आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुंग नदीच्या किनारी वसलेले प्राचीन मठ आणि मंदिरांचे गाव श्रृंगेरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कर्नाटकच्या चिकमंगळूर जिल्ह्यात तुंग नदीच्या किनारी शृंगेरी गाव वसलेले आहे. हे स्थळ आदी शंकराचार्यांनी स्थापन केलेल्या मठासाठी प्रसिद्ध आहे. याशिवाय येथे अनेक धार्मिक स्थळे आणि सुंदर निसर्ग आहे. हे गाव पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक आणि भाविक येत असतात.
कर्नाटकच्या दाट जंगलातून तुंग नदी वाहते. या नदीच्या किनारी एक लहानसे गाव आहे शृंगारी. येथे आदी शंकराचार्यांनी स्थापन केलेला मठ आहे. असे म्हटले जाते की, शंकराचार्य मठासाठी जागा शोधत जात होते. अचानक येथे मोठा पाऊस सुरू झाला. त्यामुळे ते एका झाडाखाली थांबले. तेथे एक साप आपला फणा काढून एका बेडकाचे पावसापासून रक्षण करीत असल्याचे दृश्य दिसले. संकटाच्या वेळी आपल्या शत्रूला शत्रू कशी मदत करतो, हे पाहून शंकराचार्यांना आश्चर्य वाटले. या जागेत नक्कीच दैवी शक्ती आहे, असे शंकराचार्यांना वाटले. त्यांनी येथेच पहिला मठ स्थापन केला.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, श्रृंगेरीबद्दलची इतर माहिती...