्रशांत रानवडे यांनी ४५ लाख रुपये दिले आणि हळूहळू इतर ग्रामस्थही मदत करण्यास पुढे आले. शाळेच्या उभारणीसाठी उपकरणे आणि पैसा दान करण्यासाठी लोक पुढे सरसावले. यामुळे शहरातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या वाढत्या शुल्काने त्रस्त असलेले पालकही आनंदी झाले.
मार्च २०१५ ची गोष्ट. ग्रामस्थांचे प्रयत्न फळास आले. पुण्यापासून २० किलोमीटर नांदे गावची जिल्हा परिषदेची जीर्ण झालेली शाळा इतर शहरी शाळांना टक्कर देत आहे. ग्रामस्थांनी आपल्या शेजारील आयटी कंपनींचा एक शब्द आणि एक आयडिया “क्राऊडसोसिंग' मॉडलचा वापर करून हे यश मिळवले आहे. ग्रामस्थांनी क्राऊडसोर्सिंगच्या माध्यमातून १.५ कोटी रुपये जमवले आणि जिल्हा परिषद शाळेचे रुप पालटवले.

आज या इमारतीत अनेक प्रकारच्या सोयीसुविधा आहेत. येथील वर्गखोल्यांमध्ये आधुनिक सुविधा आहे. प्रत्येक खोलीत प्रोजेक्टर आहे, सर्व सुविधांनी युक्त एक संगणक लॅब आहे. येथे इंग्रजी शिकवण्यासाठी विविध अभ्यासक्रम उपलब्ध आहे. विज्ञान प्रयोगशाळा आहे. एवढेच नव्हे तर संपूर्ण शाळेत कमीत कमी २० सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. शैक्षणिक अभ्यासाशिवाय शाळेत सायंकाळी विनाशुल्क होणारे कराटे आणि योगा शिकण्याची व्यवस्था आहे. शालेय घोडेस्वारीचा अभ्यासक्रम सुरू करण्याची तयारी करीत आहेत. सध्या या शाळेत मराठी माध्यमाचे शिक्षण दिले जाते. येत्या शैक्षणिक वर्षापासून सेमी इंग्रजी माध्यमातून शिक्षण दिले जाणार आहे.
शिक्षण मंडळाने या शाळेला मॉडेल स्कूल घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे. हे दुसऱ्यांसाठी चांगले उदाहरण आहे आणि या शाळेत खासगी शाळांसारख्या सुविधा आहेत. प्राथमिक शिक्षण संचालकांनी या शाळेवर एक फिल्म काढली आहे. ती फिल्म बालचित्रवाणीला दिली आहे. कारण, राज्यातील इतर शाळा ते पाहून शिकतील आणि दर्जा सुधारतील.
फंडा हा आहे की...
कमी शिकलेले लोकही सुशिक्षित लोकांना हे शिकवू शकतात की, शिक्षण व्यवस्थेत चांगल्या आणि यशस्वी सुधारणा कशा केल्या जाऊ शकते.