आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यायामासाठी शूज घेताना या बाबींकडे लक्ष असू द्या...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लोकांच्या विविध गरजांना ध्यानात घेऊन स्पोर्ट्स ब्रँड त्याप्रमाणे शूज डिझाइन करत आहेत. त्यापैकी वॉकिंग शूजला जास्त मागणी आहे. व्यायाम म्हणून पायी चालणाऱ्यांसाठी हे उपयुक्त आहेत. नित्याने कामानिमित्त वा इतर कारणांसाठी वॉकिंग करणाऱ्यांसाठी काही टिप्स येथे दिल्या आहेत. परिपूर्ण व योग्य शूज निवडताना काही बाबी तपासून पाहा...

फिटिंग- शूज जास्त सैल असतील तर पायाला दुखापत होण्याची शक्यता आहे. शिवाय त्यात खडे जाण्याचीही शक्यता जास्त असते. त्यामुळे शूजची फिटिंग योग्यच असली पाहिजे. पायांना ते आरामदायक वाटले पाहिजेत. शिवाय अगदी गच्चही नकोत. पायाचे बोट हलवता यावे अशा फिटिंगचे शूज वापरणे योग्य.

डाउनहील टेस्ट गरजेची- तुमच्या वॉकिंग शूजला तपासण्याची ही सर्वात चांगली पद्धत आहे. टाचेवर उभे राहून पाहा अथवा हील्सवर चेक करा. तुमच्या पायाचा अंगठा शूजच्या टो बॉक्सला स्पर्शत आहे का, याची खात्री करून घ्या. वापरात आल्यानंतर शूज थोडे सैल होत जातात. त्यांची रुंदी वाढते. जर नवा शूज टो बॉक्सला स्पर्शत असेल, तर हा पेअर योग्य आहे.

अपहील टेस्ट- हे बूट पायऱ्यांवर ट्राय करा. शूज व्यवस्थित टाय करून घ्या.आता पायऱ्यांवर चढ-उतार करा. एका पावलात २ पायऱ्या पार करा. बुटाच्या आतच टाचा उचलण्याचा प्रयत्न करा. जर टाचा वारंवार काही मिलिमीटरपर्यंत वर येत असतील तर हा शूज योग्य नाही. पायांना त्रास होण्याची शक्यता आहे. तुम्ही दररोज १० हजार पावले चालत असाल, तर टाचेवर जोर पडल्याने पाय दुखण्याची शक्यता असते.
बातम्या आणखी आहेत...