आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • NIsha Madhulika Recipe Of Veg Nuggest Read More At DivyaMarathi.Com

Recipe : असे बनवा वेग-वेगळ्या भाज्या एकत्र करून व्हेज नगेट्स...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनेक प्रकारच्या भाज्या आणि शेंगदाणे एकत्र करून बनवलेले नगेट्स खाण्यास टेस्टी लागतात. वरून हे खाण्यास कुरकुरे असतात. तर, आतून कदम मऊ असतात. व्हेज नट्स तुम्ही केव्हाही खाऊ शकता हे नक्कीच तुम्हाला मनापासून आवडतील.
साहित्य :
बटाटे - 200 ग्रॅम (3 बटाटे)
गाजर, पत्ताकोबी - एक कप (बारीक कापलेला )
शिमला मिर्ची, फूलकोबी - एक कप (बारीक कापलेला )
हिरवी मिर्ची - 1-2 (बारीक कापलेली)
आले - एक लांब तुकडा
लाल मिर्ची - 2 चिमूट
कॉर्न स्टार्च अथवा मैदा - 2 टेबल स्पून
मूंगफलीचे दाणे - 2 टेबल स्पून (भाजलेले, सोललेले )
मीठ - स्वादानुसार (3/4 छोटे चमचे)
रवा अथवा ब्रेडचा चूरा - अर्धा कप
तेल - व्हेज नगेट्स तळण्यासाठी
कृती :
सर्वात आधी बटाटे उकडून घ्यावे. नंतर त्याचे साल काढून बाकीक कापून घ्यावे. आता यामध्ये सर्व कापलेल्या भाज्या टाकून घ्या. मोठे कुटलेले मूंगफ़लीचे दाणे, हिरवी मिर्ची, आले, लाल मिर्ची आणि मीठ टाकून सगळे मिश्रण चांगले एकत्र करून घ्यावे. आता 2 चमचे कॉर्न स्टार्च अथवा मैदा 3 चमचे पाण्यात मिस्क करून पकोडे घोळून घ्या.तयार मिश्रण थोडे-थोडे हातावर घेऊन गोल आकारात तयार करून घ्यावे. तयार केलेले गोळे एक-एक करून मैद्यामध्ये घोळून घ्यावे आणि ब्रेडच्या चू-यामध्ये लपेटून घ्यावे हे सर्व नगेट्स 20-30 मिनिटांसाठी फ्रिज़मध्ये ठेवावे.
एका कढाईमध्ये तेल टाकून ते गरम करून घ्या. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये नगेट्स टाकून ब्राउन होईपर्यंत तळून घ्यावे. चांगले तळून झाल्यानतर नॅपकिन अथवा पेपर नॅपकिनवर ठेवावे. हे झाले तुमचे गरमा-गरम आणि स्वादिष्ट वेज नगेट्स तयार. हे तुम्ही आंबट, गोड अथवा तुम्हाला आवडणा-या चटनीसोबत खाऊ शकता.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा व्हेज नगेट्स कसे बनवावे याचा व्हिडिओ