आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅनेजमेंट फंडा - तंत्रज्ञानाचा वापर करताना गरजेच्या वस्तूंना विसरू नका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एस रामचंद्रन ८०वर्षांचे आहेत. ते तामिळनाडूतील एका छोट्याशा शहरातील एका शाळेचे अध्यक्ष आहेत. या शाळेला काही वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय शाळेचा दर्जाही मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय शाळांचा अनुभव असलेले तज्ज्ञ या शाळेचे व्यवस्थापन सांभाळत आहे.
रामचंद्रन शाळेत आवश्यक असणाऱ्या नव्या तंत्राज्ञानाचा खुलेपणाने स्वागत करतात. मग ती ३६० डिग्रीचा सर्व्हिलांस सिस्टिम असो की विद्यार्थ्यांची दररोजची कॅलरी मोजणे असो. त्यांनी १९६१ मध्ये दोन खोल्यांत एका शिक्षकाच्या मदतीने शाळा सुरू केली. तेव्हा शहरात मध्यमवर्गीयांसाठी मोठ्या मुश्किलीने एखादी शाळा असेल. रामचंद्रन या शाळेचा कायापालट करण्याचे स्वप्ने पाहत होते. ते आपल्या शाळेत नवे नवे तंत्रज्ञान घेऊन आले. वर्गाचे ध्वनिमुद्रण अर्थात रेकॉर्डिंग सुरू केली.
काही कारणाने एखादा मुलगा शाळेत आला नसेल तर त्याला इंटरनेटच्या माध्यमातून वर्गाशी जोडून शिकवण्याची सोय केली. स्काइपच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय शिक्षक आणि सल्लागारांशी चर्चा करण्याची सोय त्यांनी केली. वर्गापासून ते बसपर्यंत जीपीएस यंत्रणा लावण्यात आली. यामुळे आई-वडिलांना व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून आपल्या मुलांचा प्रगती अहवाल त्यांचे अपडेट कळते. तेही दररोज. या सर्व बाबी शाळेसाठी साधारण गोष्ट झाली आहे.
रामचंद्र यांच्यात एक विशेष आहे.
आपल्या शाळेत शिक्षकांची आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यासाठी ते स्वत: मुलाखती घेत. दोन शालेय बसचालकांच्या जागा भरायच्या होत्या. रामचंद्रन आपल्या कामात खूपच व्यस्त राहत. तरीही त्यांनी वेळ काढला. मुलाखतीसाठी नऊ चालकांची यादी केली.
सर्व उमेदवारांना मुलाखतीसाठी वेगवेगळ्या खोल्यांमध्ये बसवण्यात आले. या मुलाखतीचे वैशिष्ट्य असे होते की, चालक परवाना आणि अनुभव महत्त्वाचा मानला नव्हता. पण, कुटुंब उपस्थित असणे आवश्यक होते. तेही ज्यांची मुले शाळेत जातात अशीच कुटुंबे. मुलाखतीसाठी येताना पत्नी आणि मुलांना आणणे अनिवार्य होते.

सुरुवातीला चर्चा केल्यानंतर सर्व चालकांना वर्गाच्या बाहेर जाण्याचे सांगण्यात आले. उमेदवारांच्या मुलांना आणि त्यांच्या आईंना थांबवण्यात आले. त्यानंतर वर्गाबाहेर लोक केवळ मुलांचे हसणे ऐकू शकत होते. रामचंद्रन वर्गात मुलांना चॉकलेट देत होते आणि छोटे-छोटे विनोद आणि कथा सांगत. त्यांनी एका मांजरीची गोष्ट सांगितली,
एका मांजरीने दारू प्यायली आणि ती कुत्र्याशी भांडू लागली. कुत्र्याने तिला गंभीर जखमी केले. ही गोष्ट सांगत असताना रामचंद्रन यांनी मुलांना एक प्रश्न विचारला. तुमचे वडील दारू पितात का? प्रांजळ मन असलेल्या मुलांनी खरं खरं सांगून टाकलं. रामचंद्रन कथेच्या माध्यमातून खरे जाणण्याचा प्रयत्न केला. त्यातून त्यांना उमेदवारांचे खरे स्वभाव कळाले, त्यांच्या सवयी जाणून घेतल्या. त्यानंतर रामचंद्रन यांनी मुलांच्या आईला कुटुंबाशी संबंधित कथा ऐकवल्या. नंतर त्यांना पतींशी तुमचे जमते का? असे विचारले. यातून रामचंद्रन यांना चालकांना समजून घेण्यास मदत झाली. शेवटी या चालकांना शेकडो मुलांना प्रेमाने सांभाळायचे होते. ५० वर्षे झाली. आतापर्यंत या शाळेत अप्रिय घटना घडली, असे एकदाही ऐकण्यात आले नाही. सर्व सुस्थितीत चालू आहे. शाळेची दिवसेंदिवस प्रगती होत आहे.
फंडा हा आहे की...
आधुनिक युगात तंत्रज्ञानाला जेवढे महत्त्व आहे, तेवढेच महत्त्व उच्च नैतिक मूल्य असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या निवडीलाही आहे. कर्मचारी हा संस्थेचा आधारस्तंभ असतो. कर्मचाऱ्यांवर संस्थेचेे यश अवलंबून असते.