आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वांसाठी एकसारखा आहार आणि व्यायाम फायदेशीर नसल्याचे संशोधनातून झाले सिद्ध!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बहुतांश लोकांप्रमाणेच केविन हॉल यांना वाटायचे की लोकांच्या लठ्ठपणाची कारणे एकदम सामान्य आहेत. ते विचारायचे की लठ्ठ माणसे कमी खाऊन व्यायाम का करत नाहीत? भौतिकशास्त्रज्ञ हॉल जेेवढ्या कॅलरीज खाल तेवढ्या पचवा या गणितावर विश्वास करायचे. मात्र त्यांचे स्वत:चे हे संशोधन रियालिटी टीव्ही शोमध्ये भाग घेणाऱ्यांनी चुकीचे असल्याचे सिद्ध केले.
 
अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थमध्ये (एनआयएच) वैज्ञानिक हॉल यांनी काही वर्षांपूर्वी आपल्या मित्राच्या सांगण्यावरून टीव्ही शो - द बिगेस्ट लॉजर पाहायला सुरुवात केली. ते सांगतात, मी त्या लोकांना एका आठवड्यात ९ किलो वजन कमी करताना पाहिले होते. अवघड व्यायाम आणि मर्यादित डायटमुळे वजन कमी केले जाऊ शकते. तरीही एका आठवड्यात ९ किलो तर जास्तच झाले. त्यामुळे त्यांनी शो मध्ये भाग घेतलेल्या १४ लोकांचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला. पूर्ण सीझनमध्ये प्रत्येक सहभागीने ५७ किलो वजन घटवले जे त्यांच्या शरीरातील चरबीच्या ६४ टक्के इतके होते. हॉल यांना अभ्यासातून अशी माहिती मिळाली ज्याची त्यांनी आशाही केली नव्हती. शोनंतर १४ पैकी १३ सहभागींनी जेवढे वजन घटवले होते त्याच्या ६६ टक्के परत वाढवले. चार जण तर पहिल्यापेक्षा जास्त लठ्ठ झाले होते.
 
या दरम्यान, २०१७ मध्ये एका अभ्यासात स्पष्ट झाले की, अमेरिकेत धूम्रपानापेक्षा लठ्ठपणामुळे जास्त मृत्यू होतात. आता हे सर्वमान्य झाले आहे की, अधिक चरबीमुळे टाइप २ मधुमेह, हृदयाचे आजार, नैराश्य, श्वासाची समस्या, अनेक प्रकारचे कर्करोग, प्रजनन क्षमतेत घट आदी गंभीर समस्या उद््भवतात. अमेरिकेत वयस्क व्यक्तींचे वजन जास्त असल्याचे आढळते. त्यापैकी ४० टक्के मेडिकल मानकानुसार लठ्ठ आहेत. त्यामुळे वजन घटवणाऱ्या व्यवसायाचा आकार ४२८० अब्ज रुपयांपर्यंत अवाढव्य वाढला.
 
नुकत्याच झालेल्या एका संशोधनामुळे वैज्ञानिकांना हे जाणून घेण्यात मदत होत आहे की, डायटिंग इतके खडतर का आहे? दीर्घ काळापर्यंत  वजन कमी ठेवणे अवघड का आहे? काही लोकांना वजन कमी ठेवण्यात समस्या का होते? प्रमुख शोधकर्ते या गोष्टीशी सहमत आहेत की चांगल्या आरोग्यासाठी व्यायाम अतिशय गरजेचा आहे. परंतु दीर्घ काळापर्यंत  शरीराला चरबीपासून दूर ठेवण्याचा विश्वसनीय मार्गच नाही. एखाद्या व्यक्तीच्या आहारावरून वजनाचे घटणेे-वाढणे निश्चित होते. लठ्ठपणावर संशोधन करणारे फ्रेंक सॉक्स म्हणतात की, ठरावीक आहारामुळे काही व्यक्ती २५ किलो वजन घटवून ते दोन वर्षांपर्यंत तसेच कायम ठेऊ शकतात, तर त्याच पद्धतीने चालणाऱ्या काही व्यक्ती ४ किलोने वजन वाढवू शकतात.
 
हॉल, सॉक्स आणि अन्य वैज्ञानिक हे सांगतात की वजन कमी करण्यासाठी डायटऐवजी व्यक्तीच महत्त्वाची भूमिका बजावते. संशोधन सांगते की, ८० टक्के जाड व्यक्तींचे वजन घटल्यानंतर पुन्हा वाढले. हे यामुळे की, जेव्हा तुमचे वजन घटते तेव्हा रेस्टिंग मेटाबॉलिझ्मची (आरामाच्या दरम्यान शरीर किती ऊर्जेचा वापर करते.) प्रक्रिया धिमी पडते. मेटाबॉलिझ्म शरीरातील कोशिका आणि अवयव जिवंत ठेवण्याची रासायनिक प्रतिक्रिया आहे. हॉल यांना आढळले की, बिगेस्ट लॉजर शो मधील सहभागींनी घटलेले वजन थोडे वाढल्यावर  रेस्टिंग मेटाबॉलिझ्म त्याच्या पद्धतीने चालत नव्हते. त्याऐवजी ते संथ होते. वजन घटवण्याच्या प्रक्रियेच्या प्रारंभाच्या तुलनेत त्याने प्रतिदिवस ७०० कॅलरी कमी खर्च केल्या होत्या. जगातील दोन अब्ज लठ्ठ लोकांना केविन हॉल यांचे निष्कर्ष निराश करू शकतात. ते सांगतात की, ही इच्छाशक्तीची कमतरता नसून शरीर रचनेचा परिणाम आहे. मात्र संथ मेटाबॉलिझ्मही सर्व काही नव्हे. खूप लोक वजन घटवण्यात यशस्वी ठरतात. काही व्यक्ती कोणत्याही डायटने वजन कमी करू शकतात. हॉल सांगतात, ‘तुम्ही काही व्यक्तींना कमी कार्बोहायड्रेट्स आणि कमी फॅट असणारा डायट देता. त्यापैकी काही लोक वजन घटवण्यात प्रचंड यशस्वी होतात. काहींचे वजन घटत नाही, तर काहींचे वाढते.’ जाणकार हा गुंता सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
 
ब्राऊन युनिव्हर्सिटीतील मनोविज्ञान आणि मानव व्यहाराच्या प्राध्यापिका रेना विंग गेल्या २३ वर्षांपासून नॅशनल वेट कंट्रोल रसिस्ट्री (एनडब्ल्यूसीआर) चालवत आहेत. ती वजन घटवणाऱ्या आणि वाढवणाऱ्या लोकांचे रेकॉर्ड ठेवते. कोलोरेडो युनिव्हर्सिटीतील लठ्ठपणावर संशोधन करणारे आणि विंग यांचे सहयोगी जेम्स हिल म्हणतात, आम्ही हा विचार करून सुरुवात केली की, वजन घटवणे आणि ते तसेच कायम ठेवण्यात कोणीही व्यक्ती यशस्वी झाली नाही. रजिस्ट्रीत सहभागासाठी एखाद्या व्यक्तीने आपले वजन ३० किलो घटवणे आणि ते एक वर्ष तसेच ठेवणे आवश्यक होते. आज रजिस्ट्रीत १०००० हून जास्त व्यक्ती सहभागी आहेत. दरव्यक्ती वजन घटण्याचे प्रमाण ३० किलो आहे. वर्तमान सूचित लोकांनी आपले वजन सरासरी पाच वर्षांपर्यंत कमी ठेवले आहे.  जवळपास ४५ टक्के लोकांनी सांगितले की, वेगवेगळ्या पद्धतीचा डायट अंगीकारून त्यांनी वजन कमी केले. ५५ टक्के लोकांनी सांगितले की त्यांनी वजन घटवण्याच्या निश्चित पद्धतीचा अवलंब केला. बहुतांश लोकांनी एकापेक्षा जास्त डायट प्लानचा अवलंब करूनच वजन कमी केले. संशोधकांना त्यांच्यात काही समानता आढळली. अभ्यासात सहभागी ९८ टक्के लोकांनी सांगितले की, त्यांनी आपल्या डायटमध्ये सुधारणा केली आहे. ९४ टक्के लोकांनी व्यायामाचा अवलंब केला आणि त्याच सर्वात प्रचलित पद्धत म्हणजे चालणे.
 
हॉल, विंग आणि त्यांचे सहयोगी सांगतात, रजिस्ट्रीत सहभागींपैकी कोणत्याही दोन व्यक्ती अशा नाहीत ज्यांनी एकाच पद्धतीने आपले वजन घटवले. ओटावात बेरियाट्रिक मेडिकल इन्स्टिट्यूट यावर काम करत आहे. येथे वजन घटवू इच्छिणाऱ्या सर्व लोकांना सहा महिन्यांपर्यंत एकसारखा डायट आणि व्यायामाचा प्लान देण्यात आला आहे. मात्र त्यांना डॉक्टरांच्या मदतीने आपल्या आवडीचा प्रोग्रॅम निवडण्याचे स्वातंत्र्य आहे. बहुतांश लोकांनी वेगवेगळ्या पद्धती अवलंबल्या आणि ते यशस्वी झाले. इन्स्टिट्यूटचे संचालक योनी फ्रीडहॉफ सांगतात, प्रत्येकासाठी वेगवेगळे मापदंड असायला हवेत. प्रत्येकासाठी एकसारखाच डायट योग्य नाही.
 
बातम्या आणखी आहेत...