आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅनेजमेंट फंडा - चांगल्या परिणामांसाठी कर्मचाऱ्यांचा प्रवासवेळ घटवा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अशोक कांबळे आणि तुकाराम भिडे यांना काही दिवसांपूर्वीच मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात वॉर्ड बॉयची नोकरी लागली. नोकरीवर रुजू होऊन अवघे सहाच महिने झाले, परंतु दोघेही डॉक्टर, स्टाफ आणि रुग्णांमध्ये प्रिय झाले. दोघे वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम करतात. पूर्ण रुग्णालयात त्यांना मोठी मागणी आहे. केवळ कठोर परिश्रमांमुळेच ते प्रिय नाही तर, रुग्णालय कधीच सोडू इच्छित नाही किंवा त्यांना दुसऱ्या रुग्णालयात बदलीही नकोय.
मुंबईमध्ये महापालिकेचे १६ जनरल हॉस्पिटल्स, मॅटरनिटी हॉस्पिटल्स, २६ स्पेशॅलिटी हॉस्पिटल्स, १६२ डिस्पेंसरी आणि १६८ हेल्थ पोस्टचे भव्य जाळे आहे. या शिवाय राज्य शासनाचे एक मेडिकल कॉलेज, तीन जनरल हॉस्पिटल्स आणि दोन हेल्थ युनिट‌्स आहेत. या रुग्णालयांमध्ये गरिबांना मोफत किंवा अत्यल्प खर्चामध्ये उपचार दिले जातात. परंतु तरीही लोक खासगी रुग्णालयांकडे जातात. यामुळे खासगी रुग्णालये सरकारी रुग्णालयांचा प्रभाव कमी करण्यात यशस्वी होतात. मुंबईतील सरकारी रुग्णालयांची दररोज २० हजार रुग्णांना सुविधा क्षमता आहे, तर खासगी रुग्णालयांची २२ हजार रुग्णांना.
नियमानुसार आवश्यकता भासल्यास हेल्थ केअर स्टाफची बदली कोणत्याही सरकारी कार्यालयामध्ये केले जाऊ शकते. परंतु, निवृत्तीपर्यंत येथून बदली होऊ नये, असे अशोक आणि तुकारामला वाटते. दोघेही रुग्णालयाच्या अगदी जवळच राहतात. येथे अशा सुविधा आहेत, ज्या कदाचित मुकेश अंबानी यांनाही मुंबईमध्ये मिळणे कठीण आहे. या रुग्णालयात काम करणारे सर्व कर्मचारी ३० मिनिटे ते अडीच तास अतिरिक्त काम करतात.

अशोक आणि तुकारामविषयी माहिती मिळाल्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेचे (बीएमसी) अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी कर्मचाऱ्यांच्या कामापेक्षा चांगले परिणाम कसे मिळतील याचा विचार केला. त्यांनी नवे धोरण आखले. यानुसार तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्यासाठी लागणारा वेळ कमी करायचा होता. या योजनेअंतर्गत सर्वप्रथम फायदा होणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये नर्स, वॉर्ड बॉय आणि टेक्निशियन यांचा समावेश आहे. या कर्मचाऱ्यांना त्यांच्या घरापासून जवळ असलेल्या कार्यालयात स्थलांतरित करण्यात आले. अशोक आणि तुकाराम यांना पगारातील १० ते १२ टक्के खर्च आणि वेळ बचतीचा फायदा झाला. ते आता प्रवासावरील वाचणाऱ्या पैशांचा विनियोग चांगल्या खान-पानावर करत आहे. यामुळे त्यांच्या रुग्णालयाजवळ राहण्याच्या योजनेची पालिका प्रशासनाकडून प्रशंसाही करण्यात आली.

सर्व कर्मचाऱ्यांची राहत असलेल्या ठिकाणापासून जवळच्या रुग्णालयात बदली करणे बीएमसीला शक्य नाही. त्यामुळे काही लोकांना जवळच्या मेडिकल केअर फॅसिलिटीमध्ये ट्रान्सफर करण्यात आले. ते तीन मुख्य लोकल रेल्वे लाइनपैकी एकावर आहे. परिणामी कर्मचाऱ्यांना आता एकाच लाइनवर प्रवास करावा लागत आहे. शिवाय त्यांना रेल्वेही बदलावी लागत नाही.
आता स्थापत्य अभियंत्यांचा (सिव्हिल इंजिनिअर्स) नंबर आहे. कर्मचारी घरापासून जवळच काम करत असल्यास त्यांच्याकडून जास्त काम करून घेतले जाऊ शकते, हा काही नवीन योजनेतील नवा विचार नाही. परंतु सरकारी नोकरीमध्ये अंमलबजावणी पहिल्यांदाच करण्यात आली आहे. सर्व कर्मचाऱ्यांना तत्काळ या योजनेचा लाभ मिळणार नाही, हे सत्य आहे. मात्र, उपलब्ध आकड्यांनुसार ७५ टक्के बीएमसी कर्मचाऱ्यांना याचा फायदा होईल. हे टप्या टप्याने केले जाणार आहे. यामुळे बीएमसी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या कामातही वाढ होईल.
फंडा हा आहे की...
कर्मचाऱ्यांकडून चांगल्या जास्त कामाची अपेक्षा ठेवत असाल तर त्यांना घराजवळच पोस्टिंग द्या किंवा कार्यालयाजवळ घर उपलब्ध करून द्या. यामुळे दोघांचाही फायदा होईल.