आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅनेजमेंट फंडा - सगळीकडे आहे व्यवसायाच्या विपुल संधी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कथा - : मौसमी मुखर्जी आणि दीप दास (नाव बदललेले आहे) यांनी वयाची आठ दशके पार केली आहे. दोघींना एकमेकांचा परिचय नाही. पण, त्या दोघीही राज हुसेनच्या प्रतीक्षेत असता. तो केवळ २४ वर्षांचा आहे. त्यांची संपूर्ण देखभाल करणे, हे राजचे पूर्णवेळ काम आहे.
आठवड्यातून तीन वेळा भेट देण्याचा त्याला चांगला पैसाही मिळतो. तो त्यांच्यासोबत बसतो, त्यांची विचारपूस करतो, आवश्यकतेनुसार त्यांची वैद्यकीय तपासणीही करतो. एका दिवसात अशा १०-१२ लोकांना तो हाताळतो. ९० मिनिटांच्या या भेटीत ते वृद्धांना संगणक शिकवणे आणि फेसबुक अकाऊंटवर त्यांच्या नातू-पणतूंशी चर्चा घडवून आणतो.
आठवड्यातील घरगुती कामांव्यतिरिक्त वृद्धांचे एकटेपण दूर करणे, राजचे मुख्य काम आहे. वृद्धांसाठी घरात सेवा देणाऱ्या दीप प्रोबीन पोरिशीब (डीपीपी) कंपनीने राजची या ग्राहकांसाठी सहायक म्हणून नियुक्ती केली. ही कंपनी २०१३ मध्ये स्थापन झाली. ही सेंट जेम्स-एचआरडीएस इंडिया (प्रायव्हेट) लिमिटेडद्वारा देण्यात येणारी सेवा आहे. एचआरडीएस ही अमेरिकेतील सहकारी कंपनी आहे. १९९९ मध्ये स्थापन झालेली ही अमेरिकन कंपनी कॅरेबियामध्ये अनेक वैद्यकीय महाविद्यालये चालवते. त्यांच्याकडे निवडक सहायकांची टीम आहे. त्यांची मुख्य पात्रता ही आहे की, ते "मोठ्या मनाचे' करुणामय' युवक असावेत.
वृद्धांना चांगली सेवा देण्यासाठी सहायकांना व्यापक प्रमाणात प्रशिक्षण दिले जाते. तसेच त्यांची पार्श्वभूमी तपासली जाते. विशेषत: कंपनी पूर्णवेळ कर्मचाऱ्यांशिवाय स्वयंसेवकांचा स्वीकार करत नाही. एकटे वृद्ध आणि आजारी वृद्धांना मदत होण्यासाठी विद्यमान पिढीच्या अनेक लोकांनी ही सेवा घेतली. सहायकाचे खरे काम वृद्धांना गोष्ट सांगणे आहे. ते वृद्धांना टीव्ही पाहण्यासाठी सोडून देत नाही. तर त्यांच्याशी समरस होतात. साधारणपणे, अशा व्यवसायात सेवा देणारे सहायक असंवेदनशील आणि कठोर स्वभावाचे बनता. ही बाब ओळखून कंपनीने वृद्धांना आनंद देणारा आणि सन्मान करणाऱ्या सहायकांची नेमणूक केली. सहायक कशी सेवा देतो, याबाबत कंपनी वृद्धांकडे विचारनाही करीत असते.
कथा- : पुढील पाच वर्षांत कमीत कमी ६० कोटी भारतीयांसमोर पिण्याच्या पाण्याचे संकट उभे राहू शकते. कारण, भुजलाची पातळी दिवसेंदिवस खोल जात आहे. मागणी आणि पुरवठा यातील तफावत ओळखून यूरोपमधील सर्वात मोठी वाटर कंपनी वेओलिया इन्व्हायर्नमेंट एसए कंपनी भारतीय नगर निगमशी संबंध वाढवत आहे. ही कंपनी जगभरात वॉटर ट्रीटमेंट प्लांट पुरवठा करते. वॉटर ट्रीटमेंटच्या क्षेत्रामध्ये भारतात १.४ अब्ज डॉलरची बाजारपेठ पाहून जगातील दुसरी मोठी वाटर कंपनी सुयझ इन्व्हायर्नमेंटही या व्यवसायात उतरण्याच्या तयारीत आहे.
भारतामध्ये एकूण वाया जाणाऱ्या पाण्याच्या केवळ एक तृतीयांश पाणी स्वच्छ करण्याची क्षमता आहे. सरकारने गंगा नदी किनारी प्रदूषण पसरवणारे उद्योग बंद करण्याची घोषणा केली. येणाऱ्या काही वर्षांत देशातील औद्योगिक जगतात वॉटर रिसायलिंगची मागणी आणखी वाढेल. अजूनही या संधीबद्दल भारतीय कंपन्या साधा विचारही करत नाही, तेच विदेशी कंपन्या या संधी मिळवायला आतुर झाल्या आहेत. जलस्त्रोतांमध्ये होणारी घट आणि एकटे राहणाऱ्या वृद्धांची वाढती संख्या, ही व्यवसायाच्या मोठ्या संधींची छोटी उदाहरणे आहेत.
फंडा हा आहे की...
सावधपणे चहूकडे नजर टाकल्यास व्यवसायाच्या शेकडो संधी आपल्यासमोर उघड होतात. दुसऱ्यांची या संधीवर नजर पडण्यापूर्वीच त्या हस्तगत करायला हव्यात.