आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Recipe : असे बनवा फणसाचा वापर करून बिर्याणी आणि केक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फणस हे असे फळ आहे की त्याचा संपूर्ण भारतात भाजी म्हणून वापर केला जातो. बहुतांश डिशेसमध्ये याचा वापर गोड पदार्थ बनवण्यासाठीसुद्धा केला जातो. जेव्हा हे फळ पूर्णपणे पिकते तेव्हा त्याचा गर खूपच गोड लागतो. फणसापासून मिठाई आणि केक बनवला जातो. मला आजही आठवते की लहानपणी आई आम्हाला पिकलेल्या फणसाच्या बिया काढून त्याचा गर खायला देत होती. त्याची चव आजही माझ्या जिभेवर फिरत आहे. या वेळी मी तुमच्यासाठी फणसाच्या दोन खास डिशेस घेऊन आलो आहे.
फणसाचा केक

साहित्य: एककप मैदा चहाचा दीड चमचा भरून बेकिंग पावडर, एक चिमूटभर बेकिंग सोडा, दोन अंडे, तीन चतुर्थांश कप पिठी साखर, चिमूटभर मीठ, अर्धा कप तेल, एक चमचा व्हॅनिला इसेन्स, एक चतुर्थांश कप दूध, पाच शिजलेल्या फणसांची पेस्ट.
कृती: मैदा,बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा एकत्र करून दोन-तीन वेळा चाळून घ्या आणि एका बाजूला ठेवा. एका बाऊलमध्ये अंडी, साखर आणि मीठ मिसळा. त्यात तेल टाकून थोडावेळा मिक्स करा. त्यामध्ये व्हॅनिला इसेन्स, दूध आणि फणसाची पेस्ट टाकून चांगले ढवळून घ्या. यात मैदा टाका, तयार पेस्ट बेकिंग ट्रेमध्ये टाका. १८० डिग्री अंश सेल्सियसवर प्री-हिटेड ओव्हनमध्ये चाळीस मिनिटांसाठी ठेवा. ओव्हनमधून काढल्यानंतर थंड झाल्यावर सर्व्ह करा.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, कशी बनवावी फणसाची बिर्याणी...