आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅनेजमेंट फंडा - महिला सक्षम झाल्यास घरामध्ये येईल संपन्नता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सायंकाळी साडेसात वाजता एक व्यक्ती सामानासोबत आमच्या घराच्या समोरच्या खोलीत आला. त्याने सामान उघडले आणि ते कसे चालवायचे, हे माझ्या आईला शिकवायला लागला. ही उषा कंपनीची शिलाई मशीन होती. एखाद्या मुलास त्याचे आवडते खेळणे मिळाल्यावर तो जसा आनंदी होतो, तशीच आईसुद्धा आनंदी झाली. तिने मेकॅनिकला दोनदा कैरीचं पन्हं आणि चहा दिला.

त्या वेळी मी शाळकरी मुलगा होतो. घरात येणाऱ्या-जाणाऱ्या अनोळखी लोकांवर नजर ठेवणे, हे माझे काम होते. माझ्या वडिलांनीच मला हे करायला सांगितले होते. कारण आई घरी एकटीच राहत होती. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मी रागाने आणि शंकेच्या नजरेने त्या मेकॅनिककडे पाहत होतो. असे असतानाही मी आईच्या चेहऱ्यावरील उत्साहाकडे कानाडोळा करू शकलो नाही. ही मशीन आमच्या घरातील वातावरणच बदलून टाकेन, याचा मला अंदाजच नव्हता. माझ्या वडिलांनी आईला ही मशीन भेट दिल्याच्या १५ दिवसांतच घरामध्ये शांतता आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाल्याचे मला दिसून आले.

माझी छोटी बहीण, शेजारी आणि नातेवाइकांसाठी माझी आई वेगवेगळ्या प्रकारचे रंगीत ड्रेसेच शिवायची. चित्रपटगीते, कर्नाटक संगीत आणि तामिळ गाणी म्हणत शिलाई करताना तिच्याकडे पाहत राहण्याची मला सवयच झाली होती. अनेक वर्षांनंतर मला कळाले की, आमच्या घरामध्ये त्या काळात बहुतांश वाद खर्चांशी संबंधित व्हायचे. माझे वडील रेल्वे कर्मचारी होते. त्यांना इतरांच्या तुलनेत कमी पैसे मिळायचे. ते खर्चावर नियंत्रण ठेवायचे. तर दुसरीकडे आईला पाहुण्यांचा महागडा पाहुणचार करण्याची सवय होती.
शिलाई मशीन आल्यानंतर आमचे स्वयंपाकघराचे बजेट वाढले, पण खर्चांशी संबंधित वाद जवळपास संपुष्टात आले होते. कारण माझी आई शिलाई मशीनच्या मदतीने पैशांची कमतरता भरून काढायची. आता दुसऱ्या स्थळाकडे जाऊया.

स्थळ: मध्य प्रदेशच्या रायसेन जिल्ह्यातील सतलापूर
वर्ष : मार्च २०१२

नामदेव यांच्या कुटुंबातील तीन मुले आणि तिची पत्नी सरोज यांनी नोकरी गेल्यानंतर खर्चात काटकसर केली आहे. दहावी पास सरोज यांनी उषा कंपनीच्या शिलाई स्कूल प्रोजेक्टचे सातदिवसीय प्रशिक्षण शिबिर पूर्ण केलेले आहे. आता २०१५ मध्ये सरोज सलतापूरच्या प्रेरणा बनल्या आहेत. त्यांची १८ वर्षांची मुलगी (तिने शाळा सोडली आहे) देखील शिवणकामामध्ये आईला मदत करते. या कुटुंबाची परिवर्तनाची कथा अद्भुत आहे.

आज या कुटुंबातील इतर दोन मुले खासगी शाळेत शिकतात. सरोज यांच्याकडे तीन शिलाई मशीन असून त्या सण, लग्नसमारंभादरम्यान दिवसाला एक हजार रुपयांची कमाई करतात. ऑफ सीझनमध्येही त्यांची मासिक कमाई १५ हजार रुपयांपेक्षा कमी नसते. शाळा प्रवेशाच्या एका सीझनमध्ये त्यांनी एक लाख रुपयांपेक्षा जास्त कमाई केली होती. आपल्या तीन खोल्यांच्या आधुनिक घरात त्यांनी एक खोली शिवणक्लाससाठी राखून ठेवली आहे. त्यांच्या घरात मुलांसाठी संगणक आहे आणि संपूर्ण कुटुंबासठी टीव्हीदेखील आहे.
आता त्यांचे पतीसुद्धा नोकरी करतात. योगायोगाने या कुटुंबाचे घर सरोज यांच्या कमाईतूनच झाले आहे. उषा कंपनीच्या २०१४ मधील दाव्यानुसार, देशभरात कंपनीच्या ५५४२ शिवण शाळा आहेत. यापैकी सर्वाधिक ५१५ राजस्थानमध्ये आणि ४०३ मध्य प्रदेशात आहेत.
फंडा हा आहे की...
एक महिला सक्षम होऊन आपल्या पायावर उभी राहते, तेव्हा ती फक्त आर्थिकदृष्ट्याच बळकट होत नाही, तर तिच्यामुळे घरातील वातावरणही आनंदी राहते. तसेच लहान मुलांवरही याचा सकारात्मक परिणाम होतो.