आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘अाजारी मुलांची सेवा अशी करा’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मूल अाजारी असेल तर त्याची काळजी कशी घ्यावी असा गाेंधळ निर्माण होतो. मुळातच त्या बालकाला स्वत:ला काय हाेत अाहे हे व्यवस्थित सांगताच येत नाही. ते बालकच चिडचिड करते. त्यामुळे पालकांचीही चिडचिड हाेते. बालकाचा अाजार बळावत जाताे अाणि काहीतरी गंभीर घडण्याचीही शक्यता असते. असे हाेऊ नये एवढ्यासाठीच जागतिक अाराेग्य संघटनेने अादर्श उपचार म्हणून ‘अाजारी मुलांची सेवा अशी करा’ या शीर्षकाखाली अाणलेले पुस्तक मार्गदर्शक ठरते.

पुस्तकात वाचून मग बालकाची सेवा करा... हे जरा विचित्र वाटत असले तरी जागतिक अाराेग्य संघटनेनेच असे एक पुस्तक केवळ दवाखान्यातील कर्मचाऱ्यांसाठीच नाही तर पालकांसाठीही अाणले अाहे. इंग्रजीतून असलेल्या या पुस्तकाचे भाषांतर डाॅ. हेमंत जाेशी, डाॅ. श्याम बागल,
डाॅ. शरद प्रभुदेसाई, डाॅ. विनायक हिंगणे, डाॅ. अनिल माेकाशी अाणि डाॅ. अर्चना जाेशी यांनी केले अाहे.
हे पुस्तक अाई-वडील, पालक, वैद्यकीय सेवा देणारे डाॅक्टर, परिचारिका, अाराेग्यसेवक, अंगणवाडी सेविका या सर्वांनाच उपयाेगी अाहे.

हे पुस्तक समाेर ठेवून त्यात सांगितल्याप्रमाणे अाजारी मुलांची सेवा करूया, नंतर त्यातील मुद्दे वाचूया असे केले तरी चालते. पुस्तक वाचून उपचार करायला शिकणं साेपे जाते. पुस्तकाच्या सुरुवातीला दिलेल्या अनुक्रमाणिकेतील हवा ताे विषय निवडता येऊ शकताे.
उदा. ‘दमा’ हा विषय ४.५.२ या ठिकाणी पान नं. ९६ वर अाहे. तसेच पुस्तकाच्या शेवटीही विषयसूची दिलेली अाहे त्यातून संदर्भ पटकन सापडताे.
या पुस्तकाचे भाषांतर केलेले डाॅक्टर सांगतात की, भारतातील बालमृत्यू कमी व्हावे, अाजारी मुलांना सर्वाेत्तम सेवा मिळावी, म्हणून हे पुस्तक मराठीत भाषांतरित करण्यात अाले अाहे. या पुस्तकात अादर्श उपचार दिले अाहे. अादर्श उपचार करूनही एखादेवेळी यश अाले नाही तर कायदा अापल्या पाठीशी असेलच.
अाजारी मुलांची अायुष्यभर सर्वाधिक सेवा घरीच हाेते. रुग्णालयात क्वचितच. अाजारी मुलांची व व्यक्तीची सेवा कशी करावी ही माहिती पालकांना देणारी तशी दुसरी पुस्तके नाहीत. त्यामुळे हे पुस्तक खूपच उपयाेगी पडते.
या पुस्तकात सर्वप्रकारच्या अाजारांबद्दल माहिती दिलेली अाहे. त्यात राेगनिदानाची पद्धत, नवशिशूची काळजी, खाेकला किंवा श्वासाला त्रास, गुलाब, अतिसार, ताप, कुपाेषण, उपासमार, एच.अाय.व्ही. एड‌्सबाधित मुले, अाहार यासह या संबंधित अाजारांबद्दल अत्यंत सविस्तर माहिती तर दिलीच अाहे,
पण त्या-त्यावेळी अापण काय उपचार करू शकताे हेदेखील खूपच साेप्या अाणि अाेघवत्या भाषेत सांगण्यात अाले अाहे. त्यामुळे दवाखान्यांसह पालकांना घरीदेखील हे पुस्तक वापरता येऊ शकते. पुस्तकासंदर्भात अधिक माहितीसाठी ०२५०-२५०२७१० या क्रमांकावर संपर्क साधावा.
बातम्या आणखी आहेत...