आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिट राहण्यासाठी दूध आवश्यक; स्नायू होतात बळकट, वाचा इतर खास गोष्टी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या आहारात दुधाला खूप महत्त्व आहे; परंतु ज्या वेळी फिटनेसचा विचार केला जातो, तेव्हा त्याच्याशी निगडित अनेक प्रश्न उपस्थित होतात. उदा. दूध प्यायल्याने लठ्ठपणा येतो का किंवा बाजारात उपलब्ध असणा-या दुधापैकी कोणते दूध फायद्याचे आहे, असे प्रश्न मनात येतात. या प्रश्‍नांची उत्तरे मिळवण्‍यासाठी आज आम्‍ही दिलेली माहिती तुम्‍हाला काळजीपुर्वक वाचावी लागेल.
दुधामुळे लठ्ठपणा कमी होतो-
शास्त्रज्ञांनी केलेल्या अनेक संशोधनांत सिद्ध झाले आहे की, कॅल्शिअममुळे शरीरातील फॅट बर्न होण्याची क्षमता वाढते. याशिवाय दुधातील प्रोटीनही फॅट बर्न करायला मदत करते. याचा अर्थ असा की, दूध पिल्याने वजन वाढत नाही, उलट कमी होते. परंतु, योग्य प्रमाणाचा नियम येथेही लागू होते. गरजेपेक्षा जास्त दूध हानिकारकही आहे. 250 मिलीमीटर मलाईदार दुधामध्ये जवळपास १५० कॅलरीज असतात. जर तुम्हाला पुरेशा प्रमाणात दूध हवे असेल, तर कमी फॅट असणारे दूध घ्या. ते आरोग्यासाठी योग्य राहील. कारण याच्यात मलईदार दुधापेक्षा कमी (जवळपास १२० कॅलरीज) कॅलरीज असतात.
दुधाचे आणखी फायदे जाणून घ्‍या पुढील स्‍लाईडवर...