भविष्यात कोणत्या पद्धतीने बाजार बदलेल? ट्रेंड काय असू शकतो? तंत्रज्ञान कोणत्या दिशेने पुढे जाईल? हे काही असे प्रश्न आहेत, जे सर्व कंपन्यांवर परिणाम करतात. पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे की तुमचे कर्मचारी याविषयी जागरूक आहेत का? काही प्रश्नांद्वारे जाणून घ्यावे. कंपन्या आणि कर्मचारी कोणत्या पद्धतीने या बदलांसाठी तयार होऊ शकतील?
पहिला प्रश्न : कंपनीमध्ये भविष्याच्या आकलनासाठी कोणती प्रक्रिया आहे का? त्यासाठी लक्षपूर्वक कंपनीच्या वर्तमान धोरणाला पाहणे गरजेचे आहे. कर्मचारी प्रणाली कशा पद्धतीने राबवतात? कोणत्या परिवर्तनाची आज गरज आहे? वर्तमान पद्धती समजल्यास भविष्यातील गरजांचे आकलन होणे सोपे जाते. कंपनी आणि कर्मचाऱ्यांच्या गरजांविषयी चित्र स्पष्ट होते.
दुसरा प्रश्न :
आपण वृत्तपत्र कसे वाचतो? आपल्यापैकी अनेक जण तंत्रज्ञानात होणारे नवे बदल आणि शोध यांच्याविषयी जाणू इच्छितात. बहुतांश यशस्वी उद्योजक वृत्तपत्रे वाचून याद्वारे माहिती घेतात. वृत्तपत्रांद्वारे त्यांना भविष्यातील डिजिटलायझेशन प्रक्रियेचा वेध घेता येतो. वायरलेसमध्ये काय होणार आहे, कोणते उत्पादन आकाराने कमी होणार आहे याविषयी माहिती कळते.
तिसरा प्रश्न : आपण सतत या गोष्टीचा शोध घेत आहोत का की आपला बिझनेस आणि जे तंत्रज्ञान आपण वापरत आहोत या दोहोत सुसंगती आहे का? जेव्हा बिझनेस आणि तंत्रज्ञान हे परस्परांना पूरक नसतात तेव्हा अनेक समस्या समोर येतात. तुम्ही ज्या तंत्राचा वापर करत आहात ते आजच्या गरजेनुरूप कदाचित योग्य असेल. मात्र, नजीकच्या भविष्यासाठी ने निरुपयोगी ठरू शकते.
चौथा प्रश्न : माहितीचे आपण कसे व्यवस्थापन करतो, त्यांचा वापर कसा करतो? अनेक तऱ्हेच्या सूचना आणि माहिती आपल्याला क्षणोक्षणी मिळत असते. निष्णात नेतृत्व याला चांगले पारखतात. अनेक माहितीमध्ये नव्या कल्पनाही लपलेल्या असतात. या माहितीच्या आधारे दरवेळी पूर्वानुमान काढता येतेच असे नव्हे. मात्र, तुमचे सहकारी याविषयी सजग आहेत हे महत्त्वाचे. याआधारे तुम्ही भविष्यातील बदल करू शकता.
नोकरी व्यवस्थापन - नवे शिका छंदही कामाचा दर्जा सुधारण्यासाठी पूरक
अनेक संशोधनांत असे दिसून आले आहे की छंद आणि नव्या पद्धती शिकल्याने मेंदूला विरंगुळा मिळतो. त्यामुळे थकवा दूर होतो. शिवाय दैनंदिन कामाची क्षमता वाढते. तुमच्या कामादरम्यान या पद्धती मदत करतात. कारण तुम्ही जे काम करता त्यात नवे शिकता येते. ते कामादरम्यान अप्रत्यक्षपणे समोर येते. अशाच काही पद्धतींविषयी जाणून घेऊ. यापैकीच एक छंद आहे -कोडिंग शिकणे. हे उपयुक्त आणि मजेदार आहे. तुमच्या आवडीचा गेम तयार करण्यासाठी डिझायनिंगमध्ये याचा वापर करू शकता. असे करताना एखादा शानदार गेम तुम्ही कदाचित डिझाइन करू शकाल. कोडिंग काम करताना तुमची क्षमता एका वेगळ्या स्तरावरदेखील घेऊन जाऊ शकता.
दुसरा छंद म्हणजे - नवी भाषा शिकणे. त्यामुळे ज्ञान आणि माहितीचे नवे रस्ते खुले होतात. तुम्ही सीव्हीमध्ये तुमच्या या अतिरिक्त कौशल्याचा उल्लेख करता तेव्हा तुमचे महत्त्व वाढते. याशिवाय एक महत्त्वाचा छंद म्हणजे एखादे वाद्य शिकणे. हे कठीण काम आहे. यासाठी सातत्याने रियाजची गरज असते. एकाग्रता आवश्यक असते. वाद्य वाजवताना तुम्हाला कोणालातरी संगतही करायची असते. त्यामुळे तुम्ही इतरांसह योग्य समन्वय साधू शकता.
स्वव्यवस्थापन - सरावाने साधता येते तल्लीनता, कामावर लक्ष केंद्रित करण्यात अडथळे येत असतील तर या पद्धती उपयुक्त
मल्टी टास्किंगमुळे एकाग्र होण्याची क्षमता कमी होत आहे. अनेक संशोधनांतून ही बाब सिद्ध झाली आहे. काही पद्धती आहेत ज्याद्वारे तुम्ही एकाग्रता वाढवू शकता. जर तुम्ही पूर्ण झोप घेतली नाहीत तर तणाव वाढतो. एकाग्रता कमी होते. त्यामुळे झोप पूर्ण करणे अत्यावश्यक आहे. अनेकदा तुम्ही लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करता. मात्र, काही बाबींमुळे लक्ष विचलित होते. अनेकदा एकाग्रतेत काय अडथळा आहे हेदेखील कळत नाही. त्यामुळे अशा विचलित करणाऱ्या बाबींची यादी लिहून काढा. गॅजेट्समुळेदेखील एकाग्रता साधणे कठीण जाते. त्यामुळे महत्त्वाची कामे करताना सोशल मीडिया आणि ईमेल नोटिफिकेशन बंद ठेवा. या सर्वात महत्त्वाचे आहे की, कामाविषयी प्रतिबद्धता. जर इच्छा नसेल, प्रतिबद्धता नसेल तर कामावर लक्ष केंद्रित होत नाही. त्यामुळे कामाशी निष्ठा ठेवा. तुम्ही वेळापत्रक निश्चित करून घ्या. एकाग्रता पुन्हा मिळवण्यासाठी त्याचा सराव सातत्याने ठेवा. सुरुवातीला तुम्ही दहा मिनिटे सतत एकाग्र होण्यापासून सुरुवात करा. हळूहळू ही वेळ वाढवत न्या. याची दुसरी बाजू अशी की सतत तेच ते काम केल्यानेही एकाग्रता भंग पावते. काम कंटाळवाणे वाटू लागते. त्यामुळे कामात मधूनमधून विराम घ्या. त्यामुळे काम जड वाटत नाही.
तेच ते काम सतत करत राहील्यास कंटाळा येतो व कामाचा वेग कमी होतो. दर्जावरही परिणाम होतो.
कार्य व्यवस्थापन - खेळाचा प्रत्येक क्षण महत्त्वाचा, खेळाडूंमध्ये असतात कित्येक गुण, नोकरीमध्येही ठरतात उपयुक्त
खेळांचे अनुभव नोकरीतदेखील कामी येऊ शकतात. अनेक लोकांना हे मान्य नाही. कंपन्यांचे मुख्य व्यवस्थापकदेखील याला फारसे महत्त्व देत नाहीत. मुलाखत देणारा कधी तरी क्रीडापटू राहिला आहे, याकडे सपशेल दुर्लक्ष केले जाते. क्रीडापटूंमध्ये अनेक गुण रुजवले जातात. दैनंदिन कामातदेखील यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. यात सर्वात महत्त्वाचे आहे वेळेचे व्यवस्थापन. खेळाडू आपल्याजवळील वेळेचा चपखल वापर करतात. त्यांना अभ्यास आणि खेळाविषयी आपल्या आवडीला एकाच वेळी विकसित करावे लागते. त्यामुळे ते त्यानुसार धोरण आखतात. खेळाडूंना मैदानावर त्वरित निर्णय घ्यावे लागतात. त्यामुळे त्यांच्याकडे अधिक वेळ नसतो आणि बहाणेबाजीला स्थान नाही. त्यामुळे प्राप्त परिस्थितीला ते टाळू शकत नाहीत. असेच ते कामादरम्यानही करण्यास सक्षम असतात. क्रीडापटूंमध्ये संघभावना मजबूत असते. ते सहकाऱ्यांच्या मदतीसाठी तत्पर असतात. त्यामुळे अतिरिक्त दबाव असल्यास सहकाऱ्यांच्या मदतीसाठी ते पुढाकार घेऊ शकतात. त्यांना प्रोत्साहन देऊ शकतात. त्यांचे डोळे ध्येयावर असतात. त्यांना माहिती असते की सरतेशेवटी निकाल महत्त्वाचा आहे. टीका आणि सुधारण्याच्या सल्ल्यांविषयी ते अधिक खुलेपणाने प्रतिसाद देतात. खेळांमुळे ते मेहनतीस तत्पर असतात. त्यांच्या कामातून ती सिद्ध होते.