आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅनेजमेंट फंडा - आकडे अपडेट केल्यास समस्या संपुष्टात येतील

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पहिले प्रकरण : २००३मध्ये त्याच्यावर कुकृत्य आणि जीवघेणा हल्ल्या केल्याचे आरोप लावण्यात आले. त्याला अटक झाली आणि पुन्हा जामिनावर सुटका झाली. २००६ मध्ये त्याला अवैध शस्त्रे बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली आणि तो पुन्हा सुटला. २००८ मध्ये त्याला पुन्हा अटक करण्यात आली. या वेळी त्याला तडीपार करण्यात आले होते. ही शिक्षा २००९ पर्यंत होती. २०११ मध्ये दिल्ली येथे कुकृत्य आणि दरोड्याच्या गुन्ह्यात तो पकडला गेला. अटक झाली आणि सात महिन्यानंतर सुटका झाली. २०१३ मध्ये कुकृत्य आणि दरोडाप्रकरणी पोलिसांनी त्याला सराईत गुन्हेगार म्हणून घोषित केले. असे असतानाही तो दिल्लीला स्थायिक झाला. त्याच्यासोबत मोठ्या भावाची विधवा पत्नीदेखील होती. तिच्यासोबत त्याने लग्नही केले आणि मुलेही झाली. तेथे तो टॅक्सी चालक झाला.

हा आहे शिवकुमार यादव. यानेच दिल्ली येथील एमएनसीमध्ये काम करणाऱ्या २५ वर्षीय मुलीसोबत उबर कॅबमध्ये कुकृत्य केले होते. जर त्याचा जुना गुन्हेगारी रेकॉर्ड पाहिला तर कोणतीच कंपनी या व्यक्तीला नोकरीवर घेणार नाही. मात्र, तो एका आंतरराष्ट्रीय कंपनीसाठी काम करायला लागला आणि तेथेही त्याने तोच गुन्हा केला. कारण त्याच्या गुन्हेगारी रेकॉर्डचा कोणताच डाटा अपडेट केला नव्हता किंवा राष्ट्रीय पातळीवर अशा गुन्हेगारांचा डाटा अपडेटच केला जात नाही. पाहता नोकरी देणाऱ्या कॅब कंपनीचा रेकॉर्डही स्वच्छ नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवर उबर कंपनीला नाकारले जात आहे. त्याचे मुख्यालय सन फ्रान्सिस्कोपासून ते थायलंडमधील मनीलापर्यंत आहेत. टाइम मासिकानेही उबर कंपनीतील चालकांच्या कुकृत्यांबाबत लिहिले होते.

दुसरे प्रकरण : आसाममध्येदररोज चार हजार लोकांना हृदयाशी संबंधित आजार असल्याचे समजते. यापैकी ४८ लोकांचा मृत्यू होतो. ही माहिती एका स्थानिक रुग्णालयाने केलेल्या संशोधनादरम्यान मिळाली आहे. प्रशासन, डॉक्टर आणि स्थानिक लोक हे आकडे माहीत झाल्यामुळे सावध झाले आहेत. तत्काळ जनजागृती कार्यक्रम घेण्याबाबत चर्चाही झाली. हे संशोधन १७ वर्षांपर्यंत करण्यात आले. यादरम्यान प्रत्येक सरकारी रुग्णालयातून आकडे मिळवण्यात आले. हेदेखील समोर आले आहे की, हृदयरोगामुळे राज्यात दर दोन तासाला दोन लोक पूर्णपणे अपंग होत आहेत. उच्च रक्तदाब किंवा अति तणाव हृदयविकाराचा झटका किंवा हृदयरोगाची प्रमुख कारणे ठरतात. आसाममध्ये यामुळे सुमारे १५,३७८ लोक दररोज प्रभावित होतात.

तिसरे प्रकरण : पुढचाअहवाल धक्कादायक आहे. या अहवालानुसार डाटा अपडेट करण्यामध्ये आपल्याकडे खूप चुका होतात. नुकत्याच संसदेत सादर करण्यात आलेल्या अहवालानुसार, १५,७१९ पाकिस्तानी नागरिक व्हिसा संपल्यानंतरही देशात राहत आहेत. हा आकडा ३१ डिसेंबर २०१३ पर्यंतचा आहे. आपल्याला हेदेखील माहीत नाही की, गेल्या १२ महिन्यांमध्ये यामध्ये किती आकड्यांची भर पडली आहे. राजस्थान (८५००), महाराष्ट्र (२०२३) आणि मध्य प्रदेश (१७७९) ही सर्वाधिक पाकिस्तानी राहत असलेली तीन राज्ये आहेत. गुजरातचा चौथा क्रमांक लागतो. येथे १६९६ अवैध पाकिस्तानी नागरिक राहत आहेत.
फंडा हा आहे की...
आकडे मोठे असतात आणि नेहमी ते तुमच्या समोर असतात. पूर्ण सावधगिरीने आणि संयुक्त प्रयत्नाने ते अपडेट केले तर आपण त्यांचा चांगल्यारीतीने वापर करू शकतो. अन्यथा दुर्घटना घडल्यानंतर रडत बसण्याने काहीच होणार नाही.