आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विवाह खरेदीत सँडल निवडीला द्या योग्य वेळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चप्पल, सँडल्स खरेदी करताना केवळ डिझाइन्सच नव्हे, तर दर्जाचाही विचार करा, सोबत जाणून घ्या केश रचनांविषयी...

लग्नाचा दिवस जवळ येऊ लागला आहे. कपडे, मेकअप, अॅक्सेसरीज ही सर्व खरेदी झाली आहे. त्यासाठी बराच वेळही दिला जातो. सँडलची निवड करतानाही योग्य वेळ काढा. त्याचा दर्जा महत्त्वाचा आहे. त्याचे फिटिंग व्यवस्थित नसेल, तर त्रास होऊ शकतो. हिलच्या दर्जाकडे लक्ष द्या.
1. सँडलचा रंग लग्नातील पोशाखाला अनुरूप असावा. त्यात काँट्रास्टचा वापर केल्यास रंगसंगतीकडे विशेष लक्ष द्या. शक्यतो मॅचिंग रंग वापरणे चांगले. रंगात फार फरक पडल्यास लूक बिघडू शकतो. रंगांच्या बाबतीत प्रयोगशील राहायचे असल्यास विवाह पोशाखांवर सँडल्स योग्य दिसतात का, याची खात्री करून घ्या.

2. अगदी लग्नाच्या आदल्या दिवशी सँडल खरेदी करू नका. अनेकदा सँडल्स, जुती यांच्या खरेदीकडे दुर्लक्ष केले जाते. आयत्या वेळी खरेदी केल्याने अनेक समस्या येतात. लग्नाच्या वेळीच पहिल्यांदा नवी सँडल वापरल्यास त्याचा पायांना त्रास होतो. ती चावते. रुळलेली नसल्याने चालण्यासही त्रास होतो. खरेदी केल्यानंतर ती घरातल्या घरात का असेना, वापरा.

3. लग्नाची खरेदी अगदी मुक्तहस्ते होत असेल, तर सँडलच्या दर्जातच तडजोड का? सँडल दिसायलाचा आकर्षक असणे पुरेसे नाही. त्याची मजबूती व दर्जाही तितकाच महत्त्वाचा आहे. ती पायांना आरामदायक असणे सर्वात महत्त्वाचे.

4. विवाह विधी लॉनवर होणार असतील, तर पेन्सिल हिल्स आणि पाॅइंटेड शूज टाळावेत. येथे फ्लॅट आणि प्लॅटफॉर्म वेजिसचा पर्याय निवडा. समारंभाचे सर्व विधी आऊटडोअर स्थळांवर असल्यास त्यानुसारच शूज व सँडल्सची निवड करावी लागेल. त्यामुळे वावर सोपा होतो.

5. सँडलची खरेदी करताना केवळ लग्नविधींचा विचार करू नका. त्यानंतरही त्याचा वापर शक्य आहे का, याचा विचार करा. त्यानुसार डिझाइन निवडा. गोल्ड, डल गोल्ड, कॉपर, सिल्व्हरसारख्या रंगांची निवड करा. इतर साड्या व पंजाबी सूटवर हे रंग सहज वापरता येतात.
पुढील स्‍लाईडवर पाहा केश रचनांविषयी...