आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅनेजमेंट फंडा - झपाटून केलेले काम प्रतिष्ठा, पैसा मिळवून देते

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पहिली कथा : इ.स.पूर्व मे-५४३ मध्ये गौतम बुद्ध यांनी कोणते भोजन ग्रहण केले होते?, हे आपल्यापैकी किती जण सांगू शकतील. चिलीतून येणारे सफरचंद आपल्याकडील सफरचंदापेक्षा स्वस्त आहे का? पाहुण्यांसमोर जेवण वाढण्यापूर्वी छायाचित्रकारांचा सल्ला घेतला होता का?
आपण सर्वजन रोज जेवणाबद्दल चर्चा करतो, पण, भोजनाची संस्कृती, इतिहास, ओळख, राजनीती, अर्थशास्त्र, तंत्रज्ञान आणि अशा अनेक गोष्टीबाबत खूपच कमी बोलतो. भोजनाच्या चर्चेला व्यापक मंचावर घेऊन जाण्यासाठी बंगळुरूच्या सात मित्रांनी ऑनलाइन फुड जर्नल "द फॉरेजर' सुरू केले आहे. कलाकार, लेखक, शिक्षक अणि वकिलांच्या मित्र समूहाने ही त्रैमासिक पत्रिका ऑक्टोबर-२०१४ मध्ये लाँच केली. आता एप्रिलमध्ये तिसऱ्या आवृत्तीच्या तयारीला लागले आहे. फॉरेजर भोजनासंबंधी ज्ञान मिळवण्यासाठीचे एक मोठे व्यासपीठच आहे. त्यासाठीच ते वाचकांना भोजनाचे विश्व दाखवतात.
दुसरी कथा : तमिळनाडूतील कोईम्बतूर येथील यलो ट्रेन स्कूल मुलांना नाष्टा दुपारचे जेवणही देत असते. विद्यार्थी आणि तेथील शिक्षक, कर्मचाऱ्यांना शाळेतील जेवण अनिवार्य आहे. शाळेची संस्थापक संथ्याल विक्रम यांनी ज्वारी, बाजरी सारख्या धान्यांचा आहारात समोवश केला आहे. विक्रम यांचे म्हणणे आहे की, त्यांची शाळा केवळ भोजन देण्यासाठी कटिबद्ध नसून त्यांना शेत आणि डायनिंग टेबलच्या मधील नातेही घट्ट करायचे आहे. शाळेसाठी लागणाऱ्या सर्व वस्तू त्या स्वत: पिकवितात. सुरवातीला थोडा विरोध झाला. पण, त्यांनी निश्चय संयम राखत विरोधावर नियंत्रण मिळवले. आहारतज्ज्ञांशी चर्चा करून त्यांनी ज्वारी-बाजरीची खीर, बनवलेल्या पोळ्या, डोसा-सांबर, भात देणे सुरू केले. सकाळच्या धावण्यानंतर मुलांना एक कप कांजी (सूपासारखे पेय) सारखे पेय दिले जाते. लगेचच नाश्ता दिला जातो. अशाप्रकारे मुलांना भोजनाबरोबरच ज्वारी-बाजरीचा परिचय होतो. हा आहार मुलांना उत्साही आणि शक्तीवर्धक बनवतो. मुले वाढदिवसाला केकऐवजी टरबूज आणून कापतात, एवढी जागृतता त्यांच्यात आली आहे. ती मुले आर्थिकदृष्ट्या चांगल्या घरातील आहे. परंतु, पालक या मुलांना जमिनीशी जुळवण्याच्या या प्रयत्नाचे कौतुक करीत आहेत.

तिसरी कथा : भुवनेश्वर येथील चित्रपट निर्माता अमर्त्य भट्टाचार्य यांच्या लघुपटाला मे मध्ये होणाऱ्या ६८ व्या कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रदर्शीत करण्यासाठी निवड केली आहे. फँटशी आधारित चित्रपटाला "होयतो कोबीतीर जोन्यो' (काव्यात्मक रंगात) ला बंगाली तथा इंग्रजीमध्ये बनवण्यात आले आहे.
जेथे धनशक्ती आणि राजकीय भ्रष्टाचारामुळे वर्तमान समाजाची झालेली दुरवस्था यात दाखवलेली आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण अाेडिसातील विविध भागात करण्यात आले आहे. हा चित्रपट खूप कमी बजेटमध्ये बनवला आहे. २७ वर्षीय चित्रपट निर्मात्याने कमी पैसा लागावा म्हणून लेखन, संपादन स्वत:च केले आहे. संपूर्ण चित्रपट, पोस्टर, स्थिर चित्र बनवण्यासाठी एकूण खर्च आला आहे केवळ २००० रुपये. यातील सर्व कलाकार सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मुख्य नायिका अमृता चौधरी आहे. चौधरी हिने निर्माता भट्टाचार्य यांच्या उडीया भाषेतील "कॅपिटल वन' मध्ये चित्रपटात नृत्य दिग्दर्शिका आणि नृत्यांगना म्हणून काम केले आहे. चित्रपटाची पॅरिसमध्ये होणाऱ्या फिल्म फेस्टिवलमधील दक्षिण आशियाई चित्रपट गटात निवड झाली आहे.
फंडा हा आहे की...
झपाट्याने केलेले काम आणि प्रेरणा साधारणपणे पैशांशी निगडित नसतात किंवा पैशांसाठी नसते. म्हणूनच झपाटून केलेले कोणतेही काम प्रतिष्ठा आणि हवा तेवढा पैसा मिळवून देते.