आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उन्हाळ्यासाठी स्ट्रीट आर्टचा प्रयोग केलेले नवीन कलेक्शन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उन्हाळ्याचे आगमन लवकरच होणार आहे. उन्हाळ्यासाठी हलक्या-फुलक्या कपड्यांचा ट्रेंड असेल. रंगही त्यांचा भडक नको. या बाबी लक्षात घेऊन सत्या पॉलने स्ट्रीट आर्ट ग्राफिटीवर आधारित नवीन कलेक्शन लाँच केले. जाणून घ्या ही नवीन माहिती… 

स्टाइल आयकॉनम्हणून ओळखली जाणारी मलाइका अरोरा-खान बॉलीवूडमधील खान परिवाराशी संबंधित आहे. व्यक्तिगत जीवनातील अडचणींवर मात करीत त्यांनी फॅशनच्या जगात आपला ठसा उमटवला असून त्या सत्या पॉलच्या ब्रॅण्ड अॅम्बेसेडर आहेत. भारतीय फॅशन जगात सर्वात प्रस्थापित आणि जुना असलेला हा ब्रॅण्ड १९८५मध्ये सुरू झाला. मलाइका म्हणते, ‘सत्या पॉलचा स्प्रिंग समर कलेक्शन स्ट्रीट आर्टवर आधारित आहे. त्याला बोहेमियन रॅपसोडी नाव दिले गेले. त्यात स्ट्रीट आर्टचा अनुभव आणि रंगांचा उपयोग केला आहे. त्याची सर्वात मोठे वैशिष्ट वेगळे दिसणारे प्रिंट्स आहे. तसेच त्यात लहान-मोठ्या गोष्टींवर लक्ष ठेवले आहे. तसेच त्याचे कलर कॉम्बिनेशनही चांगले तयार केले गेले आहे.’ 

मलाइका १९९०च्या दशकातील प्रसिद्ध मॉडेल आहे. गोव्यातील डिझायनर वेंडेल रॉड्रिक्सच्या त्या आवडत्या मॉडेल आहेत. अनेकदा रॉड्रिक्सबरोबर त्यांनी काम केले आहे. फॅशन त्यांच्या नसानसात आहे. ‘द क्लोजेट’ नावाचा त्यांचा ऑनलाइन वेंचर आहे. त्या माध्यमातून त्या युवतींना कमी किमतीत फॅशन प्रॉडक्ट उपलब्ध करून देतात. युवतींमध्ये हे चांगलेच लोकप्रिय आहे. बोहेमियन रॅपसोडी तीन वेगवेगळ्या लुक्सवर आधारित आहे. पारंपरिक कला, आधुनिक फॅशन स्ट्रीट ग्रॅफिटीने त्या प्रेरीत आहेत. सत्या पॉल लेबल आपल्या बहुरंगी प्रिंट्ससाठी प्रसिद्ध आहेत. या कलेक्सनमध्ये परंपरागत नवीन ग्राफिक्स जियोमेट्रिक्सचा वापर केला गेला आहे. मलाइका म्हणते, ‘या कलेक्शनमध्ये वापरलेली प्रिंट्स सोळाव्या शतकातील जयपूर आर्किटेक्चर, जुन्या काळातील प्रसिद्ध ब्लॉक प्रिंटिंग मॉटिफ आधुनिक स्ट्रीट आर्टमधून घेतले आहे. 

जॉर्जेट, सॅटिन, कॉटन बनारसी कपड्यांचा ट्रेंड 
सिलहाउट्स हा प्रकार मलाइकाला आवडतो. तो घालण्यासही सोपे आहे. तसेच सर्व वयोगटातील महिलांसाठी ते फायद्याचा आहे. कोणत्याही ऋतूत वेगवेगळ्या ठिकाणी त्याचा वापर करता येतो. त्या म्हणतात, ‘येत्या उन्हाळ्यात सात्विक रंगाचे ड्रेस जास्त लोकप्रिय राहतील. नवीन ऋतूत जॉर्जेट, सॅटिन, कॉटन बनारसी कपड्यांमधील हलक्या-फुलक्या रंगांच्या फॅशनचा ट्रेंड राहील. 
 

 
 
बातम्या आणखी आहेत...