आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खास उत्सवासाठी हे आहे नवीन कलेक्शन, रंगातील रसायनांमुळे उद्भवू शकतात अनेक समस्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वस्त्रशैली:  अिस्मता अग्रवाल फॅशन लेखिका, नवी दिल्ली - Divya Marathi
वस्त्रशैली: अिस्मता अग्रवाल फॅशन लेखिका, नवी दिल्ली
रंगोत्सव हा प्रत्येकासाठी खास असतो. नवीन लोकांना भेटणे असो अथवा एखादा समारंभ असो. शेहला खान यांचे नवीन "कॅप्सूल' कलेक्शन तुमच्या पेहरावाची समस्या सोडवू शकतो.यात पेस्ट्रल ड्रेसपासून फन प्लेसूटपर्यंत नाविन्य आहे. रंगावर केलेला प्रयोग आणि डिजिटल प्रिंटिंग हे याचे मुख्य वैशिष्ट्य आहे.
 
होळी साजरी करण्याची तयारी असो अथवा मित्रांसोबत पार्टीसाठी जायचे असो, असे ड्रेस अधिकाधिक पसंत केले जातात. जे सहज परिधान केले जाऊ शकतात. शरीराच्या आकाराच्या तुलनेत मोठ्या मापाचे टी शर्ट अथवा सैल कपडे चांगले वाटतात, पण वापरात नसल्यामुळे हे परिधान करायला त्रासदायक वाटतात. याबाबत स्केटर ड्रेसेस आणि प्लेसूटविषयी विचार करा. कमी वयातील अधिकाधिक मुलींना असे कपडे घालायला आवडतात. शेहला खान यांचे नवीन कॅप्सूल कलेक्शन खासकरून त्यांना केंद्रित ठेवून तयार करण्यात आले आहे. 
 
शॉर्ट ड्रेसेसचे हे कलेक्शन लेस, क्रेप, ऑरगेंजा आणि टुले सारखे लग्जरियस फॅब्रिक तथा उत्कृष्ट एम्ब्रॉडरीसोबत डिझाइन केले आहे. डिजिटल प्रिटिंग आणि ललित कारागिरांकडून याची प्रत्येक डिझाइन आश्चर्यचकित करते. शेहलाने यामध्ये रंगांसोबत अनेक प्रयोग केले आहेत. आयव्हरी, बबलगम पिंक, क्रिम, फ्रेंच ब्ल्यू सारखे न्यूट्रल टोन्सपासूनन ब्लॅक आणि व्हाइट सारख्या परंपरागत रंगांचा यांनी उत्कृष्टपणे वापर केला आहे. हा असा ड्रेस आहे जो कौटुंबिक आयोजनांपासून उत्सव आणि मित्रमंडळींसोबत पार्टी, भेटीगाठीच्या कार्यक्रमांना सहज घालता येऊ शकते.

 लहानपणापासून डिझाइनरांची साथ
शेहलाची कौटुंबिक आणि शैक्षणिक पार्श्वभूमीमध्ये त्यांची डिझाइनर बनण्यासाठी मोठी भूमिका राहिली आहे.  त्यांचे वडील साजिद खान साक्स इंडियाचे संस्थापक आहे आणि गेल्या २५ वर्षांपासून एम्ब्रॉयडरी व्यवसायात आहेत.  फॅशनच्या जगतातील आंतरराष्ट्रीस्तरावर नाव असलेले  एस्काडा, एली साब आणि वॅलेंटिनो यांच्यासोबत ते काम करून चुकले आहेत. या कारणामुळे शेहला यांना आपले डिझाइनिंग प्रतिभेला सलाखून पाहण्याची संधी मिळाली. त्यांनी लंडन कॉलेज ऑफ फॅशनची डिझाइनची पदवी घेतल्यानंतर मिलानच्या इन्स्टिट्यूटो मारंगोनीतून स्टाइलिंगचा मास्टर कोर्स केला. इटलीचे प्रसिद्ध डिझायनर जियूसेप देगतानो व भारताचे सेलिब्रिटी डिझायनर मनीष मल्होत्रा यांच्यासोबत त्यांनी काम केले आहे. याशिवाय ते बॉलीवूड अिभनेत्रींचेही आवडीचे डिझायनर आहेत.
 
१९८०च्या दशकातील फॅशनवर भर
शेहला आपले डिझाइन्स जुन्या जमान्यात लोकप्रिय असलेल्या शैली नवीन अंदाजात सादर करत आहे. तीन महिन्यांपूर्वी त्यांनी ख्रिसमसला एक कलेक्शन लॉन्च केले होते. यामध्ये त्यांनी १९८०च्या दशकात लोकप्रिय स्टाइलचा आधार घेतला होता. नवीन कलेक्शनमध्ये त्यांनी जुनी आणि नवीन स्टाइल यामध्ये मेळ घालण्याचा प्रयत्न केला आहे. व्हाइट टॉपसोबत शॉर्टचे कॉम्बिनेशन याचे उत्कृष्ट उदाहरण आहे. स्लिप गाऊन, लाल रंगाचे ड्रेस, शॉर्ट लेससोबत ट्रेंडी व्हाइट ब्लाऊज, प्लेसूट्स या कलेक्शनचे आकर्षण आहे. 
 
पुढील स्लाईडवर वाचा,डोळ्यांची निगा,साैंदर्य, अाराेग्य , शिकवण, अाहार...
बातम्या आणखी आहेत...