आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असे बनवा उन्हाळ्यात एनर्जी देणारे स्पेशल ड्रिंक्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
( छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे )
धकाधकीच्या जीवनात शरीरातील तरतरीतपणा कायम ठेवण्यासाठी एनर्जी ड्रिंक्स घेणे खूपच फायदेशीर असते. मोठ्या हॉटेलपासून ते छोट्या रेस्टाॅरंटमध्येदेखील आपल्याला हे पेय मिळतात. मात्र प्रत्येक जण हॉटेलात जाऊन घेऊ शकत नाही. त्यामुळे घरीच काही ड्रिंक बनवले जाऊ शकतात. त्यामुळे आम्ही काही रेसिपी आणल्या आहेत.

याबरोबरच शहरातील बहुतांश हॉटेल्समध्येदेखील एनर्जी फुल ड्रिंक्स सर्व्ह केली जात आहे. हे ड्रिंक्स घेतल्याने चार ते पाच तास रिफ्रेश वाटते. शहरातील बहुतांश हॉटेल आणि रेस्टॉरंटने याची तयारी केली आहे. हॉटेल रामा इंटरनॅशनलचे विजय काणेकर सांगतात की, यंदा त्यांनी उन्हाळ्यासाठी स्पेशल एनर्जी ड्रिंक तयार केलेल्या आहेत. यामध्ये रेड वुल आणि ऊर्जा ड्रिंक्सचा समावेश आहे. याबरोबरच हॉटेल िवंडसर कॅसलचे एफएमबी मॅनेजर इरफान शेखने सांगितले की, विदेशी पयर्टकाच्या पसंतीचे पेय त्यांनी यावेळेस ठेवले आहेत. शिवाय मोसमी फळांच्या ज्यूसला प्राधान्य दिले आहे.

रेड वुल

साहित्य - ३५० एमएल रेड वुल, ५० एमएल ब्ल्यू कोरासो पान फ्लेवर, २५ एमएल जिंजर अॅली सिरप, २५० एमएल सोडा.

कृती - वरील पूर्ण सामग्री एकत्र करा. यापासून दोन ग्लास एनर्जी ड्रिंक तयार होऊ शकतात. ग्लासमध्ये भरल्यावर त्यात अर्धे निंबू कापून टाका.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, उन्हाळ्यार एनर्जी देणा-या इतर ड्रिंक्सबद्दल...