आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेकअप करतानाच्या घोडचुकांमुळे वय जास्त दिसते

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुमच्या वयापेक्षा तुम्हाला अधिक तरुण दाखवण्याची ताकद मेकअपमध्ये आहे. मात्र, यात मोठ्या चुका झाल्या तर अगदी उलट परिणाम दिसून येतो. सौंदर्यतज्ज्ञ मेघा कृपलानी मेकअपदरम्यान होणाऱ्या चुका टाळण्यासाठी काही टिप्स देत आहेत.

जास्त फाउंडेशनचा वापर
वयाच्या वाढीसोबत त्वचा पातळ होऊ लागते. तुम्ही फाउंडेशन जास्त वापरल्यास तुमच्या त्वचेवर दबाव येतो. त्यामुळे त्वचा सैल पडते. हेवी फाउंडेशन फाइन लाइन्सला हायलाइट करते.

उपाय : त्वचेला मॅट राहू द्या. फिकट फाउंडेशन वा मुस वापरा. लॅक्मेचे अॅब्सॉल्यूट मटेरियल स्किन नॅचरल मूस योग्य पर्याय ठरू शकतो.

जास्त डार्क लिपस्टिक
उवयोमानाप्रमाणे आेठ आक्रसतात. गडद रंगाने पाऊट पातळ दिसू लागते. दिल्लीच्या मेकअप आर्टिस्ट अनू कौशिक यांचा हा सल्ला आहे. डार्क मरुन व प्लमचा वापर कमी करा.

उपाय : फिकट व सॉफ्ट शेड वापरा. चेहऱ्याच्या दोन्ही किनाऱ्यांवर हायलायटर वापरा. न्यूड लिप लायनरने आऊटलाइन करा. गडद लिप लायनर वापरू नका. नेहमी मॉइश्चरायजिंग प्रसाधने वापरा.

ग्लिटर आयशॅडो
ग्लिटर आयशॅडोचा वापर थोडा कमी करा. त्यामुळे डोळ्यांभोवती सुरकुत्या वाढतात.

उपाय : मॅट शॅडो निवडा. तुमच्या त्वचेच्या रंगाला तो कॉम्प्लिमेंट करतो. बॉबी ब्राऊन आयशॅडो वापरून पाहा.

ब्राउनिश ब्लश
वय वाढताना त्वचा सैल पडू लागते. ब्रोंझर वा ब्लश जर ब्राऊन रंगाचा असेल तर ते आणखीच हायलाइट होते. हे टाळण्याचा सल्ला पश्चिम बंगालच्या मेकअप आर्टिस्ट रॅल्फ डेनियलने दिलाय.

उपाय : भारतीय वर्णासाठी पीच टोन ब्लश योग्य आहे. गालांवर सुरू करत साइडने ब्लेंड करत जा. ब्लश हलकासा वापरा. तजेलदार तरुण दिसण्यासाठी पीच पिंक ब्लश वापरा.

कन्सिलर योग्य नाही
कन्सिलरने पूर्ण कव्हरेज हवे असल्यास त्वचेला चांगला मसाज द्या. स्पॉन्जने हे शक्य नाही. लूक नॅचरल दिसत नाही.

उपाय : डोळ्यांखाली कन्सिलरचे ३ डॉट लावा. रिंग फिंगरने याला हलकेच ब्लेंड करा. रेव्हलॉनचे फोटो रेडी कन्सिलर वापरू शकता.

वॉटरप्रूफ मस्कारा : वाढत्या वयासोबत पापण्या पातळ होत असल्याचे मुंबईच्या सौंदर्य व त्वचारोगतज्ज्ञ डॉ. अपर्णा संथानम सांगतात. वॉटरप्रूफ मस्कारा वापरून तुमच्या पापण्यांचे नुकसानच होते.

उपाय : वॉटरप्रूफ मस्कारा खास प्रसंगीच वापरा. पापण्यांत आेलावा राहण्यासाठी जुन्या मस्कारा व्हँडने कॅस्टर ऑइल लावा.

> उत्कृष्ट पोत असलेला काळ्या वा न्यूट्रल रंगाचा गाऊनही विशेष आहे. या फुल लेंथ गाऊनमध्ये अभिजात कशिदा आहे. बारीक कुसरही यात फिलर्ससारखी आहे.पौष्टिक शर्करामुक्त पेये तुम्हाला ठेवतात सुदृढ
बातम्या आणखी आहेत...