आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोशाखातील वैविध्याने करा विवाह सोहळा अविस्मरणीय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पारंपरिक भारतीय पोशाखांचा परिघ दिवसेंदिवस विस्तारत आहे. लग्न सोहळ्यातील पारंपरिक पद्धती जोपासतच त्याला आधुनिकतेची झिलई चढवली जात आहे. डिझायनर गौतम गुप्ता खास विवाह समारंभासाठी साजेशा पोशाखांविषयी सांगत आहेत. नववधूसाठी या स्टाइल्स नक्की मार्गदर्शक ठरतील.
कॉकटेल
कॉकटेल पार्टीसाठी ड्रेप साडी, रॉयल ब्ल्यू किंवा काळा गाऊन चांगले पर्याय ठरतात. काही हटके वापरायची इच्छा असेल तर बोल्ड ज्वेलरीसोबत प्लेन गाऊन किंवा ड्रेसचा वापर करा. एम्बोस्ड सिल्क, हॅमर्ड सिल्क, शीअर नेट आणि फ्रेंच लेसेससारखे फॅब्रिक वापरू शकता. पार्टीसाठी हे योग्य पाेत ठरतील.
संगीत
संगीत समारंभात मनसोक्त नाचण्याचा माहोल असतो. अशा प्रसंगी फ्लेअर्ड लहंगा, अनारकली, शरारा, गरारा किंवा पटियाला सोयीचे पोशाख ठरतात. टँगरीन, लाइम ग्रीन, गुलाबी व निळा हे रंग प्रसंगोचित ठरतात. बनारसी जॉर्जेट, फ्रेंच लेस, चंदेरी, जकार्ड जॉर्जेट पोतांचे वा हँडलूम फॅब्रिकवर रेशमी कशिदा, फुलकारी, डोरी, टसल्सचे काम असणारे पोशाख निवडा. कर्व्हज् दिसण्यासाठी शॉर्ट चोळीवर फ्लेअर्ड लहंगा ,प्लाजोची निवड करू शकता.
वेडिंग

समकालीन लूक व पारंपरिक शैलीची संगती या प्रसंगी साधता येते. ड्रेप साडी, भरगच्च-सुबक कशिद्याचा ब्लाऊज, अनारकली, धोती ट्राउजर, शिवाय फ्यूजन ड्रेस वा लहंगा स्कर्टसोबत क्रॉप टॉपची निवड करता येते. खास प्रसंगासाठी रॉयल ब्ल्यू, अर्थी ब्राऊन, हिरवा, सीक्रेस्टच्या संगतीचा गुलाबी पोशाख योग्य. प्लेन साडीसाठी मेटल, बीड कशिद्याचे ब्लाऊज चांगला पर्याय ठरतो. जॅकेटवर लेझरकटही वापरता येते.
मेंदी
मेंदी लावणे हा खास कार्यक्रम विवाहादरम्यान असतो. पारंपरिक कुडता, त्यावर लांब स्कर्ट वा पँट वापरू शकता. पिवळा, रास्पबेरी, मोरपंखी, सोनेरी रंग या दिवसासाठी योग्य ठरतात. शिफॉन, चंदेरी, जॉर्जेट, बनारसी जॉर्जेटसारखे आरामदायक पोत निवडा. प्लाजो, रॅप अराउंड स्कर्ट, शरारा, पटियाला, अनारकली सोयीचे पोशाख ठरतात.
रिसेप्शन
हा मोठा समारंभ असतो. या दिवशी लूक थोडा कालानुरूप ठेवा.गाऊन, गाऊन साडी, शरारावर जॅकेट वा ड्रेप साडी उचित ठरते. सिल्क, ब्रोकेड, ऑर्गन्झा, ब्लेंडेड सिल्क फॅब्रिक फ्लोई आणि सिलहूट्स पोशाखांची निवड करा. थ्रीडी कशिदाकारी, लेअरिंगमध्ये शीयरची संगती घेता येईल. कोरल, लाल, गडद गुलाबी, हिरवा इत्यादी रंगांची निवड करा.
बातम्या आणखी आहेत...