आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विचार बदलण्यासाठी आवश्यक सहा बाबी, समजून घ्या व बदला दृष्टिकोन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुम्ही सर्वात वाईट परिस्थितीची अपेक्षा ठेवाल तर कधी उदास, त्रस्त होणार नाहीत. मोजकेच लोक अशा पद्धतीने विचार करतात. इतर अनेक लोक जुन्या गोष्टींचा विचार करत राहतात. आमचे विचार दुसऱ्यांच्या गोष्टी किंवा कृतीवर अवलंबून राहत नाही, परंतु जीवनात घडणारी आणि न घडणाऱ्या गोष्टींवरही अवलंबून असतात. पुढे जाण्यासाठी आपणास आपला माइंडसेट बदलणे गरजेचे आहे.
नकारात्मकते शिवाय दुसरे काही न दिसणे
अनेक वेळा आपल्या डोक्यात विचारचक्र सुरू असते. नकारात्मक गोष्टींशिवाय इतर काहीही दिसून येत नाही; परंतु आता वेळ बदलाची आहे. आज जे होत आहे त्याकडे लक्ष द्या आणि स्वत: सकारात्मक गोष्टींकडेच फोकस ठेवा.
सत्य लपवणे
नेहमी सांगितले जाते, स्वत:शी बोलत राहा. परंतु तुम्ही स्वत:शी कसे बोलतात याकडे लक्ष ठेवा. दुसऱ्यांकडून सत्य लपून राहिले तर राहू द्या, परंतु स्वत:शी खरे बोला. कोणाची तक्रार करू नका.
दुसऱ्यांवर आरोप करत राहणे
काही चुकीचे झाल्यास त्याची जबाबदारी स्वत: घेण्याऐवजी दुसऱ्यांवर आरोप करणे चुकीचे आहे. एकच गोष्ट पकडून ठेवणे या बाबी सोडून द्या. या गोष्टी सोडून दिल्यास भावनात्मक स्वातंत्र्य मिळते. भावनांच्या बंधनातून मुक्त होताच तुम्हाला आनंद वाटेल.
प्रत्येक गोष्ट गंभीरतेने घेऊन चिंता करत राहणे
चिंता केल्यामुळे काहीच मिळत नाही; परंतु आनंद हिरावून घेतला जातो. तुम्ही प्रत्येक वेळी गुरफटून राहतात. चिंता केल्यामुळे तुम्ही अशा गोष्टींचाच विचारात बसलेले राहतात, ज्याची काहीच गरज नाही.
जास्तीत जास्त अपेक्षा ठेवल्यामुळे तुम्हाला तणाव येतो
जीवनात बदल घडवून आणायचा असेल तर सर्वात आधी अपेक्षा करणे सोडून द्या. तुम्ही अपेक्षा करणे सोडल्यावर अधिक आनंद तुम्हाला मिळेल. सध्या तुमच्याकडे जे आहे त्याचे कौतुक करा.
सिक्रेट पद्धतीने तणावरहित जीवन हवे : दु:ख मानवी जीवनाचा भाग आहे. हेही गरजेचे आहे. कारण दु:खामुळे डोके, शरीर आणि आत्मा मजबूत होतो. तुमच्या जीवनात फक्त चांगले आणि चांगलेच असेल तर तुम्ही कधीही मजबूत होणार नाहीत. मजबूत होण्यासाठी जीवनात दु:ख असणेही गरजेचे आहे. आनंदासाठी रिअल लाइफ अनुभव गरजेचे आहेत. लपतछपत दु:खमुक्त जीवन मिळणे अवघड बाब आहे.