आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरातच्या पांढ-या वाळवंटात संस्कृतीचे रंग, अवश्य पाहा येथील रण उत्सव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपण जर गुजरातेत जात असाल तर रण उत्सव पाहायलाच हवा. तो पाहिल्याशिवाय गुजरात यात्रा अपूर्ण राहिली, असे मानले जाईल. गुजरात पर्यटन महामंडळाने आयोजित केलेल्या या उत्सवात स्थानिक कला आणि संस्कृती दिसून येते. या कलेतून गुजरातच्या संस्कृतीचे दर्शन होते.
गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात कच्छच्या रणात टेंट सिटीत हा मोठा रण उत्सव डिसेंबर ते मार्चदरम्यान होतो. रण उत्सवादरम्यान येथे नृत्य, संगीत, कला आणि शिल्पाचे कार्यक्रम होत असतात. हा काळ कच्छचे पर्यटन करण्यासाठी सर्वांत चांगला काळ आहे. हा भाग सत्कार, जोश, मोहकता आणि पौराणिक अनुभूतीने संपन्न आहे. यामुळेच या उत्सवाला रणउत्सव म्हटले जाते.

हे ठिकाण मित्र आणि कुटुंबासोबत सुटीत पर्यटन करण्यासाठी उत्कृष्ट आहे. पौर्णिमेच्या रात्री चमकणाऱ्या पांढऱ्या वाळवंटाबरोबरच कच्छची संस्कृती, हस्तशिल्प, कला-संगीतामुळे येथे सुटी आनंदात साजरी होते. रण येथील महिलांनी घातलेल्या चांदीच्या बांगड्या, हातांवरील नक्षी, घेरदार पोशाख पाहून येथील संस्कृतीची ओळख होईल. तेथेच पगडी, धोतर, घेरदार अंगरखा घातलेले, रुबाबदार मिशांचे लोक लक्ष वेधून घेतात. हे लोक ढोलकी कमरेला बांधून लोकगीत गात राहतात. चांदण्या रात्री नैसर्गिक दृश्य आणि लोकगीत, नृत्याच्या सादरीकरणाने वातावरण आणि मन प्रसन्न होते. गुजरातचा कच्छचा रणउत्सव पर्यटकांच्या कायम लक्षात राहतो.
केव्हा जावे: डिसेंबरते मार्च दरम्यान
काय खावे?: येथे आपण गुजराती आणि काठेवाडी पदार्थांचा आस्वाद घेऊ शकता.
कुठे थांबावे?: भुजच्या जवळ टेंट अर्थात तंबू उभारून वसाहत उभारली जाते. तेथे थांबता येईल.

कसे पोहोचावे: कच्छच्या रणात जाण्यासाठी भुज किंवा अहमदाबादमार्गे जाता येईल.
अहमदाबाद विमानतळ सर्वात जवळ आहे. तेथे उतरता येईल.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा गुजरातमध्ये गेल्यानंतर काय पाहाल...