फोटो- मेथीचे गट्टे
नाश्ट्यामध्ये तुम्हाला काही नविन खाण्याची इच्छा असेल तर बनवा लेस ऑइल फ्रि मेथीचे गट्टे.
साहित्य -
बेसन पीठ - 200 ग्रॅम (एक कप )
मेथी - 200 ग्रॅम ( 1 कप)
हिंग - 1 ते 2 चिमूट
मीठ - छोटा चमचा
लाल मिर्ची - 1/4 छोटा चमचा
धने पावडर - एक छोटा चमचा
तेल - 1 मोठा चमचा
गट्टे फ्राय करण्यासाठी
तेल - 1/5 टेबल स्पून
हिंग - 1 चिमूट
जिरे - अर्धा छोटा चमचा
मोहरी - अर्धा छोटा चमचा
हिरवी मिर्ची - 1-2 (बारीक कापलेली )
आले - एक मोठा तुकडा (बारीक कापलेला)
धने पावडर - 1 छोटा चमचा
लाल मिर्ची पावडर - 1/4 छोटा चमचा ( गरजेनुसार )
मीठ - अर्धा छोटा चमचा (स्वादानुसार)
गरम मसाला - 1/4 छोटा चमचा
कृती :
गट्टे बनवण्यासाठी पीठ मळून घ्या :
मेथीची पाने निवडून घेवून स्वच्छ पाण्यातून 2-3 वेळा धून घ्या. पाणी काढून बारीक कापून घ्या. आता एका भांड्यामध्ये बेसन घेवून त्यामध्ये कापलेली मेथी, मीठ , हींग, लाल मिर्ची, धने पावडर आणि तेल टाकून चांगले एकत्र करून घ्या. 1-2 चमचे पाणी टाका. पीठ मऊ मळून 10-15 मिनिटांसाठी झाकून ठेवावे.
पीठ चांगले भिजल्यानंतर मोठ्या आकारात रोल बनवून घ्या. आता एका भांड्यात पाणी घेवून त्यामध्ये सर्व रोल भिजत टाका. एका कढईमध्ये 4 कप पाणी उकळण्यासाठी ठेवावे. पाणी चांगले उकळल्यानंतर तयार करून ठेवले रोल 1-1 कर सोडावे. साधारण 10-15 मिनिटांसाठी चांगले उकळू द्यावे. गॅस बंद करून थंड करून रोल्स पाण्यात बाहेर काढून पाणी निघून जाण्यासाठी एका कढईमध्ये ठेवावे. रोल्स थंड झाल्यानंतर अर्धा इंच जाड तुकड्यांमध्ये कापून त्याचे गट्टे बनवून घ्यावे.
गट्टे फ्राय करा :
एका कढईमध्ये तेल गरम करून घ्या. तेलामध्ये हिंग, जिरे आणि मोहरी टाकून फोडणी करून घ्या. त्यामध्ये हिरवी मिर्ची, आले आणि धने पावडर टाकून थोडेसे तळून घ्यावे. आता त्यामध्ये मसाले गट्टे टाकून त्यावर मीठ , लाल मिर्ची, गरम मसाला आणि अमचूर पावडर टाकावी. हे मिश्रण 2-3 मिनिटे चांगले शिजवून घ्यावे. चमचमीत मेथी फ्राय तयार ...