आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडक दागिन्यांनी द्या सौंदर्याला नवे रूप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दागिन्यांबाबत काहीच लोकांत जागरूकता असते. परंतु दिवाळीत दािगन्यांसोबतच नवा लूक हवा असल्यास आभूषणांच्या या पाच स्टाइल लक्षात ठेवा. यामुळे डिझाइन्स आणि स्टाइलच्या विचाराने आपल्या लूकमध्ये प्रयोग करायला वाव मिळेल.

पर्लस्ट्रिंगसोबत एनेमल : पर्ल्सच्यालांब स्ट्रिंगला एनेमल वर्कशी जोडा त्याचा इअररिंग्जमध्ये उपयोग करा. आपली ही कल्पना निश्चितच इतरांना आपल्याकडे आकर्षून घेईल. हे इअररिंग्ज पारंपरिक कपड्यांसोबत सहज घालता येऊ शकतात. फ्यूजनसोबतही ते छान दिसेल.

यावेळी मुघल लूक : क्लासिकमुघल लूक दिसेल आणि लोकांचे निश्चितच आपल्याकडे लक्ष जाईल. वेस्टर्न गाऊनसोबत पर्ल किंवा बीड्सपासून तयार केलेला पासाही सुंदर दिसेल. पासा बाजूने घातल्यास परफेक्ट लूक दिसून येईल.

मिक्स आणि मॅच संकल्पना : यंदापारंपरिक आभूषणे घालण्याचे टाळा. त्याऐवजी मिक्स अँड मॅच दागिने घाला. दुर्मिळ इअरकफने स्टेटमेंट लूक मिळेल. यात काही प्रयोगही शक्य आहे. उदा. सोन्याच्या इअरकफसोबत लटकते झुमके सुंदर लूक प्रदान करतील. हा पारंपरिकतेसोबतच आधुनिक प्रकारही ठरेल.

हातांत ब्रेसलेट आवश्यक: यावेशभूषेसोबत हातात ब्रेसलेट गरजेचे आहेच. त्यामुळे थोडे हटके मात्र डिझायनर ब्रेसलेट सुंदर दिसेल. ब्रेसलेट हे भारतीय आणि पाश्चिमात्य कपड्यांसोबत सहज घालता येते हा त्याचा फायदा आहे. त्याचा उपयोग फक्त समारोहाच्याच वेळी करता येतो असे नाही. ब्रेसलेट कधीही घालता येऊ शकते.

चांदबाला : हादागिन्यांतला अत्यंत दुर्मिळ झालेला प्रकार आहे. यंदा पोल्की चांद बाला हिऱ्यासोबत घालून पाहा. यात इंडोवेस्टर्न लूक मिळेल. घागऱ्यासोबत किंवा पाश्चिमात्य कपड्यांसोबत ते घालता येईल.

पर्ल स्ट्रिंगसोबत एनेमल वर्क, पासा मुगली दागिन्यांचे सौंदर्य.
एखाद्या समारंभात किंवा उत्सवात अन्य महिलांपेक्षा वेगळे दिसण्यासाठी आपण नवे कपडे विकत घेतो. मात्र, दागिन्यांबाबत तितके जागरूक नसतो. अशात कोणते दागिने वापरावेत हे जाणून घेऊया...