आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला विश्व : दोन वेगवेगळ्या डिझाइन्सचा मेळ आहे हे कलेक्शन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वस्त्रशैली 
अिस्मता अग्रवाल
फॅशन लेखिका, नवी दिल्ली
 
सत्या पॉल व निदा महमूद यांनी एकत्र एक नवीन कलेक्शन लाँच केले आहे. साड्यांच्या अनोख्या डिझाइनसाठी प्रसिद्ध या दोन्हींंची भागीदारी फॅशन जगताच्या गरजांशी प्रेरित आहे. 
 
फॅशनच्या दुनियेत "सी नाऊ, बाय नऊ’ मूव्हमेंट सतत लोकप्रिय ठरली आहे. "एच. अॅण्ड एम.', "बर्बेरी' आणि "टॉमी हिलफिगर'सारखे ग्लोबल ब्रॅण्डही डिजिटल ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. साड्यांच्या डिझाइनमध्ये प्रयोगासाठी प्रसिद्ध सत्या पॉल यांनी अॅमेझॉनसोबत या क्षेत्रात पाऊल टाकले. नुकत्याच झालेल्या "अॅमेझॉन इंडिया फॅशन वीक ऑटम विंटर-२०१७'मध्ये या ब्रॅण्डने "एसपी लेबल' लाँच केले आहे. याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे डिझायनर निदा महमूद यांचे "कॅप्सूल' कलेक्शन हे आहे, जे खास या लेबलसाठी तयार केले आहे. 

सत्या पॉल आणि निदा महमूद यांच्या जुगलबंदीचा रोमांचक पैलू हा आहे की, दोन्ही आपल्या डिझाइनचे मिश्रण करतात. या दोन्हींच्या पद्धती खूप मिळत्याजुळत्या आहेत. दोन्ही आपापल्या पद्धतीने साड्यांना फॅशनचा भाग बनवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. निदा आपल्या डिझाइनमध्ये "मोटिफ्स'चा उपयोग करतात, तर सत्या यांची "ग्राफिक प्रिंट्स' ही खासियत आहे. नवीन कलेक्शनमध्ये १०० डिझाइन आहेत, त्या २० निदा यांनी तयार केल्या. त्यांच्या ‘कॅप्सूल’ कलेक्शनमध्ये ट्यूनिकपासून शर्ट आणि पॅन्टचाही समावेश आहे. 
 
अनिश्चिततेच्या वातावरणात फॅशनसाठी केलेली भागीदारी कदाचित पुढे जाण्याचा सर्वश्रेष्ठ मार्ग  आहे. निदा यांचे डिझाइन गेल्या २५ वर्षांपूर्वीच्या जुन्या ब्रॅण्डला नवीन जीवन देतील आणि नवीन ग्राहक समूहाला आकर्षित करतील, अशी अपेक्षा आहे. अॅमेझॉनशी केलेली मैत्री हे दर्शवते की, अनेक ई-कॉमर्स पोर्टलना स्थैर्य नाही; पण त्या केवळ आपल्या उत्पादनांना बाजारात विकण्याचा प्रयत्न करतात. याची दुसरी बाजू अशी की, हळू आणि गतिमान फॅशनसोबतच लोकप्रिय होत आहे. 
बातम्या आणखी आहेत...