आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Article On News Bussiness Trends By N Raghuraman

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मॅनेजमेंट फंडा - ग्राहकांच्या दरवाजापर्यंत जाणे बनतोय नवा ट्रेंड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गजबजलेल्या भाजीमंडईतून भाजीपाला खरेदी करण्याची तुमची इच्छा नसते तेव्हा हातगाडीवर भाजीपाला विकणारे तुमच्या दारी येतात आणि स्वस्त ताज्या भाज्या निवडण्यामध्ये तुमची मदत करतात. हातगाडीवर भाजीपाला विकणाऱ्यांकडून आयडिया घेऊन रिटेल सेक्टरच्या काही बड्या लोकांनी स्वस्त दरामध्ये ऑनलाइन भाजीपाला विकण्यास सुरुवात केली आहे. अशाच प्रकारे अनेक शहरांत मोबाइल रेस्टॉरंटची क्रेझही वाढत आहे.
आता चित्रपटगृह मालकही या संकल्पनेवर विचार करत आहेत. कारण, सिंगल स्क्रीन चित्रपटगृहांवर मल्टिप्लेक्सची संकल्पना रूढ होत चालल्याने दबाव वाढत आहे. त्यामुळे सिंगल स्क्रीन चित्रपटगृहाचे मालक आता सिनेमा घर किंवा वसाहतीपर्यंत आणण्याच्या संकल्पनेवर विचार करत आहेत. याची लवकरच अंमलबजावणी केली जाईल. २४ जानेवारी रोजी केरळमधील तिरुअंनतपुरम शहरात हा प्रयोग करण्यात आला.
तुम्हाला आठवत असेल की पूर्वी चित्रपटगृह मालक ध्वनिक्षेपकाद्वारे गल्ली-बोळात जाऊन नव्या चित्रपटाचा प्रचार करत होते. असाच एक काळ बायोस्कोप आणि सी-क्लास थिएटर्सचा होता. यामुळे दुर्गम भागातील लोकही सिनेमाशी जोडले जात असत. जे लोक चित्रपटगृहांपर्यंत जाऊ शकत नाहीत अशा लोकांपर्यंत बायोस्कोप चित्रपट पोहोचवत होते.
बदलत्या काळासोबत बायोस्कोप आणि जुन्या काळातील चित्रपटगृह गायब झाले. एकतर ते बंद पडले किंवा त्यामध्ये बदल करण्यात आला.या काळात स्वतंत्र चित्रपट दिग्दर्शकांची संख्याही खूप वाढली आहे. तथापि, त्यांच्या चित्रपटांना थिएटर्समध्ये हवी तेवढी जागा मिळत नाही. जागा जरी मिळाली तरी जाहिरातींवर सर्वाधिक खर्च करावा लागतो. तसेच प्रेक्षकांना थिएटरपर्यंत खेचून आणण्याची कसरतही करावी लागते. दुसरीकडे मोठ्या बजेटचे चित्रपट मोठ्या शहरापर्यंतच मर्यादित राहतात. या सर्व गोष्टींनी तिरुवनंतरपुरमच्या चित्रपटप्रेमींच्या कच्जछा फिल्म फोरम नावाच्या संघटनेला चित्रपट व्यवसायाला नवे स्वरूप देण्यासाठी प्रेरित केले. या लोकांनी क्राउड फंडिंगच्या माध्यमातून सामान्य लोकांकडून पैसे गोळा केले आणि ‘ओर्रालपोक्कम’ नावाचा मल्याळम चित्रपट बनवला. याचे दिग्दर्शन तरुण दिग्दर्शक सनलकुमार शशिधर यांनी केले.
हा चित्रपट लोकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी त्यांनी भूतकाळामध्ये जात बायोस्कोपचा आधार घेतला. चित्रपट दिग्दर्शक अदूर गोपालकृष्ण यांनी त्यांच्या ‘सिनेमा कॅब’ संकल्पनेचा शुभारंभ केला. हा चित्रपट तिरुवनंतपुरमच्या एका उच्चभ्रू वसाहतीत प्रदर्शित करण्यात आला. या प्रयोगाअंतर्गत ही ‘सिनेमा कॅब’ संपूर्ण केरळमध्ये चार महिने फिरणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात ही कॅब आठ दिवस थांबेल. चित्रपटाच्या प्रचार-प्रसारासाठी हे लोक स्थानिक रहिवासी, ग्रंथालये, स्पोर्ट््स क्लब आणि गृहनिर्माण सोसायट्यांची मदत घेतील.
‘सिनेमा कॅब’मध्ये उच्च दर्जाच्या साउंडसह प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावरील चित्रपटाचा अनुभव घेता येईल. यांच्याकडे खुल्या जागेत चित्रपट दाखवण्याचीदेखील सोय आहे. तथापि, चित्रपट मोफत प्रदर्शित करण्याची त्यांची योजना नाही. कारण यामुळे चित्रपटाची निर्मिती करणाऱ्याला आणि चित्रपट उद्योगाला कोणताच फायदा होणार नाही. एका शोमागे कमीत कमी ५० प्रेक्षक, हे त्यांचे उद्दिष्ट आहे. चित्रपटाचा नायक प्रकाश बरेच्या फेसबुक पेजवर लोकांनी या कॉन्सेप्टमध्ये रस दाखवला आहे. हे पाहून टीम खूप उत्साहित आहे. या लोकांचे असे म्हणणे आहे की, हा ट्रेंड सिनेमा पाहण्याच्या संस्कृतीचा कायमस्वरूपी भाग बनेल.
फंडा हा आहे की...
काही व्यवसाय गर्दी खेचणारे आहेत, तर काही लोकांच्या दरवाजापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण गर्दी असलेल्या मार्गांचा कंटाळवाणा प्रवास काही तासांच्या आनंदावर भारी पडतो.