आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅनेजमेंट फंडा - ऑन डिमांड डिलिव्हरी व्यवसायात आजही संधी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सलग २३वर्षे काम केल्यानंतर विवेक पाटियान हे मोठ्या विश्वासाने बाल्कनीत वृत्तपत्र वाचत होते. ते ज्या कंपनीत काम करीत होते ती कंपनी भारतातील काम बंद करून आपल्या देशात गेली. विवेक हे त्या १३६ कर्मचाऱ्यांपैकी एक होते, ज्यांना नोकरी शोधणे अवघड जात आहे. विवेकसाठी ही परिस्थिती एवढीही वाईट नव्हती. कारण त्यांनी बरीच बचत केली होती. त्यांच्यावर कर्जही नव्हते. ते आपल्या घराबाहेरील खोलीत एक कार्यालय थाटू शकतात. त्यांच्याजवळ दोन चारचाकी गाड्या आणि एक दुचाकी होती.
विवेक यांना पन्नासी गाठायला अजून बरीच वर्षे बाकी होती, परंतु ते विचार करीत होते की आगामी दहा वर्षांत चांगला उत्पादक कसे बनता येईल?

एकदा त्यांच्या पत्नीला त्यांनी किराणा सामान पाठवले. परंतु ते त्यांच्यापर्यंत खूप उशिरा पोहोचले. हा क्षण त्यांच्या व्यवसायाचा टर्निंग पॉइंट ठरला. त्यांनी किराणा स्टोअर्स आणि रेस्टॉरंटसाठी "लास्ट माइल सोल्युशन प्रोव्हायडर' नावाची डिलिव्हरी कंपनी स्थापन केली.
ही गोष्ट सहा महिने जुनी आहे. हळूहळू त्यांच्या व्यवसायात वाढ होऊ लागली. त्यामुळे ते त्यांच्या मित्रांकडे चालकासह गाड्या भाड्याने मागू लागले. आता विवेककडे डझनभर गाड्या आहे. विविध पाळ्यांत काम करायला चालक आहेत. आता ते कंपनीमार्फत लोकांना, दुकानांना आणि रेस्टारंटला डिलिव्हरी सेवा देत आहेत. विवेकच या व्यवसायात एकटे नसून इतर कंपन्याही आहेत. ऑन डिमांड डिलिव्हरी कंपन्यांनी काही मोठ्या शहरांत आपले पाय रोवण्यास सुरुवात केली आहे.

लोकांना आता किराणा आणि भाजीपाला आणण्यास अडचण येऊ लागली आहे. त्यांचा वेळ वाचत असेल तर ते जास्तीचे पैसे खर्च करतात. ते रांगेत उभे राहून सामान खरेदीसाठी जाऊ इच्छित नाही. दुसरीकडे लोकलबनिया डॉट कॉम आणि बिग बॉस्केट डॉट कॉमसारखी वेबसाइट ठरलेल्या वेळेत सामान पाठवत आहे. लोक स्मार्टफोनच्या माध्यमातून गरजेच्या वस्तू मागवत आहेत. ऑन डिमांड कंपन्या जसे इंस्टाकार्ट आणि दूरदेशने अमेरिकेत चांगले नाव कमावले आहे. गुडगावमध्ये ग्रोवर्स, बंगळुरू येथे डिलिव्हरी आणि मुंबईत स्कूटसीसारखी डिलिव्हरी कंपन्या सुरू झाल्या. त्या फायद्यात सुरू आहेत.

ऑर्डर घेऊन ती ग्राहकांपर्यंत विनाअडथळा आणि वेळेत पोहोचवणे हे डिलिव्हरी कंपनीचे मुख्य काम आहे. टेक्नोपार्क अॅडव्हायजर्सनुसार आता फक्त एक टक्काच किराणा दुकानदार ऑनलाइनच्या माध्यमातून सामानाची डिलिव्हरी करतात. अर्थात, बाजारपेठ पूर्ण खुली आहे.
फंडा हा आहे की...
या व्यवसायाद्वारे नवीन भाग शोधण्याची संधी मिळेल. नवीन लोक जोडल्या जातील. आपला बॉस आपण होण्याची तेथे संधी आहे. एवढेच नव्हे, तर ट्रक चालवणे ही एक व्यावसायिक संधी बनू शकते.