आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नमुन्यादाखल मागवू शकता एकाच वेळी पाच चष्मे, त्यानंतर स्वस्त चष्म्यांची निर्मिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऑनलाइन खरेदी करताना ग्राहकांना वस्तू अंगावर वापरून खात्री करता येत नाही. ती संधी येथे नसतेच. मात्र, वॉर्बी पार्कर कंपनी ही संधी देते. यासाठी ग्राहक आपल्या पसंतीनुसार ५ प्रकारचे चष्मे मागवू शकतात. जी फ्रेम आपल्यावर शोभून दिसेल ती मागवणे त्यामुळे सोपे झाले आहे. याला ‘हाेम ट्राय ऑन’ प्रोग्राम असे म्हटले जाते. बाकी ऑनलाइन खरेदीमध्ये ग्राहक कल्पनेच्या आधारेच केवळ वस्तू खरेदी करू शकतो. कंपनीचे आयवेअरचे सर्व डिझाइन्स स्टायलिश आहेत. सर्वांची किंमत साधारण ९५ डॉलर्सच्या आसपास आहे. कंपनी  सामाजिक बांधिलकीसाठी उपक्रम राबवते. एका चष्म्याच्या विक्रीवर एक चष्मा कंपनी गरजूंना देते. गेल्या ६ वर्षांत कंपनीने आतापर्यंत २० लाख गरजूंना मोफत चष्मे दिले आहेत.  

एमबीएच्या दरम्यान ब्लुमेंथॉलची भेट जेफ रायडर, डेव्ह गिलबाआे आणि अँडी हंट यांच्याशी झाली. तिघेही पहिल्या वर्षाचे विद्यार्थी होते. एका सहलीदरम्यान कोणाचा तरी चष्मा हरवला. नवा चष्मा अत्यंत महाग असल्याने एक सत्र विनाचष्मा अभ्यास करणे भाग पडले. सर्वांची या विषयावर चर्चा झाली. अभ्यास, लिहिणे इत्यादी कामासाठी अनिवार्य आणि डॉक्टरांनी सांगितलेला चष्मा इतका महाग असणे त्रासदायक होते. चौघेही विचार करत होते की यावर काही कायमस्वरूपी तोडगा काढला जावा. याचा सामाजिक फायदाही असणे त्यांना गरजेचे वाटले. केवळ १ लाख २० हजार डॉलर्समध्ये त्यांनी बिझनेस सुरू केला. त्यापूर्वी अनेक सर्व्हे केले. संशोधनाची दीर्घ प्रक्रिया सुरू होती. त्यांनी बिझनेससाठी तीन प्राथमिकता ठरवल्या. सर्वात पहिले होते - फॅशन ब्रँड असणे. दुसरा- चांगला दर्जा आणि सेवा. तिसरा मुद्दा होता सोशल सर्व्हिसला बिझनेस मॉडेल म्हणून व्यापक स्वरूप देणे. चष्म्यांची किंमत केवळ ४५ डॉलर्स ठेवण्याचा निश्चय केला होता. मात्र, एका प्रोफेसरच्या सल्ल्याने त्यांनी विचार बदलला. त्यांनी दुप्पट किंमत ठेवण्याचा सल्ला दिला. त्यावर मार्केट रिसर्च करण्यात आले. त्यानंतर लक्षात आले की १०० डॉलर्सपर्यंत किंमत ठेवणे काही फार अधिक नाही. लोक आनंदाने इतके पैसे देतील. या चमूने आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांचे मत विचारले. प्रोफेसर्स आणि विशेषज्ञांचा सल्ला घेतला. बिझनेस आराखडा निश्चित केला. २०१० मध्ये त्यांनी कंपनी सुरू केली. या संपूर्ण संशोधन आणि मेहनतीमुळे कंपनी सुरू होण्यापूर्वीच त्यांच्याकडे २० हजारांपेक्षा अधिक ऑर्डर्स आल्या. ट्राय फाइव्ह काॅन्सेप्टनेदेखील त्यांच्या कंपनीच्या यशात भरच टाकली. त्यांची विक्री केवळ लोकांनी केलेल्या माऊथ पब्लिसिटीमुळे वाढली. 

कंपनीने आतापर्यंत ४०० विविध आयवेअर्स श्रेणी सादर केल्या आहेत. ब्लुमेंथॉल सांगतात की, हे केवळ ग्राहकांच्या विश्वासानेच शक्य झाले. त्यांच्या वारंवार खरेदीमुळे कंपनी यशस्वी झाली. अमेरिकेतील सरासरी ग्राहक २.१ वर्षात नवा चष्मा खरेदी करतात. मात्र, वॉर्बीच्या ग्राहकांचा हाच दर दुप्पट आहे. २०१० मध्ये पार्कर सुरू करण्यापूर्वी  ब्लुमेंथॉल यांनी व्हिजनस्प्रिंग कंपनीत संचालक म्हणून काम केले होते. ही एक विनानफा चालणारी सामाजिक संस्था आहे.
 
नील ब्लुमेंथॉल, को-सीईआे वॉर्बी पार्कर 
आयग्लास कंपनी वॉर्बी पार्कर. नील ब्लुमेंथॉल यांनी आपल्या तीन मित्रांसह मिळून ही कंपनी २०१० मध्ये सुरू केली. बाजारात उपलब्ध चष्मे खूप महागडे होते. त्यांना ते बदलायचे होते. त्यांचे अगदी वेगळे मॉडेल हे कंपनीचे वैशिष्ट्य. कंपनी ऑनलाइन चष्मे विकते. या चष्म्यांची किंमत कंपनीने केवळ ९५ डॉलर्स ठेवली आहे. एका चष्म्यावर दुसरा चष्मा गरजूंना कंपनी मोफत देते.