आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Noodles Pakode Recipe Read More At Divyamarathi.com

Recipe : कांदा, बटाटा भजी खाऊन कंटाळलात, मग ट्राय करा गरमा गरम नुडल्स भजी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नूडल्स आणि भजी सगळ्यांना भरपूर आवडतात. याआधी तुम्ही कांदा भजी, बटाटा भजी खाल्ली असतील पण आज आम्ही तुम्हाला एका वेगळ्या मिस्क भज्यांची रेसिपी सांगणार आहोत. चवीसाठी अत्यंत चटकदार असणा-या या रेसिपीचे नाव नुडल्स भजी असे आहे.
साहित्य :
बेसन - 1 कप
कोर्न फ्लोअर - 2 टेबल स्पून
नूडल्स - 1 कप उकडलेले
मशरूम - 2 छोटे-छोटे कापलेले
कोबी - अर्धा कप पातळ कापलेला
हिरवी मिर्ची - 1-2 बारीक कापलेली
अद्रक - 1, लांब बारीक कापलेले
हिरवे धने - 2 टेबल स्पून बारीक कापलेले
मीठ - 1/2 छोटा चमचा (स्वादानुसार)
लाल मिर्ची - 1/4 छोटा चमचा
तेल - तळण्यासाठी
कृती :
एका भांड्यामध्ये नूडल्स बुडतील इतके पाणी घेवून ते उकळून घ्यावे. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये 1 छोटा चमचा तेल आणि नूडल्स टाकावे. नूडल्स साधारण नरम होईपर्यंत उकळून घ्यावे. नंतर त्यातील पाणी काढून थंड पाण्याने धूवून घ्यावे. हे झाले तुमचे भज्यासाठीचे नूडल्स तयार.
आता एक भांड्यामध्ये बेसन आणि कॉर्न फ्लोअर टाकून थोडेसे पाणी टाकून चांगल्या प्रकारे घोळून घ्यावे. थोडेसे आणखी पाणी टाकून हे मिश्रण पातळ करून घ्यावे. आता त्यामध्ये मीठ, लालमिर्ची, हिरवी मिर्ची, हिरवे धने, आले , कापलेले मशरुम, पत्ता कोबी आणि नूडल्स टाकून चांगले एकत्र करून घ्यावे.
आता एका कढईमध्ये तेल गरम करून घ्या. आता त्यामध्ये हाताने अथवा चमच्याने तयार केलेले मिश्रण तेलात टाकावे. साधारण नारंगी रंग येईपर्यंत शिजवून घ्यावे. हे तयार झाले तुमचे चटदार गरमा गरम नूडल्स भजी तयार.
लक्षात ठेवा - तुम्हाला जर भजी क्रिस्पी करायचे असतील तर बेसनाच्या पिठामध्ये कॉर्न फ्लोअर ऐवजी चिमूटभर बेकिंग सोडा टाकू शकता.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, नूडल्स भजी कसे बनवावे याचा व्हिडिओ...