आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Special Article On Youth Problem By N Raghuraman

मॅनेजमेंट फंडा - किशोरवयीनांची प्रकरणे नरमाईने हाताळा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो - डमी फोटो )
पहिली कथा : सोमवारी सकाळी ८.३० वाजता एकुलता एक मुलगा १७ वर्षीय जितेंद्र चंद्रशेखर आपल्या आई-वडिलांना म्हणाला, ‘आज माझा अकाउंट्सचा पेपर आहे आणि मी त्यासाठी पूर्णपणे तयार आहे.’ त्याची आई गीता गॅस एजन्सीमध्ये काम करते आणि वडील चंद्रशेखर बीएसएफमध्ये आहेत. दोघेही टुमकूर येथील आपल्या घरातून कामासाठी निघाले. वाजता जितेंद्र आपल्या कॉलेजला गेला, पण परीक्षा देऊ शकला नाही. कारण त्याची हजेरी कमी होती. गेल्या वर्षीही त्याची हजेरी कमी होती. तो प्रथम वर्ष पुरवणी परीक्षा देऊन उत्तीर्ण झाला होता.
१२.३० वाजता जितेंद्र आपल्या आईला फोन करतो आणि रडायला लागतो, पण त्याची बोलायची हिंमत होत नाही आणि तो फोन कट करतो. आईला चिंता वाटते आणि ती एजन्सी मालकाची परवानगी घेऊन घरी जायला लागते. १२.४५ वाजता शेजाऱ्यांना चंद्रशेखर यांच्या घरातून कुणीतरी मोठमोठ्याने आवाज करत असल्याचे ऐकू येते. ते पोलिसांना बोलावतात. यादरम्यान गीता ऑटोरिक्षामध्ये होती आणि घराकडे येत होती.
१.१५ वाजता पोलिस येतात आणि घराचा दरवाजा तोडतात. गीता अद्यापही घरी पोहोचलेली नसते. पोलिसांना समजते की, १७ वर्षांच्या जितेंद्रचा मृत्यू झाला आहे. मृतदेहाजवळ त्याच्या वडिलांची डबल बॅरल बंदूक आढळून येते. काही मिनिटांमध्येच गीता तेथे पोहोचते. तिला एक कागद सापडतो. त्यात ‘आई जर खरंच पुनर्जन्म होत असेल तर मी पुन्हा तुझ्या पोटी जन्माला येईल,’ असे लिहिलेले असते.
दुसरी कथा : डॉ.बिजॉय कुमार हे बंगळुरू येथील महाला हॉस्पिटलमध्ये कार्डियॉलॉजिस्ट आहेत. ते सोमवारी सकाळी ८.३० वाजता हॉस्पिटलला जाण्यासाठी घरून निघतात. त्यांच्या पत्नी राष्ट्रीयीकृत बँकेत व्यवस्थापिका आहेत. त्या ८.४५ वाजता बँकेत जाण्यासाठी निघतात. वाजता त्यांची एकुलती एक १५ वर्षीय मुलगी मोनालीदेखील घरातून निघते. ती नॅशनल पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी आहे. या कुटुंबाचे मूळ गाव ओडिशामध्ये आहे. १२ वाजेच्या आसपास मोनाली तिच्याच वर्गातील एका मुलासोबत असल्याचे शाळेच्या प्राचार्या पाहतात.
शाळेच्या अधिकाऱ्यांनी तिला यापूर्वीच त्या मुलासोबत मैत्री करण्याबाबत इशारा दिलेला आहे. ३० मिनिटांनंतर १२.३० वाजता मोनालीच्या आईला शाळेतून फोन जातो. तुम्ही आपल्या मुलीला लगेच शाळेतून घेऊन जा. तिला दीड दिवसांसाठी निलंबित केले आहे, असे फोनवरून सांगण्यात येते. वाजता आई शाळेत पोहोचते आणि १.३० वाजता शाळेच्या कार्यालयामध्ये जाऊन चर्चा करते. २.३० वाजता आई आणि मुलगी दोघीही आपल्या उच्चभ्रू भागातील सालापुरिया ग्रीनएज अपार्टमेंटमधील घरी परत येतात. घरी आल्यानंतर आई तिला आपल्या अभ्यासाकडे लक्ष देण्यास सांगते. मीडिया रिपोर्टनुसार, दोघींमध्ये वाद होतो. ‘त्या मुलासोबत फक्त मैत्री आहे’, असे सांगण्याचा मोनाली प्रयत्न करते. आई म्हणते, ‘मी तुझ्यावर विश्वास ठेवते, पण तू नेहमीच संशयास्पद काम करतेस. काही सेकंदांनंतर ३.१५ वाजता वैतागलेली मोनाली बेडरूममध्ये जाते आणि दरवाजा आतून बंद करून घेते. ती फ्रेंच विंडो उघडते आणि आपल्या १३व्या मजल्यावरील घरातून खाली उडी मारते. रुग्णालयात तिला मृत घोषित केले जाते. आई-वडील आणि शिक्षकांनी प्रत्येक शब्द तोलून-मापून बोलला पाहिजे. आजकालची किशोरवयीन मुले छोट्या-छोट्या कारणांमुळे आपले आयुष्य संपवतात.

फंडा हा आहे की...
किशोरवयीनांची प्रकरणे हाताळताना पालक आणि शिक्षकांनी नरमाईचे धोरण अवलंबले पाहिजे. त्यांच्यासोबत लहान मुलांसारखे वागावे.