(छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे )
शरिराच्या मांसपेशिंमध्ये आलेल्या अस्थिरतेला पॅरेलेसिस असे म्हणतात. या आजारामध्ये शरिरातील काही मांसपेशि काम करणे बंद करतात. हा आजार मुख्यता नर्वस सिस्टिममध्ये आलेल्या शिथिलतेमुळे निर्माण होतो. पॅरेलेसिस शरिरातील कोणत्याही भागामध्ये होऊ शकतो. या आजारामुळे तुमचे संपूर्ण शरीर प्रभावित होण्याचीदेखील भिती असते. याला क्वाड्रिप्लेजिया असे म्हंटले जाते. यामध्ये हात-पाय दोन्हीही काम करणे बंद करते. तर पॅरेप्लेजियामध्ये शरिराचा खालचा भाग प्रभावित होतो.
पॅरेलिसिस होण्याची कारणे आणि बचाव
पॅरेलेसिस होण्यामागे अनेक कारणे आहेत. यामध्ये न्यूरोलॉजिकल, एखाद्या दुर्घटनेमध्ये पाठीचा कण्याला दुखापत झाली असेल आणि काही इंटरनल बायोलॉजिकल डिफॉर्मेशन असेल तर.
पॅरेलेसिसची लक्षणे या न्यूरोलॉजिकल आजारांमुळे देखील होऊ शकते, जसे :
● एमियोट्रॉफिक लेटरल सिरॉसिस (ALS)- मांसपेशिंमध्ये कमजोरी अथवा विकलांगता
● बेल्स पॉल्सी-चेह-यातील नसांमध्ये सूज
● सेरिब्रल पॉल्सी
● मल्टिपल सिरॉसिस- मेंदू अथवा पाठीच्या कण्याची कमजोरी
याशिवाय पॅरेलेसिसचे इतरही कारणे आहेत, जसे पाठीच्या कण्याला मार लागणे, गोळी अथवा चाकू लगणे, शॉक बसणे, यामुळे पॅरेलेसिस होण्याचा धोका अधिक असतो. एचआईवी इन्फेक्शन, आर्थराइटिस, स्पॉन्डेलायटिस हे आजार असल्यास. विषारी पदार्थांचे सेवन अथवा विषारी जनावरांना कापल्याने देखील पॅरेलेसिस होण्याची भिती अधिक असते. पॅरेलेसिसमुळे हार्ट अटॅक, ब्रेन ट्यूमर आणि ब्रेन हॅमरेज होण्याची भिती अधिक असते.
पुढील स्लाइडवर वाचा, शरिराच्या इतर भागांवर दिसणारे पॅरेलेसिसची लक्षणे...