सकाळचा नष्टा हा चटपटीत असावा असे सगळ्यांनाच वाटते. चटपटीत नष्टा खाऊन मुड अगदी ताजा होतो आणि आपला दिवस चांगला जातो. तर मग आपला मूड दिवसभर ताजा ठेवण्यासाठी बनवा या खास रेसिपी...
1. क्रेप
साहित्य
- एक वाटी मैदा
- अर्धी वाटी दुध
- दोन अंडी
- एक मोठा चमचा साखर
- एक मोठा चमचा लोणी
- चवीनुसार मीठ .
कृती
- अंडी भरपूर फेसून दुध आणि साखर घालून पुन्हा फेसावं .
- मैदा मीठ एकत्र करून त्यात मिसळावं. मिश्रण गुळगुळीत आणि पातळ झालं पाहिजे .
- तवा तापवून त्यावर एक डावभर मिश्रण ओतावं आणि तवा फिरवून ते संबंध तवाभर पसरावं .
- बाजूनं तूप सोडावं. एक-दोन मिनिटांनी उलटावं. क्रेप वर जायफळ किंवा दालचिनीमिश्रीत पिठीसाखर घालून खायला दयावा .
- यात स्ट्रोबेरी , पीच , पेअर अशा फळांचे पातळ काप घालून गुंडाळी करून खायला देतात .
पुढील स्लाईडवर वाचा... ब्रेकफास्टसाठी स्पेशल रेसिपी...